डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ३२) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
शलाकाने जंगलाची सीमा ओलांडली होती. ती नेटाने पुढे चालत येत होती. जसजसं ती तलावाच्या परिसराच्या जवळ येऊ लागली, तसतसे तिला वातावरणात बदल जाणवू लागले होते; पण गुरुदेवांच्या शोधात तिला पुढे जाणे भाग होते. ती तलावाच्या सीमारेषेजवळ आली. तिला गुरुदेव स्तब्ध उभे दिसत होते. त्यांच्यासमोर काळे वस्त्र परिधान केलेली एक मुलगी पाठमोरी उभी होती. गुरुदेवांनी शलाकाला पाहिले व तिचे उचललेले पाऊल पाहताच उरलेसुरले अवसान एकवटून ते ओरडले.
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ३२) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
शलाकाने जंगलाची सीमा ओलांडली होती. ती नेटाने पुढे चालत येत होती. जसजसं ती तलावाच्या परिसराच्या जवळ येऊ लागली, तसतसे तिला वातावरणात बदल जाणवू लागले होते; पण गुरुदेवांच्या शोधात तिला पुढे जाणे भाग होते. ती तलावाच्या सीमारेषेजवळ आली. तिला गुरुदेव स्तब्ध उभे दिसत होते. त्यांच्यासमोर काळे वस्त्र परिधान केलेली एक मुलगी पाठमोरी उभी होती. गुरुदेवांनी शलाकाला पाहिले व तिचे उचललेले पाऊल पाहताच उरलेसुरले अवसान एकवटून ते ओरडले.
“शलाका, सीमारेषा ओलांडू नकोस. स्तब्ध रहा. तिथेच रहा.”
शलाका अगदी सावध होऊन एक पाऊल मागे झाली. तेवढ्यात तिच्या कानावर आवाज पडला.
“मॉम, वाचवा मॉम. ह्या मला मारून टाकतील.”
अरुंधती कळवळून म्हणाली. शलाकाने आवाजाच्या दिशेने पाहिले. अलकनंदा अरुंधतीचे केस हातात धरून तिच्याकडे लालभडक नेत्रांनी पाहत होती. अरुंधतीने दूरवर बोट दाखवले व ती शब्द एकवटून म्हणाली.
“मॉम, सि..द्धांत...”
सिद्धांतही दूरवर जाळ्यात अडकला आहे हे पाहून शलाका विसरून गेली, की तिला सीमारेषेबाहेर उभे रहायचे आहे. मोहिनींच्या संमोहनाला, त्यांनी रचलेल्या मायेला ती फसली होती. तिने सीमारेषेतून आत पाऊल टाकले आणि एकच थरार झाला. सर्व मोहिनी जोरजोरात हसू लागल्या. गुरुदेवांच्या चेहऱ्यावरचे तेज मावळले होते. रात्र आपले रंग दाखवू लागली होती. वातावरण तप्त झाले होते. शलाकाने पुन्हा अरुंधतीकडे पाहिले. तीही त्या हसण्यात सामील होती. सिद्धांतचे रूप घेतलेली वैजयंतीही तिच्या मूळ रूपात आली.
“कुलनाशिनी, खेळ खेळलीस माझ्यासोबत? तुझ्यासारख्या गरिबाला माझ्या घरची सून बनवून घेतलं आणि तुला आईचं प्रेम दिलं, त्याची अशी परतफेड केलीस का?”
शलाका जीवाच्या आकांताने ओरडत म्हणाली.
“कोण गरीब? मी? मी मोहिनी आहे. मोहिनी! मोहिनींना धनाची कधीच कमी नव्हती आणि तू कसले आईचे प्रेम देणार? आमच्या मातेचे छत्र तू आमच्यापासून हिरावलेस आणि आईच्या प्रेमाबद्दल बोलतेस काय?”
अरुंधती कडाडली. अरुंधतीच्या बाजूला उभी असणारी वैजयंतीही शलाकाला दिसली.
“वेदश्री, तूही यांना सामील आहेस.”
“वेदश्री नाही, मी वैजयंती आहे. अगं तुझी कोणतीच सून खरी मानव नाही. तो तुझा गुरुदेव एवढा टाहो फोडून सांगत होता, की मोहिनींचा तुझ्या घरात प्रवेश झाला आहे, तेव्हा आम्ही घरात असूनही आमच्यावर संशय नाही आला ना? विनाशकाले विपरीत बुद्धी!”
वैजयंती क्रूर हसत म्हणाली. शलाका मात्र हतबल होऊन पाहतच राहिली. थोड्या वेळाने तंद्रीतून शुद्धीत येत तिने आजूबाजूला पाहिले आणि तिचेही डोळेही विस्फारले गेले. बारा वर्षांपूर्वीचा प्रसंग तिच्याही डोळ्यांसमोरून तरळून गेला. भीतीची एक लहर तिच्या शरीरभर सणसणत गेली. ती गुरुदेवांसमोर असलेल्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत म्हणाली,
“तू कोण आहेस?”
“तू कोण आहेस?”
“मी कोण आहे हे तुला नक्की जाणून घ्यायचे आहे का? शलाका, ही रात्र वैऱ्याची आहे.”
तिच्या नीलवर्णीय डोळ्यांतील प्रचंड ऊर्जा पाहूनच शलाका मूर्च्छित झाली. शलाका जागी झाली, तेव्हा ती गुरुदेवांच्या शेजारी होती. गुरुदेव कुठल्यातरी मायावी पाशाने बद्ध झाल्याप्रमाणे स्तब्ध उभे होते. शलाका स्वतःला सावरत उठून उभी राहिली. अनेक मोहिनी तिच्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहत होत्या. मगाशी जिच्या डोळ्यांत पाहून ती बेशुद्ध झाली होती ती मोहिनी तलावाकाठी उभी राहून तलावाकडे पाहत होती.
“गुरुदेव, हे काय होतंय? आता मृत्यू अटळ आहे का?”
“माझे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत, मुली. मला माफ कर. माझेही आयुष्य वाचविणे आता माझ्या हातात राहिले नाही.”
शलाकाने धीर एकवटून तिच्याकडे पाहिले. ती अजूनही अस्पष्ट दिसत होती. शलाका आपल्याकडे पाहत आहे, हे तिच्या लक्षात आले.
“काय वाटत तुला? कोण आहे मी, जिने तुझा मृत्यू तुझ्या समीप आणून ठेवला आहे?”
“कर्णिका.”
शलाकाच्या तोंडून कर्णिकाचे नाव ऐकताच मधुरिमा वळली व शलाकाच्या दिशेने येत तिच्या थेट समोर येत उभी राहिली.
“मधुरिमा, तू कशी काय?”
शलाका थरारून म्हणाली.
“हो, मीच.”
मधुरिमाच्या डोळ्यांत अंगार फुलले होते.
“तू हे सगळं करत आहेस; पण का?”
“प्रथम तू मला सांग, की तुझ्या तोंडून कर्णिका हे नाव का निघाले? ती का रेखेल मृत्यूचक्र? तू काही अपराध केला आहेस का? मुळात आहे कोण ही कर्णिका?”
मधुरिमाची नजर शलाकावर रोखलेली होती. शलाकाला दरदरून घाम फुटला होता. लाखो तीक्ष्ण नजरा जणू तिला भेदून जात होत्या. मधुरिमाला उत्तर द्यायची ताकद तिच्यात राहिली नव्हती.
“तुझा कर्णिकाशी काय संबंध?”
“तू पुन्हापुन्हा तोंडातून कर्णिका हे नाव उच्चारू नकोस. माझ्या मातेचे असे एकेरी नाव घेण्याची तुझी पात्रता नाही, शलाका.”
मधुरिमाचा आवाज कडाडत कानात शिरला होता. गुरुदेव आणि शलाका चमकून तिच्याकडे पाहू लागले.
“तू कर्णिकाची मुलगी आहेस.”
त्या दोघांच्याही तोंडून एकत्रच शब्द बाहेर पडले. त्या दोघांनाही आपला मृत्यू अटळ दिसत होता. आता त्यांच्या सुटकेचे सर्व मार्ग बंद झाल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. मधुरिमाच्या डोळ्यांतील क्रोध क्षणाक्षणाला वाढतच जात होता. शेवटचा प्रयत्न म्हणून अतिशय कष्टाने कसेबसे गुरुदेव म्हणाले.
“मुली, आम्हांला माफ कर. तुझे मन फार मोठे आहे. आम्हांला जीवनदान दे.”
मधुरिमाचे डोळे आता मात्र जणू रक्त ओकू लागले होते.
“काय म्हणालास? तुला जीवनदान देऊ मांत्रिका की या शलाकाला देऊ? तुम्ही जीवनदान दिले होतेत का त्यावेळी? का केलेत असे? बारा वर्षे! ही बारा वर्षे सूडाच्या अग्नीत मी होरपळून निघालेय आणि आज बारा वर्षांनी त्याच ठिकाणी तुम्ही मला पुन्हा भेटला आहात. तुम्ही म्हणताय की तुम्हांला सोडून देऊ?”
मधुरिमा त्यांच्याभोवती फिरत बोलायला लागली.
___________________________________
क्रमशः.
___________________________________
क्रमशः.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा