मोकळीक भाग … ४ अंतिम भाग
ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
“तुला मोकळीक मिळावी, मनाजोगा राजाराणीचा संसार करता यावा, ज्या दडपणाखाली मी जगले ते तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणून हा वेगळं होण्याचा पर्याय मी शोधला काढला.”
“तुमच्या मनात काय चालू आहे हे आधीच सांगायला हवं होतं तुम्ही. गैरसमज झाला नसता.” आरती नाराजीच्या सुरात म्हणाली.
“अमोलने नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर ब्लॉक घेतला, लग्न झाल्यावर तो आपसूकच त्या फ्लॅटमध्ये रहायला गेला की बोलायची वेळ येणारच नाही असे वाटले. त्याचा विचार बारगळल्यामुळे तुम्हाला भाड्याने जागा घेऊन वेगळे रहा सांगणे भाग पडले. हल्ली एकत्र कुटुंब पद्धती, सासू सासरे
बऱ्याचजणींना नको असतात. सासू स्वतःहून वेगळे राहायला सांगते म्हंटल्यावर सून कशाला नाही म्हणेल पण याला तू अपवाद ठरलीस आणि सगळा गोंधळ झाला.”
बऱ्याचजणींना नको असतात. सासू स्वतःहून वेगळे राहायला सांगते म्हंटल्यावर सून कशाला नाही म्हणेल पण याला तू अपवाद ठरलीस आणि सगळा गोंधळ झाला.”
“आपल्यात तर कधीच वाद झाला नाही मग हा खटाटोप कशाला?
“वाद झाला नाही पण होणार नाही कशावरून. प्रत्येक वेळी चूक तुझीच असेल असं नाही, माझ्या हातूनही काहीतरी होईल. लेकीला झुकतं माप देताना नकळत सुनेवर अन्याय होईल. मागच्या महिन्यात तुम्ही मैत्रिणी भेटणार होतात, तेव्हा पटकन तू बोलून गेलीस, बाहेर भेटू. माझ्या घरी नको मोकळेपणाने बोलता येईल.”
“ते तुम्हाला कोणाला डिस्टर्ब नको म्हणून” आरतीने पटकन सारवासारव केली.
“प्रामाणिकपणे सांग हेच कारण होतं की…..”
काही न बोलता आरतीची नजर खाली झुकली.
“अशाच कुठल्यातरी छोट्याशा गोष्टीने सुरुवात होते. अढी निर्माण होते. माझ्या सासूबाई शेवट पर्यंत आमच्याच बरोबर राहिल्या. त्याचं पथ्यपाणी, आजारपण कर्तव्य आणि जवाबदारी या नात्याने सगळं मीच काढलं. त्याचं करण्यात माया, आपुलकीचा लवलेशही नव्हता. प्रेमाचा झरा कधीच आटून गेला होता. आज त्या नाहीत तरी माझ्या मनात फक्त कटू आठवणीच दाटून येतात. अमोलचे बाबा आणि सासूबाई यांचं नातंसुद्धा पूर्वी सारखं राहिलं नव्हतं. नात्यात दुरावा आला होता असे काही आपल्या बाबतीत होऊ नये, माझा मुलगा माझ्यापासून दुरावू नये म्हणून हा सगळा खटाटोप केला.” उषाताई हताश होऊन बोलत होत्या.
अमोलला यातलं काहीच कसं माहीत नसावं आरतीला राहून राहून आश्चर्य वाटत होतं, अखेर तिने ते विचारलंच.
“माझी सासू माझ्याशी कशीही वागली तरी त्याचं दोन्ही नातवंडांवर अतिशय प्रेम होतं. अमोलवर जरा जास्तच म्हणून मी कधीही आजीबद्दल सांगून त्यांच मन कलूषित नाही केलं. त्याच्या आजीचे वागणं खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असं असल्यामुळे फारसं कोणाच्या लक्षातही नाही आलं. आमचे वाद आम्ही आमच्या पुरतेच मर्यादित ठेवले पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवले नाहीत यामुळेच तर अमोल आणि त्याच्या चुलत भावंडांच छान पटतं. मी नेहमी म्हणायचे माझी सून आणि मुलगा वेगळं रहातील मला जो त्रास झाला तो तिला होऊ देणार नाही यावरून त्याला अंदाज आला असेल असं वाटतं. तुलाही इतकं उलगडून सांगितलं नसतं पण घरातलं वातावरण एकदमच बदललं म्हणून बोलावं लागलं. आपणच आहोत ग आपल्याला तुम्ही आम्हाला आणि आम्ही तुम्हाला, काही कमी जास्त झालं तर धावून यायला. एकमेकांसाठी काही करताना फक्त कर्तव्य आणि जवाबदारी ही भावना नसावी. दूर राहूनही आपलेपणाची ओल जपावी म्हणून हा घाट घातला बाकी काही नाही.” आपल्या मनात काय आहे ते उषाताईंनी प्रामाणिकपणे सांगितलं.
आरतीला आपल्या सासूबाईंच म्हणणं पटलं. आपल्याला मोकळीक मिळावी म्हणून केलेल्या अट्टाहासाने तिचं मन भरून आलं. अमोल घरी आल्यावर तिने त्याला सगळं सागितलं. नवीन जागेचा ताबा लवकरात लवकर घेऊन तो ब्लॉक भाड्याने दयायचा आणि जवळपास आपल्यासाठी भाड्याने ब्लॉक घ्यायचा दोघांनी एकमताने ठरवलं. मी माझ्या सुनेला सासुरवास केला नाही, जे माझ्या बाबतीत झालं ते तिच्या बाबतीत होऊ दिलं नाही याच समाधान उषाताईंना मिळावं म्हणून आरतीने आनंदाने वेगळं रहायचं ठरवलं.
समाप्त.
©® मृणाल महेश शिंपी.
टीम - सुप्रिया
टीम - सुप्रिया
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा