Login

झाले मोकळे आकाश - भाग - 3

mokle aakash
झाले मोकळे आकाश

भाग – ३

कविता सांगू लागली... बाबांना भेटून आल्यावर परेश एवढा चिडला होता कि मला अक्षरश घरातून बाहेर काढू लागला..... मी म्हंटल अरे काय झालं काय बोलले बाबा.. तो ओरडून बोलू लागला.... माझी लायकी काढतात काय ... जा मग माहेरीच जा कायमची त्यांची लायकी आहे ना मग त्यांच्याकडेच राहा........ का इथे राहते आहेस.... तो माझ्यावर हात उचलू लागला... मी रडू लागले.....मग जवळ जवळ दोन तासाने तो शांत झाला... आणि बोलला आताचं निर्णय घे मी हवा आहे कि माहेरचे... नाहीतर सोडून जा मला.... मी रडत होते अरे असं बोलू नकोस.... आपला संसार सोडून मी कुठे जावू....असं त्याला बोलत होते......

मग शेवटी तो म्हणाला संसार हवा आहे ना मग माहेरच्यांशी ह्यापुढे संबंध ठेवायचे नाहीत ...... माहेरी पुन्हा कधीच जायचं नाही हे मान्य असेल तरच रहा इथे......मी हतबल होते... मी माझं संसार असा अर्ध्यावर कसा मोडणार होते.... मी बऱ हो चालेल असं बोलले... आणि त्या नंतर माझं माहेर सुटलंचं..... हा असा आहे माझा संसार..... आईबाबा आता धाकट्या भावाकडे असतात....... ह्या प्रसंगानंतर तेही कधी माझ्याकडे आले नाहीत आणि मी हि परेशच्या भीतीने तिथे गेले नाही.....


माझी मुलगी पालवीच माझ्या आयुष्यातली संपती आहे, तिचं माझा आधार आहे......तिच्यासाठीच मी हा संसार रेटतेय....

कविता आणि प्रिया बोलत असताना कविताच घर केव्हाच आलं होत, पण गाडी थांबवून प्रिया ते सगळं ऐकत होती... पटकन बोलत बोलता कविता म्हणाली अग एक तास झाला आपण बोलत आहोत .. चल इथवर आली आहेस तर समोरच माझी बिल्डींग आहे तर आता घरीच चल.... आज रविवार आहे त्यामुळे माझी मुलगी पालवी पण घरी आहे, तिला भेटूनचं जा....प्रिया – कविताला नाही बोलूच शकली नाही....आणि तिच्या आग्रहामुळे प्रिया फ्लॅट बघायला वर गेली.....


छोटासा वन बी एच के फ्लॅट होता.... पण छान व्यवस्थित ठेवलेला होता... सगळ्या वस्तू अगदी जागच्या जागी ... घर छान सजवलेलं होत... प्रियाच्या तोंडून आपसूकच किती सुरेख घर आहे तुझं... नोकरी करून एवढं सगळं छान सांभाळतेस तू... हे वाक्य आलं..... तिचं बोलणं पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत एक अत्यंत देखणा पुरुष संतापुन ओरडतच बाहेर आला....... इतका वेळ कुठे भटकत होतीस.......माझा चहा पियायची वेळ झाली आहे हे विसरलीस कि काय.......


कविताची अवस्था खूपच विचित्र झाली होती....प्रिया एकदम गप्पच बसली.. तरीही कविताने प्रिया हे माझे मिस्टर परेश ... आणि हि प्रिया माझ्या माहेरी शेजारी राहायची माझी खास मैत्रीण अशी ओळख करून दिली.... परेश हा असं बोलून पटकन आत निघून गेला.... प्रिया पटकन म्हणाली .. कविता मी निघते हा...... कविताची मुलगी मावशी बाय बाय म्हणाली... प्रिया मी निघते मिस्टर वाट बघत असतील असं सांगून पटकन निघाली...


गाडीत बसताना प्रियाची नजर वर गेली.... घराच्या बाल्कनीमध्ये कविता अश्रू पुसत उभी होती... तिची असहायता तिच्या चेहऱ्यावर दाटून आली होती.....


घरी पोचताच प्रियाने तिच्या नवर्याला सगळं सांगायला सुरवात केली..... प्रिया आणि कविता ह्या दोघींची घर शेजारीच होती... ... दोन्ही घरांच अंगण एकच होत.... कविताला अजून एक धाकटा भाऊ देखील होता.... कविताच्या बाबांची कपड्याची एक फॅक्टरी होती.....कविता दिसायला खूपच सुंदर होती... दहावीपर्यंत मी आणि कविता एकाच शाळेत होतो.... पण मग कविता आणि मी वेगवेगळ्या साईट निवडल्या ... आणि मग मी पुढील शिक्षणासाठी मुंबईला आले... आणि मग मैत्री , प्रेम , आपलं लग्न... त्यानंतर आपण दुबईला निघून गेलो... त्यानंतर इकडच्या आठवणी पुसट होत होत्या.....

आपण दुबईला असतानाच कविताच लग्न झालं... आई – बाबा असेपर्यंत नाशिकच्या बातम्या कळायच्या... पण आई – बाबा गेल्यावर कविताच्या कुटुंबाबद्दल काहीच कळले नाही....


प्रिया हे सर्व तिच्या नवर्याला सांगत असतानाच प्रियाच्या मोबाईलवर कविताचा फोन आला...


( कविता अजून प्रियाला फोनवर काय सांगते आणि प्रिया तिला ह्या सगळ्यातून सोडवायला कशी मदत करते ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत......)
0

🎭 Series Post

View all