Login

आई बाबा रिटायर्ड होत आहेत! भाग -3

कौटुंबिक
भाग -3

" वाह म्हणजे आधीच सगळं ठरलं होतं तर..!' संगीता हटकूनच बोलते.

" संगीता.. " मीना ताई रागावून बोलतात.

" अगं आई चिडतेस कशाला, ति काय चुकीच म्हणाली..? तुमचं आधीच सगळं ठरलं होतं तर मग कशाला आम्हाला सांगितलात.. " विशाल ही तितकाच तडकून बोलतो.

" काय झालंय..? मि इथे आली हे तुला आवडलं नाही का दादा..? " विशाखा जणु रडूच लागते.

" तु शांत बस, आम्ही बोलतोय ना..!" विशाल तिच्या अंगावर खेकसतो..

"अरे दादा बोलतायत अस वाटतच नाही आहे, फक्त भांडतायत इतकंच वाटतंय.." विशाखा बोलते.

बराच वेळ शांतता पसरते रूममध्ये, न राहुन विशाखा विचारते.

" कोणी सांगेल का काय झालंय..? आणि बाबा माझ्या येण्याने त्रास होतोय तर मि निघते इथुन.. " विशाखा बोलते.

"आलीच तरी कशाला...?" संगीता तोंडातल्या तोंडात पुटपुटते..

" विशाखा आता मि रिटायर्ड झालोय, माझी जी काय जमा पुंजी होती ति मि तुम्हा दोघांन मध्ये वाटायचं ठरवलंय. म्हणुन तुला इथे बोलावलं, मुलांच्या कितीही चुका असल्या तरी त्या आई बापाला माफ कराव्या लागतात.. " बाबा हे बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी येतं.

"अहो बाबा माझ्या कशाला..? माझं अगदी उत्तम चाललंय तुम्ही जे काही आहे ते दादाच्या नावावर आणि तुमच्या जवळ ठेवा.." विशाखा अगदी समजदारीने बोलते.

" आमचं ही उत्तम चाललंय, भिख नाही लागली हो आम्हाला..!" विशाखा च हे बोलणं ऐकुन संगीता तनतनुन बोलते.

" अगं वहिनी माझं असं म्हणन नव्हतं..!" विशाखाला तिच्या बोलण्याचं फार वाईट वाटत.

" भिख...अगं ति तुला असं काही म्हणाली नाही, आणि तरी तुला असं वाटत तर मग कशाला इथे सासु सासऱ्यांशी हुज्जत घालतेयस.. "मीना ताईंना संगीताच्या बोलण्याचा अतिशय राग आला होता, त्या तिथेच न राहुन तिला ऐकवतात.

तेवढ्यात सावंतांच्या सहनशीलतेचा पारा तुटतो," अरे विशाल नको त्या विषयावरून हुज्जत का घालतोयस, तुझ्या बायकोला निदान शांत तर बसायला सांग.. "सावंत विशाल ला बोलतात.

विशाल संगीताला नजरेने खूणवतो आणि शांत बसायला सांगतो.

" तुझी काय ईच्छा आहे ति सांग, मि त्या नंतर ठरवेन काय करायचं आणि काय नाही ते. " सावंत विशाल ला शांतपणे विचारतात.

संगीता त्याला चिमटा काढते, " बोला की, बाबा विचारतायत ना.. आपलं जे ठरलंय ते सांगा.. " संगीता बोलते.

" ही रूम मला माझ्या नावावर करून हवीये.. " विशाल एकदाचा बोलुन टाकतो.

हे ऐकताच सावंत आणि मीना ताईंना शॉक लागतो, "काय अरे काय बोलतोयस..? तुला कळतंय का तु काय बोलतोयस ते..?" मीना ताई बोलतात.

" हो मला चांगलच कळतंय, मि काही चुकीचं बोलत नाहीये.. " विशाल पुन्हा तेच बोलतो.

" अरे रूम तुझ्या नावावर केली तर मग आम्ही कुठे जाणार..? आमच्या कडे हेच एक छप्पर आहे, आता आमच्या कडे हे सोडलं तर काहीच नाहीये. " सावंत जणु गयावयाचं करतात.

" एक मिनिट बाबा, तुम्ही रूम नावावर केलात तरी तुम्ही माझ्या कडेच राहणार.. " विशाल बोलतो.

" हो का हे तु ठरवणार..? आणि आमचा तुला त्रास होऊ लागला तर..? मग...? " मीना ताई विचारतात.

" अहो आई कसा होईल त्रास.. आणि तसं ही क्रिश ला तुम्ही कधी येतात असे झालंय.. आणि तुम्ही आलात तर त्याच्या कडे लक्ष ही द्याल.. " संगीता अगदी लाडी गोडी लावुन बोलते.

" अगं पण...??? " मीना ताई बोलतात.
मध्येच तिला सावंत शांत करतात.

" बरं तु बोलतोस तर ठीक आहे.. " सावंत बोलतात.