" मिने अगं चहा आणतेस ना गं.. " सावंत त्यांच्या बायकोला मीना ला बोलतात..
" हो हो, आले.. " किचन मधुन आवाज बाहेर येतो..
आणि तडक त्यांच्या समोर चहाचा कप पुढ्यात येतो, " घ्या तुमचा चहा, सकाळ पासुन हा तिसरा चहा आहे कळलं का..? " मीना ताई जरा तडकुनच सावंतांना बोलतात.
सावंत चहाचा कप उचलतात आणि तोंडाला लावुन जोराची सुरकी घेतात..
सावंत मीनाकडे पाहतात आणि जोरात हसतात, " अगं मिने माझी वयाची साठी झाली, आणि अजुन ही तु तशीच रागवतेस जशी नविन नविन लग्न झाल्यावर रागवायची तशी .." आणि येऊन तिच्या बाजुला बसतात.
मीना ताई त्यांच्या कडे तिरक्या नजरेने पाहते, " बसं हा पुरे झाली तुमची थट्टा.. आता वय झालंय हो आपलं ह्याच तरी भान ठेवा... "
सावंत मुद्दाम मीना ताईंच्या खांद्यावर हात ठेवतात, " अरे वय झालं म्हणुन काय झालं प्रेम तर आपलं म्हातारं झालं नाही ना.. " आणि सावंत हसतात..
सावंतांच हसन पाहुन मीना ताई सुद्धा गालातल्या गालात हसतात..
" बरं तर मग एक कप चहा अजुन मिळेल का..? " सावंत मुद्दाम बोलतात..
" नाही हा.. दारुडा तरी बरा पण तुमचा चहा परवडणाऱ्या मधला नाही.. " मीना ताई जरा रागातच बोलतात..
" अगं बाई नको मि मुद्दाम तुझी चेष्टा करत होतो, बरं आज विशाल घरी येणार आहे ना..? " सावंत मीना ताईंना विचारतात..
विशाल म्हणजे सावंतांचा मुलगा, तसे तर सावंतांना दोन मुळे होती. एक मुलगी वैशाली आणि दुसरा विशाल.
" हो मला म्हणाला दुपार पर्यंत येतो, पण अजुन आला नाही.. "मीना ताई भिंतीवर लावलेल्या घड्याळाकडे पाहत म्हणतात.
तेवढ्यात दारावरची बेल वाजते, " घ्या आला वाटत.. " आणि सावंत धावत जाऊन दार उघडतात..
" आजोबा... " दार उघडताच विशाल चा मुलगा त्यांना गच्च मिठी मारतो ..
क्रिश विशाल चा मुलगा, सावंतांच नातु.
सावंत त्याला उचलुन घेतात आणि त्याचा गालाचा गोड पापा घेतात..
विशाल लग्न झाल्यावर काही महिन्यातच वेगळा होतो, आणि म्हणुनच सावंत आणि मीना ताई नातवा पासुन लांब असतात.
दुपारच जेवण होतं, बऱ्याच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी होतात.
" आजी तु आणि आजोबा आमच्या घरी येत आहात ना राहायला..? "क्रिश अगदी प्रेमाने मीना ताईंना प्रश्न करतो.
मीना ताई त्याच्या प्रश्न वर हसतात, " हो तर मि आणि आजोबा आता तुमच्याच घरी येणार राहायला.. आपण आता एकत्र राहायचं.. "
" ये.sssssss... म्हणजे तु मला रोज स्कुल सोडणार.. अरे वाह किती मज्जा येणार. मि तर माझ्या सगळ्यां मित्रांना सांगणार, माझे आजी आजोबा येणार आहेत ते.. " क्रिश अगदी केविल होऊन बोलतो..
त्याचे ते बोलणे ऐकुन मीना ताई आणि सावंतांना फार कौतुक वाटत. सावंतांना जणु भरून येतं, त्यांच्या डोळ्यांतुन पाणी येतं.
" नाही हा.. आजी आजोबा येणार पण आता नाही..!" संगीता मध्येच क्रिश ला थांबवते..
क्रिश चा चेहरा पडतो, "आता नाही म्हणजे..? मग कधी..?" क्रिश नाराज होतो.
" नाही तुम्ही आत्ताच चला, मला काही माहित नाही.. "क्रिश जणु हट्टालाचा पेटतो..
" नाही तुम्ही आत्ताच चला, मला काही माहित नाही.. "क्रिश जणु हट्टालाचा पेटतो..
" क्रिशssss, जिद्द करू नकोस. " विशाल चा आवाज चढतो तसा क्रिश रागाने बेडरूम मध्ये जातो..
"अरे क्रिश ssss क्रिश ssss सोन्या ऐक रे.." मीना ताई समजावण्यासाठी त्याच्या पाठी पाठी जातात.
" आई अहो तो नाही ऐकणार, त्याचा राग शांत झाला की येईल आपोआप.. " संगीता मीना ताई ना समजावते..
पण तिच्या बोलण्यात मीना ताईंना कुठेच आपुलकी दिसली नाही.
पण तिच्या बोलण्यात मीना ताईंना कुठेच आपुलकी दिसली नाही.
" बरं.. " बोलुन मीना ताई तिथवरचं थांबतात.
" मि काय बोलतो बाबा..!" विशाल बोलतो.
" तु काही ही बोलु नकोस, मि काय बोलतो ते ऐक.. " सावंत मध्येच बोलणं त्याचं थांबवतात.
सावंतांच्या अशा वाक्याने संगीता आणि विशाल एकमेकांकडे पाहतात..
"काय बाबा..?" विशाल अडखळत विचारतो..
" मीना अगं लांब का बसलीस..? ये इथे बस आणि मि काय बोलतो ते ऐक.. " सावंत मीना ताईंना बाजुला बसायला बोलवतात..
"काय झालं बाबा..? आमचं काही चुकलं का..?" विशाल च्या चेहऱ्यावरून घाम फुटायला लागतो.
" अरे कुठे काय तुमचं चुकलं, मि हे म्हणत होतो माझी काय जमा पुंजी आहे ति तुम्हा दोघांच्या नावावर करेन..." सावंत ( बाबा ) बोलतात.
" अरे वाह,,, म्हणजे बाबांना न सांगता सगळं समजलं तर.. चला म्हणजे काही बोलायची गरज नाही.. " विशाल मनातल्या मनात स्वतःशीचं बोलतो.
" काय रे कसल्या विचारात मग्न आहेस..? " मीना ताई त्याला विचारतात..
विशाल भानावर येतो..., "अअअअअ काही नाही..."
क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा