भाग -6
सावंत मीना ताईंच्या बोलण्यावर हसतात, "अगं ही शांतता आहे, भयाण नाही. कारण तुला मला ह्या अशा जगण्याची सवय नाही म्हणुन."
विशाल बिल्डिंग च्या गेट पाशी येऊन थांबतो, " काय रे काय झालं..? " सावंत विचारतात.
" काही नाही बाबा, ते बिल्डिंग च्या आत जायच्या आधी, इथे खाली आपलं नाव, पत्ता, फोन नंबर आणि सही करायची असते." विशाल सावंतांना सोसायटीचे नियम समजावून सांगतो.
पण हे ऐकताच मीना ताई गोंधळून जातात, " काय अरे पण इतकं सगळं कशासाठी..? म्हणजे कशाला ना..? "
"अगं आई ते सेफ्टीसाठी.." विशाल बोलतो.
विशाल च्या सेफ्टी शब्दाने मीना ताई अजुनच गोंधळून जातात, " अअअअअ,, काय ते.. मी समजली नाही रे.. " मीना ताईना सेफ्टी ह्या शब्दाचा अर्थच माहित नव्हता.
" अरे आई वह, आपके सुरक्षा के लिये.. " तोंडात तंबाखू खात बिल्डिंग चा वॉचमन बोलला.
पण जस त्याने बोलायला तोंड खोललं तस तंबाखू च्या वासाने मीनाताईंना गरगरायला लागल.
" तु गप रे, तोंडातला तंबाखू आधी फेक मग बोल.. " मीना ताई वैतागून बोलतात.
" आई... आई... अगं शांत हो.. हा राजेश इथला वॉचमन त्याला आपल्या सगळ्याची माहिती असते. " विशाल मध्येच बोलतो.
" सगळ्याची माहिती अरे पण.. "मध्येच बोलुन मीनाताई सावंतांच्या खुणाने शांत बसतात.
सगळं झाल्यावर विशाल मीनाताई आणि सावंतांना वर घेऊन येतो.
विशाल दरवाजाची बेल वाजवतो, संगीता दार खोलते. दोघांना पाहुन क्रिश आनंदाने उड्या मारू लागतो.
विशाल दरवाजाची बेल वाजवतो, संगीता दार खोलते. दोघांना पाहुन क्रिश आनंदाने उड्या मारू लागतो.
" ये आजी आजोबा आले.... आजी आजोबा आले... " क्रिश आनंदाने ओरडूच लागला.
सावंत आणि मीना ताई आत येतात, सोफ्यावर बसतात.
मीना ताई पुर्ण घर चोर नजरेने पाहत असतात, " आजी अगं मला खरंच वाटत नाहीये तु आली आहेस ती. " क्रिश मीनाताईंच्या मांडीवर डोकं टेकवून.
मीना ताई पुर्ण घर चोर नजरेने पाहत असतात, " आजी अगं मला खरंच वाटत नाहीये तु आली आहेस ती. " क्रिश मीनाताईंच्या मांडीवर डोकं टेकवून.
" का रे क्रिश..? मी तर तुला वचन दिलेलं ना मग कस विसरेन.. " आणि मीना ताई त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात.
" क्रिश उठ पाहू आधी, आल्या आल्या काय तुझं..? उठून बस सरळ आधी.. " संगीता कठोर आवाजात बोलते.
मीना ताईंना तिचं बोलणं जरा खटकतच, " अगं अशी काय बोलतेस..? झोपू दे कि मांडीवर. " मीना ताई भावुक होतात.
तेवढ्यात विशाल मध्येच बोलतो, " अगं आई त्याच्याशी असच बोलावं लागत, खुप शेफारला आहे आज काल तो. " विशाल क्रिश ला जरा दम देत.
" अरे शेफारला वगरे काय बोलतोस, किती लहान आहे तो बघ जरा.. " मीना ताई बोलतात.
" हूऊऊऊऊ लहान कसला तो, हट्ट करायला बरोबर शिकलाय तो. तुम्ही आला आहात ना, बघा कसा वागेल ते. " संगीता नाक उडवत तोंड वाकड करते.
" जाऊदे आता मी आहे ना, नाही वागणार तो आणि सतवणार पण नाही. " मीना ताई शांत होऊन समजुतीने बोलतात.
बरं बरं, ते सगळं राहूदे बाजुला. संगीता तु नाश्ता ठेवला आहेस ना आई बाबांसाठी तो पटकन घेऊन ये पाहु. " विशाल तिला स्वयंपाक घरातुन बनवलेला नाश्ता घेऊन यायला सांगतो.
"काय नाश्ता...? अरे देवा मी तर तो नीता ला दिला." संगीता डोक्याला हात लावुन बोलते.
हे ऐकताच विशालला राग येतो, " अगं पण का..? मी तुला सांगितलं ना कि आई बाबांना ठेव करून. मग तु तो तिला कसा दिला..? " विशाल ठणकावून विचारतो.
" अहो एकतर ती आपल्या घरी घरकामाला येते, आणि तिला लागली भूख म्हणुन दिला.. " संगीता प्रतिउत्तर देते.
" अगं पण... " विशाल रागात बोलतो.
तेवढ्यात सावंत मध्ये बोलतात, " अरे असूदेत, आम्हाला काही इतकी भूख नाही लागली बरं का.. तु उगाच चिडचिड नको करुस.. " सावंत समजुतीने बोलतात.
" अरे हो आणि भूखेल्याला पहिले द्यायचं, तुला लहानपणी शिकवलं ना. " मीना ताई त्याला समजावतात, तसा विशाल शांत होतो.
क्रमश..