डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ३१) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
मधुरिमा तलावाच्या पाण्याकडे एकटक पाहत सूर्यास्ताची वाट पाहत होती. आज सुर्यास्ताला गुरुदेव आणि शलाकाचा मृत्यूचक्रात प्रवेश होणार होता. इकडे गुरुदेवांनी शलाकाला आश्रमातच थांबायला सांगितले व मृत्यूचा सापळा किती मोठा व भयंकर रचला असावा याची चाचपणी करण्यासाठी, ते जंगलाकडे एकटेच रवाना झाले होते. सुर्यास्ताला अजून बराच अवधी होता. गुरुदेवांची पावले झपाझप जंगलाच्या दिशेने पडत होती. जंगलाच्या सीमेपाशी आल्यावर त्यांनाही पवित्रतेची जाणीव झाली. त्यामुळे निःशंक मनाने त्यांनी त्या जंगलात प्रवेश केला; पण ते अनभिज्ञ होते की ही पवित्रता जरी मधुरिमामुळे जंगलभर व्यापून होती, तरी हीच पवित्रता त्यांच्याविरूद्ध एकवटली होती. शलाकासाठी रेखलेल्या मृत्यूचक्रात तिच्यावर येणारा धोका टाळण्यासाठी त्यांनी स्वतःहून प्रवेश केला होता. कदाचित थोडा काळ बाहेर राहिले तरी त्यांचा जीव वाचणार होता. मात्र काळही त्यांच्याविरुद्ध होता. त्यांना आता भवितव्याची जाणीव राहिली नव्हती. त्यामुळे आता मृत्यूचक्र दोन आहुत्या घेऊन मगच विझणार होते. गुरुदेव जसजसे पुढे येत गेले, तसा त्यांना काहीतरी विपरीत असल्याचा भास होऊ लागला. पवित्रता अजूनही आसमंतात भारलेली असली, तरीही खेळ इथेच रेखला गेला आहे हे त्यांच्या लक्षात आले; पण आपण आपल्या ताकदीच्या जोरावर अजूनही बाहेर पडू शकतो असा विश्वास त्यांना होता. जंगलात ठिकठिकाणी सज्ज असणाऱ्या मोहिनी एकेक करून समोर येऊ लागल्या. गुरुदेवांनी मागे वळून जंगलाच्या बाहेर जाण्याचा विचार मनात पक्का केला होता; पण त्यांच्या लक्षात आले नाही, की ते चालता चालता जंगलाच्या मध्यभागातील परिसरात येऊन पोहोचले होते. त्यांनाही ही जागा परिचित वाटत होती. अचानक त्यांचे डोळे विस्फारले. त्यांच्या डोळ्यांसमोर बारा वर्षांपूर्वीचा प्रसंग तरळून गेला. चेहऱ्यावर दिसत नसली तरी मनात भीती दाटून आली होती. तरी त्यांनी पूढे येणाऱ्या मोहिनींना दटावले,

“माझ्या दिशेने येऊ नका. माझ्याकडे असणाऱ्या शक्तींनी मी तुम्हांला भस्मसात करू शकतो.”
“मोहिनींच्याच साम्राज्यात येऊन मोहिनींना भस्म करायला ही बारा वर्षांपूर्वीची अमावस्येची रात्र नव्हे, मांत्रिका.”
तो हृद्यविदारक आवाज कानावर पडताच गुरुदेवांच्या चेहऱ्यावर घर्मबिंदू दाटून आले होते. तरी त्यांनी सारी शक्ती एकवटून तिथे असणाऱ्या मोहिनींवर शक्तीप्रयोग केला. त्या शक्ती मोहिनींच्या शरीरातून आरपार जात होत्या; पण त्यांना कोणतीही हानी पोहचत नव्हती. हे पाहून गुरुदेव आपले उरलेसुरले अवसान गमावून बसले. त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट उमटली होती. तलावाकडे एकटक पाहणारी ती हळूहळू उठून उभी राहिली होती व त्यांच्या दिशेने चालत येत होती. काळ्याकभिन्न वेशात असणाऱ्या त्या आकृतीच्या मागील बाजूने सूर्यप्रकाश असल्याने, तिचा चेहरा दृष्टीस पडत नव्हता. ती त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली.
“मधुरिमा, तू इथे कशी असू शकतेस? तू मोहिनी असणे अशक्य आहे. माझी विद्या मला धोका कशी देईल?”
“तुझ्या विद्येपेक्षा माझ्या सत्याची ताकद जास्त आहे. तू या मृत्यूचक्रात प्रवेश करून चुकला आहेस. तुझा मृत्यू अटळ आहे. शलाकाच्याआधी तुझी आहुती पडणे निःसंदेह निश्चित झाले आहे.”
“माझी काहीच चूक नव्हती.”
“मृत्यू समीप येऊन ठेपला आहे, तरी तू असत्य बोलणे सोडू नकोस.”
मधुरिमाचा आवाज चढला होता. मधुरिमाने वृक्षाच्या ढोलीच्या दिशेने हात केला. तो संकेत समजून रागिणीने वृक्षाच्या ढोलीतून तो खंजीर बाहेर काढला व मधुरिमाच्या हातात आणून दिला.
“हा खंजीर आठवतोय का? ती बारा वर्षांपूर्वीची काळरात्र आठवतेय का? तुझा निर्दयी होम आठवतोय का? हे तर विसरला नसशील.”
“हे तुला कसं माहित असू शकतं?”
मधुरिमाच्या डोळ्यांत क्रूरता स्पष्टपणे दिसू लागली होती. सूर्य मावळतीला झुकला होता. एव्हाना शलाका आज्ञेप्रमाणे जंगलाकडे यायला निघाली होती. मधुरिमाचे निळेशार डोळे लालभडक, रक्ताळलेले दिसत होते. सुडाचा अग्नी पेटला होता. सूर्य मावळला व जंगलाला हळूहळू घनघोर अंधाराने व्यापले. मधुरिमाने विक्राळ रूप धारण केले होते. मृत्यूचक्र जागृत झाले होते. तलावाच्या आसपासच्या परिसरात धुरच धूर पसरला होता. वातावरणातील तापमान वाढले होते. तिचे रक्तवर्णीय डोळे परत निळेशार झाले असून, चंद्राच्या प्रकाशात चमकू लागले होते. सूर्यभान गलितगात्र होऊन तिच्यासमोर उभा होता. मनात असूनही त्याला शरीराची कोणतीच हालचाल करता येत नव्हती. पद्मिनीने गुरुदेवांच्या नजरेस पडणार नाही, अशा जागी अरुंधतीला उभे केले होते. अरुंधतीला तिच्या मोहिनी रूपाची जाणीव पूर्णतः होती. तीही आपले कार्य करण्यास सज्ज झाली होती.
___________________________________
क्रमशः.
___________________________________
क्रमशः.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा