Login

झाले मोकळे आकाश - भाग - 2

mokle aakash
झाले मोकळे आकाश

भाग – २

कविता सांगू लागली..... आम्ही दोघं लग्नानंतर जेव्हा आई – बाबांना भेटायला जात असू , तेव्हा परेशला सतत वाटत असे कि ते त्याला जावयाचा मान देत नाहीत, त्याच्या नोकरीबाबत, त्याच्या पगाराबद्दल ते त्याला हिणवत असत असं त्याला वाटत असे. त्याला त्यांच्या नजरेत तिरस्कार दिसत असे.... .. तो माझ्या बाबांचा राग राग करत असे.... घरी आल्यावर माझ्या माहेरच्यांचा अगदी उद्धार करत असे....पण मी दुसरं काहीच करू शकत नसल्यामुळे आला दिवस रडून घालवत असे......

माझ्या चेहऱ्याची पार रया गेली होती.... मला खूप मानसिक ताण येत असे. त्यामुळे मी माझा आत्मविश्वास गमावून बसले होते... परेशच्या प्रेमाचे हे बंधन आता मला नकोसे वाटू लागले.... मी कोणत्याही मुलाशी बोललेलं त्याला सहन होत नसे. त्यानंतर त्याच्या रुसण्याचा आणि मी त्याची समजूत काढण्याचा क्रम नित्याचाच होत असे. परेश चार चार दिवस रुसून बसत असे... मी त्याची समजूत काढत असे..... त्याने बोलावे म्हणून त्याची मनधरणी करत असे.... स्वतःची काहीही चूक नसताना माफी मागत असे.... तेव्हा कुठे त्याचा राग विसरून तो शांत होत असे....


तो मला ऑफिसला न्यायला येत असे....त्यावेळी ऑफिस सुटताना सर्व कलीग्स एकत्रच बाहेर येत असत....... त्यावेळी कोणीतरी जेन्ट्स पटकन बाय बोलून निघून जात असे.... त्यावेळी तिथे मला आणायला आलेल्या परेशकडे माझे पहिले लक्ष जात असे, त्याने बघितलं तर नाही ना..... आता घरी गेल्यावर तो मला ओरडणार, चिडणार ह्या भीतीनेचं मला कसतरीचं होत असे......हळूहळू माझ्या मनात त्याच्या ह्या अशा वागण्यामुले भीतीने घर केले होते.....इतर कोणाशीही बोलताना मी घाबरू लागले होते...... मी खूपच हळवी झाले होते... मला सारखं रडू येत असे......

एके दिवशी बाबा माझ्या ऑफिसच्या बाजूला जवळचं एका ठिकाणी येणार होते तर त्यांनी मला ऑफिसच्या फोनवर फोन केला आणि बोलले , मी तिथे येणार आहे तर तू फ्री असशील तर आपण जवळच्या एका हॉटेल मध्ये लंच टाईमला भेटू , जेवू आणि मग तू पुन्हा ऑफिसला जा... मी माझ्या कामांना निघून जाईन... मी हो चालेल बोलले.....ठरल्याप्रमाणे बाबा आले. मी ऑफिसच्या खाली आले ... आणि मी आणि बाबा एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो.....

बाबा मला जवळ जवळ तीन महिन्यांनी भेटत होते... ते मला बघताच क्षणी बोलले... अशी का दिसतेयस तू...., हिरमुसलेली ... आणि त्यावेळी मला माझे रडू आवरता आले नाही .... आणि मी बाबांना परेशच्या विचित्र स्वभावाबद्दल सगळं सांगितले.....त्यांना सांगितले कसा परेश संशय घेतो आणि सतत मला ओरडत असतो ते.... बाबा त्यावेळी मला बोलले .... बऱ तू रडू नकोस... बघू आपण नंतर .... .तू जेव........ बाबा जेवून निघून गेले....मी ऑफिसला आले......

पण मी बाबांना हे सगळं सांगितलं आणि पुढे त्याचे परिणाम काय होतील हे माझ्या तेव्हा ध्यानातच आले नाही..... बाबांचा माझ्यावर खूप जीव होता....मी घेतलेल्या शिक्षणाचा, माझ्या नोकरीचा त्यांना खूप अभिमान होता.....

बाबांनी माझ्या नकळत परेशला घरी बोलावून घेतले.... आणि खूप ओरडले....माझ्या लाडक्या, लाडात वाढलेल्या लेकीचा तू तुझ्या ह्या वागण्याने अवतार करून ठेवला आहेसं.... माझी एवढी शिकलेली मुलगी तिचा तू सतत अपमान करत असतोस.... तुझ्यावर प्रेम करून सुखासीन आयुष्य गमावून बसली ती.... तू मला आवडला न्हवतासच पण कविताच्या हट्टापुढे माझं काहीच चाललं नाही... ... बाबा खूपच संतापले होते...... आणि रागात नको नको ते परेशला बोलले.... आणि त्यातले एक वाक्य परेशच्या जिव्हारी लागलं... ते म्हणजे बाबा बोलले..... तू आमच्या मुलीच्या लायकीचा कधीच न्हवतास आणि यापुढेही असणार नाहीस......... बसं...हे एक वाक्य आणि माझे माहेर तुटले ....

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत – ह्या एका वाक्यामुळे कविताचं माहेरी जाण कायमचं का बंद झालं ते.... )
0

🎭 Series Post

View all