मोहोर प्रेमाचा
भाग – तीन
@ ज्योती सिनफळ
तेजसने दोनतीन दिवसांनी महेशला फोन लावला आणि विचारले,
“मश्या, रुपेशदादाने दिला का नंबर मोनाचा?”
“तेज्या, अरे यार सॉरी मी विसरुनच गेलो कामाच्या गडबडीत. आज नक्की रुपेशदादाला विचारुन तुला सांगतो.”
महेश रुपेशच्या घरी गेला आणि त्याने रुपेशला सांगितले. माझा मित्र तेजसला मोनाचा नंबर हवा आहे. तो तिच्या प्रेमात पडला आहे. त्याला तिला भेटायचे आहे. तिच्याशी बोलायचे आहे. त्यावेळी रुपेश हसू लागला आणि महेशला म्हणाला,
“महेश अरे मोना अभिनेत्री आहे. तिच्या प्रेमात हजारो लोक आहेत म्हणून ती सगळ्यांना नाही भेटत, सगळ्यांशी नाही बोलत. मी तुला तिचा नंबर नाही देणार आणि मागच्यावेळी भेटला ना तुम्ही तिला एकदा."
“रुपेशदादा प्लीज दे ना नंबर. अरे तेजस खरच तिच्या प्रेमात पडला आहे. तो खरच तिच्या बाबतीत सिरीयस आहे. तुला तर माहितच आहे तो चांगल्या घरातील मुलगा आहे.”
“बरं ठीक आहे. मला तेजसचा नंबर दे. मी मोनाला तू आता जे मला काही सांगितले ते सांगतो. तिला हवं असेल तर ती फोन लावेल तेजसला.”
ओके म्हणून महेशने रुपेशला तेजसचा फोन नंबर दिला आणि नंतर फोन करुन तेजसला सांगितले की तुझा फोन नंबर रुपेशदादा मोनाला देणार आहे. तिला वाटले तर ती तुला फोन करेल.
दोन महिने झाले तरी मोनाचा तेजसला फोन आला नाही. त्यामुळे तेजस दिवसेंदिवस उदास राहू लागला. महेशला त्याची अवस्था बघवत नव्हती पण तोही काही करु शकत नव्हता. एके दिवशी महेश तेजसला म्हणाला,
“तेज्या अरे विसर आता मोनाला. नाही येणार तिचा फोन. अरे ती तिच्या फिल्मी जगात व्यस्त असेल. तुझ्यासारखे कितीतरी जण तिच्या प्रेमात आहेत.”
“नाही मश्या मला खात्री आहे येईल तिचा फोन.”
चारपाच दिवसांनी तेजसच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरने फोन आला तेजसने फोन उचलला आणि पलीकडून एक मधुर आवाज आला.
“ हॅलो मिस्टर तेजसचा नंबर ना. मी मोना बोलत आहे.”
मोनाचा आवाज ऐकताच, तेजसला काय बोलावे ते समजेना.
“हॅलो मिस्टर तेजस”
परत मोनाचा आवाज ऐकून तेजस घसा साफ करत बोलला.
“हॅलो मिस मोना. मी तेजसच बोलत आहे. कश्या आहात तुम्ही.
“मी छान आहे. तुम्ही कसे आहात मिस्टर तेजस?”
“मी पण छान आहे.”
“उद्या माझ्या घरी माझ्या वाढदिवसाची छोटीशी पार्टी आहे. तुम्ही आणि तुमचा मित्र नक्की या पार्टीला.”
असे म्हणून मोनाने फोन ठेवला.
पाच मिनिटे तेजस कानाला फोन धरुनच बसला. त्याला विश्वासच बसत नव्हता की त्याला मोनाचा फोन आला आणि तिने त्याला तिच्या वाढदिवसाला घरी बोलावले आहे. त्याने लगेच महेशला फोन लावला आणि त्याला म्हणाला,
“मश्या यार आता मला मोनाचा फोन आला. उद्या तिने आपल्या दोघांना तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी घरी बोलावले आहे. मी आज खुप आनंदात आहे.”
“अरे व्वा! मस्तच तेजस. आता भेटलास की बोल मोनाशी तुझ्या मनातल्या भावना. चल उद्या भेटू या.”
दुसऱ्यादिवशी तेजस मस्त तयार होऊन मोनासाठी छानसं गिफ्ट घेऊन महेशसोबत मोनाच्या वाढदिवसाला तिच्या घरी पोहोचला. मोनाच्या घरी तिचे काही खास मित्रमैत्रिणी आलेले. रुपेशदादा आणि सारीका वहिनी पण आले होते. तेजसने मोनाजवळ जाऊन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि गिफ्ट दिले आणि तिला म्हणाला,
“धन्यवाद मोना मॅम. तुम्ही मला तुमच्या वाढदिवसाला बोलावले. तुम्ही कश्या आहात?”
“मी मस्त मिस्टर तेजस. तुम्ही माझ्या वाढदिवसाला आला त्यासाठी धन्यवाद. तुम्ही कसे आहात?”
“मी छान आहे.” असे म्हणत मोना तिच्या मित्रमैत्रिणींसोबत वाढदिवसाची पार्टी एन्जॉय करु लागली. मोनाने दारु पिऊन तिच्या काही खास मित्रांसोबत म्युझिक सिस्टीमवरच्या गाण्यावर डान्स केला. तेजस पण तिच्या सोबत डान्स करायला गेला पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मोना पार्टीमध्ये सगळ्यांशी हसून खेळून बोलत होती पण तेजसशी बोलायचं टाळत होती. त्यामुळे तेजस थोडा नाराज झाला आणि तेजस महेशसोबत वाढदिवसाची पार्टी अर्धवट सोडून घरी जायला निघाला. जाताना तो मोनाला भेटायला गेला आणि म्हणाला,
“मॅम परत एकदा धन्यवाद. तुम्ही आम्हाला वाढदिवसाला बोलावले. येतो आता आम्ही.”
तेव्हा मोनाने त्याला थांबवले नाही. उलट बाय केले आणि ती तिच्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारण्यात व्यस्त झाली. ते बघून तेजस निराश झाला.
घरी जाताना महेश त्याला म्हणाला,
“तेज्या मी तुला आधीच म्हणालो होतो.
अरे तिचे आणि आपले आयुष्य वेगळे आहे.”
त्यावर तेजस काहीच बोलला नाही.
त्यानंतर तेजस मोनाचे नाटक जेव्हा जेव्हा पुण्यात असे तेव्हा तेव्हा तिच्या नाटकाचा एकतरी शो बघायला तो जायचा आणि तिच्यासाठी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ घेऊन जायचा. मोनाच्या घरी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ पाठवायचा. त्याने तिला फेसबुकवर फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवली. आता नाटकातील कलाकार व नाट्यगृहातील लोक तेजस मोनासाठी नेहमी गुलाबाचा गुच्छ का घेऊन येतो? ह्याबाबत आपापसात चर्चा करु लागले. तेव्हा मोनाने तेजसला फोन करुन घरी बोलावले.
त्यावेळी तेजसला खुप आनंद झाला. तो मस्त तयार होऊन मोनाच्या घरी गेला. घरी गेल्यावर मोना त्याला म्हणाली,
“हॅलो मिस्टर तेजस कसे आहात तुम्ही?
“मी छान आहे. तुम्ही कश्या आहात मॅम?”
“मी छान आहे. मिस्टर तेजस तुमचे माझ्यावर प्रेम आहे. हे मला रुपेशने सांगितले आहे. मागच्या वेळी तुम्ही माझ्या घरी माझ्या वाढदिवसाला आला त्यावेळी माझी लाईफस्टाईल व मी तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहे हे बघून तुम्ही माझा विचार सोडून दिला असेल असे मला वाटले. पण आजही तुम्ही मला इंप्रेस करण्यासाठी माझ्या घरी, माझे पुण्यात जिथे नाटक चालू असेल तिथे फुलांचा गुच्छ घेऊन येता. त्यामुळे तुमच्या व माझ्याविषयी लोक चर्चा करू लागले आहे. मला ते काही आवडत नाही म्हणून मी तुम्हाला आज इथे बोलावले आहे.”
“मिस्टर तेजस हजारो लोकांना मी आवडते. ते माझ्यावर प्रेम करतात. त्यांना माझ्याशी लग्न करायचे असते. पण ते शक्य नाही. कारण माझे पहिले प्रेम माझा अभिनय आहे. त्याच्याशिवाय मी जगूच शकत नाही. मला अभिनय क्षेत्रात अजुन खुप काही करायचे आहे. शिकायचे आहे. म्हणून मी एवढे दिवस प्रेम, लग्न ह्या सर्व गोष्टींपासून लांब राहिले."
“मला लग्न करायचं आहे. संसार करायचा आहे. पण आमचे अभिनयाचे क्षेत्र सामान्य लोकांच्या आयुष्यापेक्षा फार वेगळे असते. आम्ही सतत नाटक, सिनेमा दौरे करत असतो त्यामुळे आम्ही आमच्या संसाराकडे, मुलांकडे हवं तसं लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे घराची, मुलांची फरपट होते. ते मला नाही पटत.”
“मिस्टर तेजस तुम्ही माझ्या अभिनयावर प्रेम करता. वास्तविक जीवनात तुम्हाला मी कशी आहे. माझा स्वभाव कसा आहे हे तुम्हाला माहित नाही. तुमच्या आणि माझ्या वयात दहा वर्षांचे अंतर आहे. आज तुम्हाला माझ्याशी लग्न करावेसे वाटत आहे पण पुढे माझे वय वाढणार आहे. तेव्हा तुम्हाला माझ्याविषयी आकर्षण वाटणार नाही. तुम्हाला तुमच्या वयाची मुलगी आवडू शकते. तुम्ही दिसायला स्मार्ट आहात. यंग आहात. तुम्हाला चांगली नोकरी आहे. तुम्हाला तुमच्याच वयाची किंवा त्यापेक्षा लहान तुम्हाला साजेशी अशी जोडीदार मिळू शकेल. हे मी तुम्हाला सर्व सांगत आहे कारण तुमचे माझ्या मित्राशी चांगले संबंध आहेत. माझ्या प्रेमापायी तुमचे आयुष्य खराब होऊ नये असे मला वाटते. सॉरी, मी तुमच्या प्रेमाचा स्वीकार नाही करु शकत.”
------------------------------------------
----------------------क्रमश:..
मोहोर प्रेमाचा
भाग – तीन
@ ज्योती सिनफळ
मोनाने तेजसच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही. त्यामुळे आता तेजस काय करेल?
तो मोनाला विसरु शकेल का?
वाचा पुढच्या भागात.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा