डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ४५) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ४५) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
इकडे रक्तिमा बराच वेळ मूर्च्छित होती. मध्यरात्र अजून सरली नव्हती. तिने आजूबाजूला पाहिले. ती एक गुहेत होती. ती स्वतःला सावरत उभी राहिली. मगाशी मदतीसाठी तिला पुकारणारी मोहिनी तिच्यासमोर बसली होती. एकटक तिच्याकडे पाहत होती. जणू तिच्यासाठी रक्तिमा एक कुतूहल होती!
“कोण आहेस तू? आम्हांला इथे का आणलेस? तुला याचे परिणाम माहीत आहेत का?”
रक्तिमाने कठोर स्वरात विचारले.
“नाही. मला माहित करून घ्यायची गरजही वाटत नाही. तू कोण आहेस, तुला इथे का आणलं याचं मला काय करायचं आहे?”
ताहिरा नजर फिरवत म्हणाली.
“आता आम्ही तुला दाखवतो, की आम्ही कोण आहोत.”
रक्तिमा कशीबशी सावरत उठून उभी राहिली. रक्तिमाने आपल्या शक्ती प्रचंड झोतात एकवटल्या. तिचे क्रोधित डोळे आणि एकवटलेल्या शक्ती क्षणात कोणाचाही विनाश करू शकत होत्या. ती आपल्या शक्तीचा ताहिरावर प्रयोग करणार, तोच तिच्या छातीत काहीतरी घुसून आरपार गेले. कोणीतरी टोकदार वस्तूने तिच्यावर वार केला आहे हे तिला जाणवले. सावली असूनही ती टोकदार वस्तूप्रमाणे भासणारी शक्ती तिला भेदून गेली होती. कारण तिच्या सर्व शक्ती जागृत नव्हत्या. साऱ्या शक्ती आपल्याला सोडून गेल्याचा भास तिला झाला. ती शक्तीहीन होऊन जमिनीवर पडली. तिच्यात उरलेले त्राण एकवटून तिने आपल्या जवळ येणाऱ्या पावलांकडे पाहिले.
“क...कोण आहात तुम्ही दोघे? आमच्यावर वार का?”
ती अतिशय कष्टाने बोलत होती.
“मी तुझा काळ आहे.”
“मी तुझा काळ आहे.”
तक्षिका हसत म्हणाली. समोर अर्णव आणि तक्षिका उभे होते. रक्तिमा बोलू पाहत होती. कशीबशी ती आपल्या कंठातले स्वर एकवटत होती. हे अस्त्र आपल्या शरीरातून आरपार न जाता आपल्याला भेदून कसे काय गेले असावे, हे तिला अजूनही समजले नव्हते. अर्णव आणि तक्षिकाकडे क्रोधित नेत्रांनी पाहत ती म्हणाली,
“आम्ही मृत्यूला घाबरत नाही; पण आम्हाला कळले पाहिजे की का करताय तुम्ही हे सगळे? मोहिनींवर वार करणे इतके सहजशक्य नाही.”
“माझ्या मॉमला मारताना तुझ्या मातेच्या मनात जराही कणव दाटली नाही ना? म्हणून आम्ही हा वार केला. मी जितका रडलो, तितकी तीही रडली पाहिजे. कदाचित आदल्या रात्री गुरुदेवी तक्षिकाने मला आश्रमात नेले नसते, तर मी मॉमच्या मृत्यूचा बदला कधीच घेऊ शकलो नसतो.”
अर्णव रागाने बोलत होता. रक्तिमाच्या लक्षात आले, की हे अलकनंदाने कथेत सांगितलेल्या मांत्रिकाशी संबंधित लोक असावेत. रक्तिमाच्या डोळ्यांत अश्रू दाटले. मात्र भय नव्हते.
“माता, आम्हांला द...दुःख आहे, की आम्ही तुम्हांला पाहू शकणार नाही. आशीर्वाद अ...अस...असुद्या.”
रक्तिमाच्या शेवटचे शब्द तिच्या मुखातून कसेबसे बाहेर पडले होते. तिचा देह धुरात परिवर्तीत झाला आणि तो धूर आसमांतात विरून गेला. समोर घडणारा प्रसंग पाहून ताहिरा रागाने अर्णव आणि तक्षिकाकडे वळली.
“तुम्ही मला खोटं सांगितलंत, की तुम्ही मोहिनी आहात. खोटं सांगितलंत, की ही एक चेटकीण आहे आणि तुम्हांला हिचा बदला घ्यायचा आहे. मी तुम्हांला जिवंत सोडणार नाही. मी माझ्या शक्तींचा प्रयोग करेन.”
ताहिरा म्हणाली. तशी तक्षिका हसू लागली. अर्णवही तिच्याकडे पाहून हसत होता.
“तू मोहिनी नाहीस, ताहिरा. तुझी मोहिनी शक्ती तर मी कधीच हरण केली. तू आता एक शक्तीविहीन मोहिनी आहेस आणि मोहिनींच्या युवराज्ञीची हत्यारी आहेस. शक्तीशिवाय मोहिनी हळूहळू खंगत मरणार. तुझं मरण निश्चित आहे. फक्त ही अस्त्रप्रयोगाने मेली आणि तू तडफत तडफत मरणार.”
तक्षिका कुत्सित हसत म्हणाली. तक्षिका आणि अर्णव गुहेतील अंधारात विरून गेले. अर्णवला जाणीवही नव्हती, की जिला तो मरायला सोडून गेला आहे ती त्याचीच मुलगी आहे. तिथे ज्या ठिकाणी काही क्षणांपूर्वी रक्तिमा होती, तिथे हात फिरवत रडत ताहिरा बोलू लागली.
“माफ करा, युवराज्ञी. अज्ञानात का असेना मी तुमचा घात केला. मला थोडी जरी कल्पना असती, तरी मी असं नसतं केलं. मी काही काळाने मरणार हे निश्चित आहे; पण मी मरण्यापूर्वी आपल्याला न्याय देऊन मरेन हे वचन देते.”
धडपडत ताहिरा गुहेबाहेर पडली ती पुन्हा जंगलात जायला. प्रातःकाळ झाली होती. अरुंधती आणि ते सर्व अजूनही जंगलात चालतच होते. रात्रीच्या अंधारात भटकल्याने ते रस्ता शोधत होते. मोहिनींची तुकडीही वनात परत आली होती. युवराज्ञीचा शोध घ्यायला त्या असफल ठरल्या होत्या. आजच्या दिवशी यज्ञ पूर्ण झाल्याने प्रभृतीही त्यांच्यापाशी उभी होती. रक्तिमाचा शोध न लागल्याने सर्वजण चिंतेत होते. अचानक आभाळ भरून आले. काळेकभिन्न मेघ दाटून आले होते. तुफानी वारा वाहू लागला होता. विजांचा अचानक वाढलेला कडकडाट आणि अचानकपणे निसर्गचक्रात आलेला हा बदल काही साधासुधा नाही तर शक्तींचा आविष्कार आहे हे मोहिनींच्या ध्यानात आले होते. मोहिनींच्या राज्ञीच्या शक्तीचा आविष्कार!
एकच किंकाळी आसमंत चिरून गेली. सर्व मोहिनी भयचकित होऊन एकत्र आल्या होत्या. आकाशातून आगीचा लोळ तलावाकाठी येऊन पडला. आसपासच्या वृक्षांसहित तलावाचे पाणीही पेटले होते. निसर्गाचे नियम उल्लंघण्याची ही शक्ती आपल्या राज्ञीचीच आहे, हे मोहिनींच्या लक्षात यायला फार काळ लागला नव्हता. पाठोपाठ दोन-तीन आगीचे प्रचंड लोळ आसमंतातून तलावाकाठी येऊन पडले. पूर्ण प्रदेश पेटून उठला होता. दुर्धरवनाच्या बरोबर मध्यभागी असणाऱ्या त्या मोहिनींच्या साम्राज्यात प्रथमच अग्निवर्षाव झाला होता. अरुंधतीसहित इतरांनी वनाच्या मध्यभागाच्या सीमेच्या आत प्रवेश केला. किमया झाल्याप्रमाणे त्या दोघींचीही सारी स्मृती परत आली होती. मधुरिमाचे शब्द खरे झाले होते. त्या दोघीही धावतच इतर मोहिनींपाशी गेल्या. इतक्या दिवसांच्या भेटीचा आनंद व्यक्त करावा, की ह्या होणाऱ्या प्रकोपाचा खेद हे मोहिनींना उमजत नव्हते. नचिकेत आणि सिद्धांत आदिराला घट्ट पकडून जीव मुठीत घेऊन उभे होते. आगीच्या लोळात सर्वांना अंगार असणारे डोळे दिसल्याचा भास झाला. त्या डोळ्यांतील चमक त्या लाखो मोहिनींना परिचित होती. सर्व मोहिनी हात जोडून गुडघ्यांवर बसून नतमस्तक झाल्या. त्यांना तसे पाहून पूर्ण वनात पुन्हा एक किंकाळी निनादली.
सर्वजणी थरारून उभ्या राहिल्या. राज्ञीचा क्रोध विकोपाला गेल्याचे पाहून त्या थरथर कापू लागल्या होत्या. नचिकेतने सोबत आणलेले पुस्तक अचानक त्याच्या हातातून हवेत झेपावले आणि मध्यभागी एक खडकावर येऊन स्थिरावले. सर्वजण त्या खडकाभोवती जमले होते. त्या पुस्तकावर अक्षरे उमटू लागली होती.

“यावेळेस मी केवळ प्रतिशोध घेणार नाही. सर्वांना माझ्या क्रोधाग्नीत लोटून देईन. आता फक्त पुढच्या पौर्णिमेपर्यंतचा अवकाश आहे. मी परत येईन.
माझ्या अंशाच्या मृत्यूबद्दल मी मृत्यूचा तांडव मांडेन.
एकाही अपराध्याला जिवंत राहू देणार नाही. माझ्या दुसऱ्या अंशाचे रक्षण करणे ही आता मोहिनींची जबाबदारी आहे. अटळ मृत्यू वाट पाहतोय. नव्या आहुतीची प्रतीक्षा आहे.”
आज प्रथमच प्रातःकाळी त्या पुस्तकावर अक्षरे उमटली होती. तेही प्रातःकाळी भयाण अंधार दाटल्यामुळे होत होते. अक्षरे दिसेनाशी झाल्यावर अग्नी विझू लागला. सर्व मोहिनींनी आकाशाकडे पाहिले. मधुरिमा आभाळात उपस्थित होती हे त्यांच्या लक्षात आले. कसल्याशा कारणामुळे ती वनात प्रवेश करू शकत नव्हती; पण ती आली होती. त्यांना अखेरचा संकेत द्यायला आली होती. तिची पाठमोरी आकृती सर्वजण डोळे भरून पाहत होते. सर्वांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले होते. प्रभृतीही आपल्या मातेला पहिल्यांदाच पाहत होती. तेही फार दुरून दिसणारे दृश्य होते. सर्व मोहिनींनी तिच्या पाठमोऱ्या आकृतीला वंदन केले. जशी आली, तशी ती विरून गेली होती. निसर्गाचे चक्र पुन्हा सुरळीत झाले होते. आज रात्री अमावस्या संपताच प्रभृतीचा राज्याभिषेक होणे आवश्यक होते. राजवंशाशिवाय मोहिनी असुरक्षित होत्या. प्रभृती भरल्या नेत्रांनी रक्तिमाला आठवत होती. प्रभृतीच्या डोळ्यांतून तलावात पडणारा अश्रू तलावात आग पेटल्याप्रमाणे उसळून येत होता. अरुंधती आणि वैजयंतीही आपण इथे नव्हतो, या कारणाने व्यथित झाल्या होत्या. युवराज्ञीसोबत काय झाले असावे याची कल्पना सर्वांनाच आली होती. अरुंधती आदिराला घट्ट कवटाळून बसली होती आणि वैजयंती, ताहिरा आपल्याजवळ नाही हे ती पूर्णतः विसरून गेली होती. ती एकनिष्ठ मोहिनी आपल्या युवराज्ञीच्या मृत्यूच्या विलापात आपले सर्वस्व सोडून द्यायला तयार होती. इतक्यात धडपडत ताहिराने मध्यभागात प्रवेश केला.
“मॉम.”
ताहिराची हळुवार हाक वैजयंतीच्या कानात घुमली. ती त्या दिशेने जाणार इतक्यातच वनात प्रवेश केलेली ताहिरा धाडकन जमिनीवर कोसळली.
___________________________________
क्रमशः.
क्रमशः.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा