डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ४२) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ४२) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
“तुला हे सर्व लवकर स्मरणे गरजेचे आहे, अरुंधती. तू एक मोहिनी आहेस. जरी तुला आणि वैजयंतीला मानवरूप प्राप्त झाले असले, तरी तुम्ही मूलतः मोहिनी आहात. त्यामुळे आदिरा आणि ताहिराही मोहिनी आहेत हे निश्चित आहे. त्यांना त्यांच्या मोहिनीस्वरूपाची जाणीव होण्याआधी खूप मोठा सापळा रचला जातोय. उठ अरुंधती. मोहिनींना तुझी गरज आहे. तुमच्या मुलींना तुझी गरज आहे. राजवंशाला तुझी गरज आहे.
तुला उद्यापर्यंत ह्या सर्वाची जाणीव होणे आवश्यक आहे. नाहीतर उद्या अमावस्येच्या रात्री पुन्हा एकदा अघटित घडणार. पुन्हा एकदा भयाण खेळाचा आरंभ होणार!”
तुला उद्यापर्यंत ह्या सर्वाची जाणीव होणे आवश्यक आहे. नाहीतर उद्या अमावस्येच्या रात्री पुन्हा एकदा अघटित घडणार. पुन्हा एकदा भयाण खेळाचा आरंभ होणार!”
मधुरिमाचा आवाज आसमंतात निनादत होता.
***
दुपारची वेळ होती. अरुंधती सगळी कामे आटोपून निवांत बसली होती. या घटनाक्रमाचा आणि आपला खरंच काही संबंध आहे का हा विचार ती करत होती. इतक्यात बंगल्याची डोअरबेल वाजली.
“वेदा, जरा कोण आलंय बघ गं.”
वेदश्रीने जाऊन दार उघडलं. बाहेर शाळेचे काही शिक्षक आणि आदिरा उभी होती. त्यांनी ताहिरा जंगलात हरवल्याचं तिला सांगितलं. सिद्धांत आणि नचिकेतही जेवायला घरी येत होते. त्यांनीही ते ऐकलं. सगळेच खूप घाबरले होते. वेदश्री तर कोलमडली होती. अरुंधतीने तिला सावरलं. आदिरा तर सारखी रडत होती. नचिकेत तिला घेऊन वरच्या खोलीत निघून गेला. अरुंधती, वैजयंती आणि सिद्धांत पोलीस स्टेशनला जात होते. ते निघून गेल्यावर आदिरा रडत रडतच नचिकेतला म्हणाली.
“काका, तुला माहित आहे का, आम्ही पिकनिकला गेलेलो ना तिथे आमच्या टेंटमध्ये आम्ही दोघी झोपलो होतो आणि मी उठले तेव्हा ताहिरा गायब होती; पण काल रात्री ना आम्ही काही प्रयोग करून पाहत होतो. तेव्हा आम्हाला कळलं, की आमच्याकडेही सुपर पॉवर्स आहेत.”
आदिरा मुसमुसत सांगत होती.
“काय? तुमच्याकडे कसल्या सुपर पॉवर्स आहेत?”
नचिकेतने चमकून विचारलं.
“थांब, मी तुला दाखवते.”
आदिरा त्याच्यासमोर उभी राहिली. तिने पायावर थोडा ताण आणताच तिचे पाय जमिनीवरून काही अंतर वर येऊ शकत होते. जणू ती हवेत तरंगत होती. त्यानंतर तिने नचिकेतला आपल्याला एक फटका मारायला सांगितले. नचिकेत अविश्वासाने तिच्याकडे पाहत होता. शेवटी तिच्या हट्टामुळे त्याने तिला फटका मारला व तो धाडकन जाऊन मागे कपाटाला आपटला होता. जे झालं, ते अनाकलनीय होतं. त्याचा हात तिच्या शरीरातून आरपार गेला होता. त्यानंतर तिने आणि एक शक्तीप्रयोग त्याला दाखवला. तिने आकाशाकडे बघून बोट फिरवले. पावसाळा असावा तसं आभाळ भरून आलं होतं. क्षणार्धात पाऊसही सुरू झाला. काही वेळात तिने परत आभाळाकडे पाहिलं. ती इशारा देत असल्याप्रमाणे पाऊस थांबला होता. नचिकेत धक्क्यातून सावरला नव्हता.
“काका, हे अगदी त्या पुस्तकासारखं आहे ना? मोहिनींच्या पुस्तकात असंच सगळं लिहिलं आहार. माझ्याकडे ह्या पॉवर्स कुठून आल्या?”
आदिरा नचिकेतलाच विचारत होती. आदिराला झोपायला सांगून नचिकेत धावतच अरुंधतीच्या खोलीत गेला. बरीच शोधाशोध करून त्याने अरुंधतीच्या कपाटातून ते पुस्तक बाहेर काढलं. पुस्तकाची पाने कोरी होती. आता सूर्यास्ताची वाट पाहण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता.
___________________________________
क्रमशः.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा