Login

झाले मोकळे आकाश - भाग - 1

mokle aakash
झाले मोकळे आकाश

भाग – १


तेवीस वर्षांनी प्रिया आणि कविताची अचानक बाजारात भेट झाली.... कविताने आग्रह करून तीला आपल्या घरी नेले... पण पुढे असे काय घडले.....कि ज्याची प्रियाने कल्पनाच केली नव्हती.....असं काय घडलं कि एके दिवशी प्रियाला कविताच्या नवर्याला अटक करण्यासाठी तिच्या घरी पोलिसांना घेवून जावे लागले.....

जवळजवळ तेवीस वर्षांनी कविता आणि प्रिया भेटल्या.... प्रिया तेवीस वर्षांपासून दुबईला रहात होती.... ती तिच्या एका कामासाठी सहकुटुंब तीन महिन्यांसाठी नाशिकला आली होती.....प्रियाकडे बघून कविताला एकदम भरून आलं... आणि त्या मार्केट मध्येच बोलत बसल्या.... त्या दोघी वीस – पंचवीस मिनिट बोलत बसल्या...... थोड्या वेळाने प्रिया म्हणाली चल कविता माझी गाडी इथे जवळचं पार्क केली आहे मी तुला गाडीने घरी सोडते, म्हणजे गाडीत आपल्याला अजून बोलताही येईल....... बेस्ट फ्रेंड साठी आज वेळ आहे माझ्याकडे चल बोलत जावू...असं हसून कविता म्हणाली.....


अर्ध्या तासात कविताने प्रियाला तेवीस वर्षातल्या सगळ्या घडामोडींची माहिती दिली.......प्रिया दुबईला गेल्यावर लगेचच कविताचं लग्न झालं होत.... तिने प्रेमविवाह केला होता.... एका श्रीमंत घरातली लाडकी मुलगी एका सुमार परिस्थिती असणार्या मुलाच्या प्रेमात पडली होती... आई – बाबा खूप नाराज होते...पण कविताच्या हट्टापुढे त्याचं काहीचं चाललं नाही. आणि त्यांनी तिचं लग्न लावून दिल...... आई – बाबांचा जावयाच्या बाबतीत खूप मोठा अपेक्षाभंग झाला होता.....


कविता दिसायला खूप देखणी होती. नितळ कांती, रेखीव नाक, गोरीपान आता थोडीशी जाड झाली असली तरी खूप सुंदर दिसत होती... प्रिया तिला म्हणाली तू अजूनही खूप सुंदर दिसतेस गं...

कविता हसली.... आणि आपली कहाणी सांगू लागली..... लग्न झालं तेव्हा नवरा एका साध्या कंपनीमध्ये कामाला होता....... ... त्याच्या बाईक वरून त्याने मला फिरवणं........त्याचं रोज मला गुलाब घेवून येणं....., गोड बोलणं आणि त्याचं राजबिंडरूप मला आवडलं होत.... आणि मग चार वर्षाच्या प्रेमानंतर मी परेश बरोबर लग्न केले...... त्याच्या घरची परीस्थिती अगदीच सुमार होती...... त्याचे आई – वडील तो तेरावीला असताना एका अपघातात वारले होते. ......


परेशचा स्वभाव, अत्यंत तापट, संशयी होता... ... हा स्वभाव लग्नाआधी पण होता... ....पण मला वाटत असे कि तो माझ्याबाबतीत खूप पझेसिव्ह आहे त्यामुळे मी उशिरा त्याला भेटायला आली कि तो चिडतो, रागावतो.... त्याचं ते रुसणं मला तेव्हा आवडतही असे.... पण हा स्वभाव माझ्यासाठी घातक ठरेल असं मला तेव्हा वाटलं सुद्धा नाही......

मी सरकारी खात्यात नोकरीला होते..... मला चांगला पगार होता....त्यामुळे घरचं सगळंच मी बघत असे... लाईट बिल, किराणा सामान मी माझ्या पगारातूनच भरत असे....... आणि मग लग्नानंतर चार वर्षांनी मला मुलगी झाली ....ती आता बारावीला आहे..... परेशला मुलगा व्हावा असे खूप वाटत होते पण मुलीच्या जन्मानंतर मी कधी गरोदर राहिलेच नाही..... मग माझा वनवास सुरु झाला... मुलगा नाही हि गोष्ट परेश साठी खूप मोठी होती...मुलगी लग्न करून जाईलं.... आपलं म्हातारपण अवघड होईल असे नको नको ते मागासलेले विचार तो सतत करत राहत असे........

मी सुरवातीला आई – बाबांना सांगायचा प्रयत्न केला....पण त्याचे परिणाम मी अजून भोगते आहे.....माझ्या बाबांना परेश कधीच आवडला नव्हता.....त्यांच्या मते त्याची ती साधीशी नोकरी, त्याचं शिक्षण, हे काहीच त्यांना पसंत न्हवते...... बाबांच्या मते तो माझ्यासाठी अयोग्य होता......तेव्हा आई – बाबांनी खूप समजावलं पण मी ऐकले नाही.... मला परेश बरोबरचं लग्न करायचे होते.....शेवटी आमचं लग्न झालं....

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत – कि कविताचे आई – वडील असे परेशला असं काय बोलले कि त्याने त्या गोष्टीचा राग धरून कविताचं माहेर कायमसाठी तोडलं... आणि तिला मारहाण करून तिला त्रास देणं सुरु केलं...आणि ह्या सर्व गोष्टींमधून प्रिया तिला कसं सोडवते ते.....)


सौ. सोनल गुरुनाथ शिंदे ( देवरुख – रत्नागिरी )
0

🎭 Series Post

View all