डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ३९) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई

पुस्तकात सोनेरी अक्षरात कथा लिहिलेली होती.
ही हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी माझ्या मातेकडून ऐकलेली होती. वर्षानुवर्षे अदृश्य असणाऱ्या मोहिनींच्या संमोहित साम्राज्याची कथा! दुर्धरवन फार दूरवर पसरलेले होते. या वनाच्या मध्यभागी असणारा हा तलाव
मायावी होता. आमच्या अस्तित्वाचा, आमच्या साम्राज्याचा साक्षीदार! माझी माता आणि तिच्या सहा सहकारी मोहिनी ह्या आमच्या पूर्वज होत्या. त्यांची निर्मिती कशी झाली हे त्यांनाही ज्ञात नव्हते; पण त्यांनी काळानुसार आपली शक्तीस्थाने स्वतः समजून घेतली होती. त्यांना ज्ञात होते, की त्यांच्याठायी अपार शक्ती वसली आहे. त्यांनी आपल्या अपार शक्तींनी ह्या तलावाच्या तळाशी महालाची निर्मिती केली. हा महाल खूपच भव्यदिव्य होता. पूर्णतः अदृश्य असणारा हा महाल म्हणजे जणू आमच्यासाठी बनवलेले कवच होते. एक कमान सोडली तर संपूर्ण महाल कोणालाही दिसणे शक्य नव्हते. कोणत्याही सामान्य मोहिनीला यज्ञाद्वारे आपल्या शक्ती सिद्ध केल्याशिवाय महालात प्रवेश नव्हता. मोहिनींशिवाय कोणीही या तलावाच्या पाण्यात प्रवेश करण्यास असमर्थ आहे. सदैव, निरंतर हे पाणी आपल्या उरात अग्नी लेवून आहे. माझी माता कमलिनी एके दिवशी तलावाकाठी बसली असता, तिने सहज म्हणून आपल्या शक्ती एकवटण्याचा प्रयत्न केला आणि तिच्याही नकळत एक शक्तीपुंज निर्माण झाला. त्या शक्तीपुंजाचे तेज वाढतच गेले आणि काही क्षणातच मी अर्भकाच्या रुपात मातेसमोर प्रगटले. ती अवाक झाली होती आणि सोबत असणाऱ्या मोहिनीही आश्चर्याच्या धक्क्यात होत्या. त्या आनंदाने नाचूबागडू लागल्या होत्या. आपल्यासारख्या हजारो जणींचा उदय होऊ शकतो हे त्यांच्या लक्षात आले होते. त्या सावल्या होत्या. एका सावलीला प्रकाशाच्या साहाय्याने वेगळे करून तिच्यातून दुसऱ्या सावलीचा जन्म झाला होता. माझी माता या जगात अवतरणारी पहिलीच होती. त्यामुळे तिला राज्ञीपद जन्मजात मिळाले होते आणि त्याच राजवंशाची मी पहिली युवराज्ञी होते. माता आणि तिच्या इतर सहा साथीदार मोहिनींनी मिळून सर्वांनी आपली शक्ती एका ठिकाणी एकटवली आणि त्यातून प्रचंड विशालकाय अशा शक्तीपुंजाची निर्मिती झाली. त्या शक्तीपुंजाचे लाखो भाग झाले. सूर्य जणू धरणीवर अवतरावा असे विलक्षण तेज तिथे पसरले होते.

दूरच दूर जंगल असल्याने हा प्रकाश वनाच्या बाहेर जाऊ शकला नाही. काही क्षणात त्या लाखो शक्तीपुंजातून लाखो मोहिनींचा उदय झाला होता. मोहिनी काही मानव नव्हत्या. त्यांना मानवाच्या बाळासारखे सांभाळून वाढवावे लागत नाही. सरणाऱ्या दिवस-रात्रीसोबत आम्ही वाढत होतो. तलावाच्या तळाशी प्रचंड धनसाठा होता आणि आम्ही मोहिनी त्या धनसाठ्याच्या एकमेव अधिकारी होतो. मातेने आमच्या प्रत्येकीला एक कमरबंद बांधला व प्रत्येकीचे नामकरण केले. प्रत्येकीचे एक वेगळे वैशिष्ट्य होते. प्रत्येकाची वेगळी ताकद होती. तरी सर्वजणी राजवंशाशी निष्ठावान होत्या.
*****
आज मातेने माझा राज्याभिषेक केला आहे. आज मी तलावाच्या काठी बसून मातेच्या तोंडून ही कथा ऐकत आहे. आज युवराज्ञी कर्णिका, महाराज्ञी कर्णिका झाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर मला दिसत आहे. ती मला सांगतेय, की काही दिवसातच तिच्या प्रस्थानाचा समय येणार आहे. त्याआधी माझ्या आयुष्यात फार मोठे घटनाक्रम घडणार असल्याचे तिने मला सांगितले. काय घडणार असेल माझ्या आयुष्यात? असे कोणते गूढ आहे, जे मातेला सतावत आहे?

***
प्रातःकाळ झाली होती. पुस्तकावरील अक्षरे हळूहळू अदृश्य झाली होती. अरुंधतीलाही आता कथेबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. उद्या मोहिनींच्या या साम्राज्याची उगमकथा पुन्हा वाचण्याचा निर्धार करून ती खोलीत आली. सिद्धांत अजूनही झोपलाच होता. तिने पुस्तक आपल्या कपाटात व्यवस्थित ठेवले. तिच्या डोळ्यांवर झापड आली होती. रात्रभर ती जागी राहून ते पुस्तक वाचत होती. सिद्धांतला उठवायचे सोडून तिने स्वतःच पलंगावर अंग टाकून दिले व पाहता पाहता ती गाढ झोपली.
___________________________________
क्रमशः.
क्रमशः.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा