मोहोर प्रेमाचा
भाग – पाच
@ ज्योती सिनफळ
भीतभीतच तेजसने तिची अट विचारली. त्यावर मोना,
“तुझ्या आईवडीलांच्या परवानगीशिवाय आपले लग्न होणार नाही. ही माझी विनंती किंवा हट्ट समज.”
मोनाचे हे बोलणे ऐकून तेजसचा चेहरा उतरला आणि तो मोनाला म्हणाला,
“अगं, आता हे काय नवीन? माझे आईवडील नाही म्हणाले तर तू माझ्याशी लग्न नाही करणार? अगं, एवढ्या महिन्यांनी तू माझ्या प्रेमाचा स्वीकार केलास आणि आता ही अट?”
“तुला काय हवं ते समज पण ह्यानंतर भेटशील ते आईवडीलांची परवानगी घेऊनच. तोपर्यंत आपण तुर्तास थांबूया.”
चल, अच्छा, आता मला आराम करायचा आहे.
‘ओके बाय’
म्हणत तेजस निराश होऊन तिथून निघाला.
दुसऱ्यादिवशी थोडं घाबरतच तो आईवडिलांना म्हणाला,
“बाबा, माझं एका मुलीवर प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे.”
तेजसच्या आईवडीलांनी एकमेकांकडे बघितले आणि आईने त्याला विचारले,
“कोण आहे मुलगी? एवढ्या दिवसांत कधी काही बोलला नाहीस तू?”
“आई, ती मोना अभिनेत्री आहे ना, तिचं आणि माझं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्हाला तुमच्या परवानगीनेच लग्न करायचे आहे.”
तेजसचे बोलणे ऐकून त्याचे आईबाबा एकमेकांकडे बघून जोरात हसायला लागले. त्याचे बाबा त्यावर म्हणाले,
“आज सकाळीसकाळी आमची मस्करी करायचा मुड आला आहे का!”
“नाही बाबा, मी मस्करी नाही करत आहे. मी सिरीयसली सांगतोय, मी आणि मोना एकमेकांवर प्रेम करतो आणि आम्हाला लग्न करायचं आहे.”
तेजसची आई तेजसला ओरडून म्हणाली,
“अरे, तू काय बोलतोएस तुझे तुला तरी कळतंय का? आत्ता तू फक्त पंचवीस वर्षांचा आहेस आणि तुला पस्तीस वर्षाच्या बाईबरोबर लग्न करायचंय तेही एका अभिनेत्रीशी? तुला प्रेम करायला दुसरी कोणी मिळाली नाही का? लोक काय म्हणतील? माझी मुळीच परवानगी नाही ह्या लग्नाला.”
“अगं आई, प्रेम काही वय बघून होत का, ते असंच होऊन जातं. बाबा, तुम्ही तरी आईला समजवा.”
त्यावर त्याच्याकडे रागाने बघत वडील म्हणाले,
“तुला त्याच मुलीशी लग्न करायचे असेल तर आमचे तुझ्याशी संबंध संपले आणि तुला ह्या घराचे दरवाजे कायमचे बंद.”
ते ऐकून तेजस खूपच निराश झाला. त्याने आईकडे आशेने बघितले पण आई देखील रागाने आतल्या खोलीत निघून गेली.
ते पाहून तेजसने निराश मनाने महेशला फोन लावून नेहमीच्या ठिकाणी भेटायला बोलावले. महेश आल्यावर तेजस त्याच्या गळ्यात पडून खूप रडला आणि त्याला म्हणाला,
“मश्या, अरे मोना लग्नाला तयार झाली तर आईबाबा नाही म्हणताएत. त्यामुळे मोना पण माझ्याशी लग्नाला तयार नाहीये, हे काय होऊन बसलं रे?”
त्यावर महेश,
“तेज्या, तू मोनाला विसरुन जा. काका-काकू लग्नाला परवानगी देणारच नाहीतं. आपल्याला आयुष्यात सर्वच गोष्टी नाही मिळत. सावर स्वतःला.”
महेशचे बोलणे ऐकून तेजस अजुनच निराश झाला. घरातही त्याच्याशी कोणीच बोलत नव्हते. सत्य स्वीकारण्याशिवाय त्याच्यासमोर कुठलाच पर्याय नव्हता. त्याने स्वतःला पूर्णपणे कामात झोकून दिले. त्यामुळे घरातील वातावरण हळूहळू पुर्वपदावर येऊ लागले. तेजस आता आपल्याच विश्वात रमलेला असे. कुठेतरी तंद्री लावून तासनतास मोनासोबतचे फोटो बघत बसे.
ह्या सर्व गोष्टीला तीनचार महिने झाल्यानंतर एक दिवस त्याला मोनाचा फोन आला. आश्चर्यानेच त्याने फोन उचलला. समोरुन आलेली बातमी ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मोनाने तिचे लग्न ठरल्याची बातमी तेजसला दिली आणि सहकुटुंब लग्नाला यायचे निमंत्रणही दिले. त्यावर रागाने तेजसने फोन आपटला आणि आपल्या अश्रूंना मोकळी वाट करुन दिली.
दोन दिवसांनी तेजस ऑफिसमधून घरी आल्यावर त्याची आई त्याला म्हणाली,
“तेजस, अरे त्या मोनाचे लग्न आहे पुढच्या महिन्यात. मोनाकडचा माणूस पत्रिका देऊन गेला. पत्रिका खूप भारी आहे. केवढा खर्च केला आहे पत्रिकेवर! अहो, पत्रिका एवढी भारी आहे, मग लग्न किती भारी होणार. बरं का रे तेजस, तिने आपल्या सर्वांना आग्रहाचे निमंत्रण दिले आहे. आपण जाऊया हं नक्की.”
ते ऐकून तेजस रागाने म्हणाला,
“मी नाही जाणार आणि तुम्ही पण नका जाऊ लग्नाला. तुम्हाला ती सून म्हणून नको होती ना, मग आता तिच्या लग्नाला कशाला जायचंय तुम्हाला?”
म्हणता म्हणता मोनाच्या लग्नाच्या दिवस उजाडला.
तेजसचे आईवडील देखील छानपैकी नटूनथटून जायला तयार झाले आणि तेजसकडे बघून म्हणाले,
“अरे, आवर लवकर. लग्नाला नाही जायचे का? तिने एवढ्या आग्रहाने आपल्या सर्वांना बोलावले आहे, नाही गेलो तर किती वाईट वाटेल तिला!”
तेजसच्या मनात खरंतर लग्नाला जायची मुळीच इच्छा नव्हती पण मोना कोणाशी लग्न करत आहे ह्या उत्सुकतेपोटी तो जायला तयार झाला. मनात मोनाला एकदा शेवटचं जवळून बघावं, भेटावं तिच्याशी बोलावं ही पण सुप्त इच्छा होतीच.
लग्नमंडपात पोहचल्यावर तेजस त्याच्या आईवडीलांना म्हणाला,
“तुम्ही बसा मी आलो मोनाला भेटून.”
तो मोनाच्या ड्रेसिंगरुममध्ये गेला. त्याला बघून मोनाने तिच्या मैत्रिणींना बाहेर जायला सांगितले आणि तेजसकडे बघून म्हणाली,
“अरे व्वा तेजस! तू आलास. धन्यवाद. मला खूप आनंद झाला.”
“हो, तुला आनंद तर होणारच, मला फसवून तू दुसऱ्या कोणासोबत लग्न करत आहेस.”
“तेजस, मी तुला फसवलं नाही. मी तर तुझ्याशीच लग्न करणार होते. आपल्या लग्नाला माझ्या घरच्यांची परवानगी होती पण तुझ्या घरुनच नव्हती आणि मला तुझ्या घरच्यांना दुखवून त्यांच्या आशीर्वादाशिवाय लग्न करायचं नव्हतं. मी तुला आधीच सांगितले होते, मी माझ्या नाटक, सिनेमाच्या दौऱ्यात बिझी, तू तुझ्या ऑफिसच्या कामात बिझी. आपले लग्न झाले असते आणि आपल्याला मुलं झाली असती तर त्यांच्याकडे कोणी बघीतलं असतं? माझी मुल आजीआजोंबाच्या प्रेमाला मुकणं मला नको होतं म्हणून मी तुझा स्वीकार केला नाही. आता जे झालं ते झालं. चल, तू बाहेर जा. मला तयार व्हायचंय.”
मोनाचे सर्व बोलणे ऐकून तेजस रागाने ड्रेसिंगरुमच्या बाहेर आला आणि लग्नाच्या हॉलमध्ये आईवडीलांना शोधू लागला. तेव्हा त्याला स्टेजवरच्या भिंतीवर गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये मोनाचे नाव कोरलेले दिसले पण नवरदेवाचे नाव मात्र एका सुंदर लाल ह्रदयाच्या फुग्याने झाकलेले होते. ते बघून तेजसने रागारागाने तो लाल फुगा फोडला आणि त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. त्याचवेळी सगळ्यांच्या हसण्याचा आणि टाळ्या वाजवण्याचा आवाज त्याला ऐकू आला. तेजसने सगळ्यांकडे आश्चर्याने बघितले. मोना आणि त्याच्या आईवडीलांसह रुपेश व महेश पण स्टेजवर हजर होते. वधुवेशातील मोना त्याच्याजवळ जाऊन म्हणाली,
“कशी केली गमंत एका माणसाची!”
“हे सर्व काय आहे मोना?”
तेजसने सैरभैर होत विचारले.
“सांगते. ऐकऽ. तुझे आईवडील आपल्या लग्नाला नाही म्हणत होते हे ऐकून मला खूप वाईट वाटले. मीही तुझ्या प्रेमात होते आणि तुझ्याशिवाय राहू शकत नव्हते. म्हणून मी त्यांना गुपचुप भेटले आणि त्यांना पटवून दिले की अभिनेत्री असले तरी मी एक सामान्य व्यक्ती आहे आणि ते तुझ्या आईवडीलांना पटले. मग मीच त्यांना माझे लग्न ठरल्याचे नाटक करुया असे सुचविले. त्यांनाही माझी ही कल्पना खूप आवडली. सॉरी तेजस, तुला खूप त्रास दिला पण आता तू खुश आहेस ना!”
तेजस तिच्या जवळ जात म्हणाला,
“तू दाखवून दिलेस की तू एक उत्तम अभिनेत्री आहेस! आणि आईबाबा, मी तुम्हाला आमचे प्रेम पटवून देत होतो तेव्हा तुम्हाला नाही पटले पण अभिनेत्री सुनेकडून बरे पटले!”
हे ऐकताच सर्वजण हसू लागले आणि त्याची आई त्याला म्हणाली,
“बर चल आता तरी बोहल्यावर चढ नाहीतर लग्नाचा मुहुर्त टळून जाईल!”
नांदा सौख्यभरे!
-----------------------------------------
------------------------------------------
मोहोर प्रेमाचा
पाचवा अंतिम भाग
@ज्योती सिनफळ

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा