Login

झाले मोकळे आकाश - भाग - 4

mokle aakash
झाले मोकळे आकाश

भाग – ४


कविताने घरी घडलेल्या प्रकाराबद्दल सॉरी बोलायला प्रियाला फोन केला होता....
कविता बोलू लागली... प्रिया तू पहिल्यांदाचं घरी आलीस आणि परेश तुझ्यासमोर मला ओरडले ... तुला कसतरीचं वाटलं असेल ना......
प्रिया बोलली... अग असुदेत ... होत असं संसारात कधीतरी.....


कविता सांगू लागते..... माहेर सुटल्यानंतर आता माझी बाजू घेणार कोणीच नाही हे कळल्यामुळे परेश अजूनच वाईट वागू लागला... पण पालवी वर खूप जीव आहे त्याचा.. तिचे खूप लाड करतो तो.....पण त्याच्या ह्या चिडखोर स्वभावामुळे ती त्याला घाबरून असते.... आमच्या ह्या सततच्या भांडणात ती उगाचच भरडली जाते ......


प्रिया बोलते तू नोकरी करतेस तुला चांगला पगार आहे मग तू का सहन करते आहेस हे सगळं... कविता बोलते... मग कुठे जावू... आई – बाबा तिकडे भावाकडे आहेत....... भावाची बायको चांगली आहे ...आई – बाबांना चांगली सांभाळते..... आणि आता त्यांच्या ह्या वयात मी त्यांना हे माझं दुःख काय सांगत बसू... ते काळजी करत राहतील .....


परेश हा आहे असा आहे, सतत संशय घेणं, मला उशीर झाला कि संतापून माझ्यावर हात उचलणे हे नेहमीचच आहे ... सतत सर्वांसमोर मला अपमानित करणे हे त्याचं चालूच असत....तो सांगेल तसचं मी वागणे .. त्याच्या पसंतीनेच खरेदी करणे.... असं असत त्याचं... माझा पगार मात्र त्याला हवा असतो .... पालवीच्या शिक्षणाबाबतीत त्याचचं मत असत... मला काहीच अधिकार नाहीत गं ह्या घरात.... एवढ्या मोठ्या मुलीसमोर पण... ..... चिडला कि मारतोच मला नेहमी तो.....

बोलता बोलता कविताला रडायला यायला लागल्यामुळे तिने पटकन विषय बददला आणि बोलली... प्रिया तुला किती मुलं आहेत ग़.....प्रिया म्हणाली .... मला दोन जुळे मुलगे आहेत... आता ते दोघं पंधराविला आहेत.....अरे वा छानच गं असं बोलून कविता म्हणाली... मी तुम्हाला सर्वाना भेटायला पालवीला घेवून नक्की येईन हा.....

प्रिया म्हणाली अग हो नक्की ये, हा.... माझ्या मुलांना पण त्यांच्या आईची बेस्ट फ्रेंड दाखवता येईल.... प्रिया बोलू लागली.... कविता का सहन करतेस गं हे सगळं.. तू एवढी शिकलेली असूनही कायमचं परेश तुझी गळचेपी करतो, तुला कितीही त्रास दिला किंवा मारलं तरी कोणीच तुझ्या बाजुने नाही , तुझ्या माहेरचे त्याला जाब विचारणार नाहीत ....हे त्याला पक्कं ठावूक आहे.. आणि तू आणि मुलगी त्याला सोडून जाणार नाहीत हा त्याचा विश्वास आहे... त्यामुळे तो तुला मारायची हिम्मत करतो अग......


कविता रडू लागली आणि बोलली.. काय करू मी हे सगळं का सहन करतेस असा मलाच प्रश्न पडतो गं नेहमी...मला सरकारी नोकरी आणि एवढा चांगला पगार असताना मी संसार मोडू नये म्हणून हे सगळे प्रयत्न करते गं.. माझ्या मुलीला आई – वडील ह्या दोघांच हि प्रेम मिळावं म्हणून माझी चाललेली हि धडपड आहे खरतरं.....त्यात माझा अतिशय कोंडमारा होतोय पण दुसरा कुठला पर्याय सुचलाच नाही मला कधी......

कविता बोलते.... बऱ प्रिया मी परवा तुला भेटायला येते हा तेव्हा गप्पा मारू .... प्रिया हो चालेल बोलून फोन ठेवते..... प्रिया कविता भेटायला येणार म्हणून खूप खुश असते........
पण परवा कविता भेटायला यायच्या आधीच दुसर्या दिवशी प्रियाच्या मोबाईलवर पालवी सकाळी आठ वाजता फोन करते....आणि रडत बोलते... मावशी तू आमच्या घरी ये ना... बाबांनी आईला खूप मारलं आहे ....आईनेच तुला फोन करायला सांगितलं आहे.....

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत – कविता परेशच्या जाचातून कशी सुटते ते.... )
0

🎭 Series Post

View all