मोहोर प्रेमाचा
भाग – दोन
@ ज्योती सिनफळ
काय रे कसला विचार करतोयस ह्या प्रश्नावर तेजस आपल्या विचारातून बाहेर आला व म्हणाला,
“अरे माझा विश्वासच बसत नाही आहे. आज, आत्ता थोड्यावेळापूर्वी आपण मोना ह्या प्रसिद्ध अभिनेत्रीला भेटलो, तिच्याशी बोललो. मश्या उद्या आपण परत जाऊया का ह्याच नाटकाला? तू बघ ना उद्याची तिकिटे मिळतात का?”
“तेज्या उद्या ऑफिस नाही का तुला? आणि आज नाटक बघितल्यावर परत कोणी दुसऱ्या दिवशी तेच नाटक बघायला जात का? मला तर उद्या वेळ नाही. हे नाटक खूप हाऊसफुल्ल चालू आहे. त्याची तिकिटे लोक आठ दिवस आधी बुकिंग करतात. आजच्या तिकाटाचे पास मोनामूळे रुपेश दादाला मिळाले. रुपेशदादा आणि सारीका वहिनी हे दोघे नाटकाला काही कारणामुळे गेले नाही म्हणून ते पास मला मिळाले.”
हे ऐकून तेजसचा चेहरा पडला. तो काही न बोलता गुपचूपपणे जेवण करु लागला. तेव्हा महेश त्याला म्हणाला,
“लगेच चेहरा पाडायची गरज नाही. बघु मी बघतो परत तिकिटे मिळतात का? पण उद्याची तर नाही मिळणार. पंधरा दिवसांनी जाऊ या परत आपण ह्याच नाटकाला. खूप छान नाटक आहे. मला पण परत बघायला नक्कीच आवडेल.”
हे ऐकताच तेजसच्या चेहऱ्यावर हसू पसरले आणि तो हसत महेशला म्हणाला,
“परत एकदा खुपखुप धन्यवाद मश्या. तू आज माझे खूप दिवसांपासूनचे स्वप्न पूर्ण केलेस. मोना अभिनेत्रीसोबत भेट घालून दिलीस आणि तिच्यासोबत सेल्फी पण काढता आली. तुझ्या रुपेशदादाला पण धन्यवाद सांग माझ्याकडून.”
“आभारप्रदर्शन झाले असेलतर जेवण संपव लवकर आणि बील दे जेवणाचे.”
दोघांनी जेवण संपवले. तेजसने हॉटेलचे बील दिले. मग तेजसला त्याच्या घरी सोडून महेश त्याच्या घरी निघून गेला.
तेजस त्याच्याजवळील किल्लीने दार उघडून घरात आला. बराच उशीर झाल्यामुळे घरातील सगळे झोपले होते. तेजसने घराचे दार व्यवस्थित बंद करून तो त्याच्या खोलीत झोपायला गेला. तेजस फ्रेश होऊन बेडवर झोपला आणि झोपून मोबाईलवरील मोनासोबत काढलेले सेल्फी बघू लागला. ते बघत असताना त्याला कधी झोप लागली हे त्याचे त्यालाच कळले नाही.
पहाटे पाचला उठून व्यायामाला जाणारा तेजस सात वाजले तरी उठला नाही तेव्हा त्याच्या आईला आश्चर्य वाटले. तिने तेजसच्या अंगाला हात लावून बघितले त्याला ताप नाही ना. तेव्हा तेजस ऊठला आणि मोबाईमधल्या घडाळ्यात बघत आईला म्हणाला,
“सात वाजले आज मला जागच नाही आली. चल मी पटकन आवरतो नाहीतर ऑफिसला उशीर होईल.”
तेजस ऑफिसमध्ये जाण्यासाठी पटकन तयार होऊन हॉलमध्ये नाश्ता करायला आला. त्याने आई व बाबांना मोनासोबतच्या सेल्फी दाखवले आणि मोना सोबतच्या भेटीचे वर्णन ऐकविले आणि आईला म्हणाला,
“आई एवढी मोठी अभिनेत्री पण बोलायला, वागायला एकदम साधी. काल मी एवढा आनंदात होतो. तिची भेट संपूच नये असे मला वाटले.
“जा तू तिचे नाटक बघायला पण आधी नीट नाश्ता तर कर. मघापासून तिचे गुणगान गाण्यात नाश्ता व चहा गार झाला तुझा. परत गरम करून आणते तुझा चहा.”
“नको आई, मी गार चहा पिऊन पळतो ऑफिसला. आधीच खुप उशीर झाला आहे.”
ऑफिसमध्ये गेल्यावर त्याने आपल्या सर्व कलींगना मोनासोबतचे फोटो दाखवून तिच्या सोबतच्या भेटीचे वर्णन केले. सर्व कलीग त्याला म्हणाले,
“लकी आहेस तू. तुझी मोनासारख्या मोठ्या अभिनेत्रीसोबत भेट झाली.”
त्यानंतर त्याने ऑफिसच्या कामात स्वतःला झोकून दिले. संध्याकाळी ऑफिसमधून घरी येताना परत त्याच्या डोक्यात मोनाचे विचार घोळू लागले. रात्री झोपताना परत तो मोनासोबतचे फोटो पाहू लागला. तेव्हा त्याच्या डोक्यात एक विचार आला आणि त्याने पटकन महेशला फोन लावला आणि त्याला म्हणाला,
“मश्या तुझ्याकडे एक काम आहे. करशील का?”
“अरे तेज्या तुला काल म्हणालो ना मी, पंधरा दिवसांनी जाऊ या परत नाटकाला?”
“अरे ते नाही काम. तुझ्या रुपेशदादाकडून मोनाचा मोबाईल नंबर मिळेल का?”
“तेज्या तुला कशाला हवा मोनाचा नंबर?”
“अरे असाच हवा होता बोलायला.”
“काल जेव्हा तिला भेटलो तेव्हा तुझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हता आणि आता मोबाईलवर काय बोलणार आहेस तिच्याशी?”
“ते बघतो माझे मी. तू नंबर दे ना दादाकडून घेऊन.”
“आधी मला सांग काय बोलणार आहेस तू तिच्याशी एवढं फोनवर? तेज्या एक मिनिट तू तिच्या प्रेमातबिमात नाही पडलास ना? कालपासून तिच्याविषयीच तू बोलत आहेस.”
“नाही रे काही काय बोलतोस मश्या? सहजच हवा होता मला फोन नंबर. मिळाला तर दे मला. ठेवतो मी आता फोन. बाय बाय.”
असे म्हणून तेजसने फोन ठेवला आणि तेजसच्या मनात विचार आला. खरच का मी मोनाच्या प्रेमात पडलो आहे? कालपासून माझ्या डोक्यात मोनांचेच विचार चालू आहेत. काल झोपलो मी, पण झोप म्हणावी तशी झाली नाही. त्यामुळे नेहमी लवकर उठून व्यायामाला जाणारा मी उठलोच नाही, ऑफिसात काम करत होतो पण डोक्यात मोनाचेच विचार होते.
पंधरा दिवसांनी महेशने परत ‘तुच माझी राणी’ ह्या नाटकाची तिकिटे काढून आणली. मग तो आणि तेजस ते नाटक बघायला गेले. नाटक बघून झाल्यावर तेजस महेशला म्हणाला,
“चल आपण मोनाला भेटून येऊ या.”
“तेज्या मागच्यावेळी रुपेशदादाच्या सांगण्यावरून ती आपल्याला भेटली. आता आपल्याला कोणी नाही भेटू देणार.”
“मग तू आत्ता पण रुपेशदादाला सांग ना फोन करुन आम्हाला तिला भेटायचे आहे.”
“तेजस तू वेडाबिडा झालाय का? एवढ काय तुला तिला भेटायचे आहे? मी काही रुपेशदादाला फोन नाही लावणार. आता आपण घरी जाणार आहोत आपापल्या.”
“ठीक आहे तू जा घरी. मी बघतो माझे मी मोनाला कसे भेटायचे ते? असे म्हणून तेजस नाट्यगृहातील बॅकस्टेजकडील मोनाच्या ड्रेसिंगरुमकडे गेला. महेश पण त्याच्यामागे त्याला थांबवायला गेला. तिथे पोहोचल्यावर मोनाच्या ड्रेसिंगरुमच्या बाहेरील माणसाने तेजसला आत जाऊ दिले नाही. त्यावेळी तेजस चिडला आणि आरडाओरडा करत त्या माणसाला मारायला त्याच्या अंगावर धावून गेला. तेव्हा मोना तिच्या ड्रेसिंगरुममधून बाहेर काय गोंधळ चालू आहे ते बघायला आली. ते बघून महेशने त्या माणसाला सॉरी म्हणत व मोनाला पण मान झुकवून सॉरी म्हणत तेजसला नाट्यगृहाच्या बाहेर आणले आणि तेजसला म्हणाला,
“तेज्या काय झाले आहे तुला? असे वेड्यासारखा का वागत आहेस तू?”
“मश्या मी प्रेमात पडलो आहे मोनाच्या. माझ्या मनात दिवसरात्र तिचाच विचार असतो. तिला भेटल्यापासून माझे कशातही मन लागत नाही. मला तिला भेटायचे आहे. तिच्याशी बोलायचे आहे. असे म्हणून तेजस महेशच्या गळ्यात पडून रडू लागला.”
महेशला काय बोलावे हे समजेना. तो तेजसला म्हणाला,
“तेज्या यार हे तू काय बोलतोयस? ती एवढी मोठी अभिनेत्री तिच्या प्रेमात तुझ्यासारखे हजारो असतील. तिला भेटून काही उपयोग नाही. तू तिला विसरून जा. आपण साधारण लोक आहोत.”
“मश्या एकदा तिला भेटायचे आहे मला. तुझ्या रुपेशदादाला सांग ना प्लीज. मी तिला माझ्या मनातील भावना सांगेल. ती नाही म्हणाली, तर मी परत कधीही तिला भेटणार नाही.”
“तेज्या अवघड आहे रे. बघतो मी. पण तू खरच तिच्या प्रेमात पडला आहेस का? अरे ती तुझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे. परत एकदा विचार कर.”
“नाही मश्या मी खरंच तिच्या प्रेमात पडलो आहे. प्लीज रुपेशदादाला सांगून मला मोनाचा नंबर दे. मला तिला भेटायचे आहे. माझ्या मनातील भावना तिला सांगायच्या आहेत.
---------------------------------------------------------------क्रमश:..
मोहोर प्रेमाचा
भाग – दोन
@ ज्योती सिनफळ
महेश रुपेशकडून मोनाचा नंबर कसा मिळवेल?
रुपेश मोनाचा नंबर महेशला देईल का?
वाचा पुढच्या भागात.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा