भाग -2
बाबांच बोलणं ऐकुन संगीता विशालकडे पाहते आणि खाणाखुणा करते..
" दोघांच्या नावावर म्हणजे..? मि समजलो नाही बाबा.. " विशाल सावंतांना विचारतात.
" अरे दोघांच्या म्हणजे तुझ्या आणि वैशालीच्या.. " (बाबा )सावंत बोलतात..
" अहो पण बाबा तिच्या कशाला..? तिचा काय संबंध..? " विशाल तडक बोलतो..
विशाल च्या बोलण्यात एक राग, तिरस्कार असतो..
विशाल च्या बोलण्यात एक राग, तिरस्कार असतो..
" अरे तु असं कस बोलतोस..? ति कशी ही असली तरी माझी मुलगी आहे." सावंत ( बाबा ) विशाल ची समजुत काढतात..
"ते काही ही असो, मला काही माहित नाही. मला इतकंच सांगायचंय की तुम्ही तिच्या नावावर काही ठेऊ नका." विशाल तडकाफडकी बोलतो.
" का नाही ठेवायचं..? तिचा ही तितकाच हक्क आहे जेवढा तुझा.. तुला पटलं तर ठीक आहे नाही तर..!" मीना ताई त्याला जरा हटकूनच बोलतात..
हे ऐकताच संगीताला राग येतो, " नाही तर काय आई..? अहो त्यांनी मुलगी म्हणुन कधी तुम्हाला पाहिलं आहे का..? आता पर्यंत मुलगा म्हणुन विशालचं सगळं तुमचं करत आला आहे.. " संगीता तवातावा ने बोलते..
संगीता आणि विशाल च्या बोलण्याने सावंत काही वेळ काहीच बोलत नाही.
ते टेबल वर भरून ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलतात आणि तोंडाला लावतात, घटाघटा पाणी पितात.
" अहो...sssss अहो.. ssssss.. " मीना ताई सावंतांना आवाज देतात..
" काय झालं.. काही त्रास होतो आहे का..? " मीना ताई काळजीने विचारतात..
" काय झालं.. काही त्रास होतो आहे का..? " मीना ताई काळजीने विचारतात..
सावंत मीना ताईंना हात दाखवुन शांत बसायला सांगतात..
" काय चुक आणि काय बरोबर ह्याचा विचारलं करायला मि समर्थ आहे विशाल, आणि राहायला प्रश्न तिच्या चुकीचा किंवा अजुन काही. तु सुद्धा विचार कर, की तु कुठे आता पर्यंत चुकला नाही का..? " सावंत कठोर शब्दांत बोलतात.
" काय चुक आणि काय बरोबर ह्याचा विचारलं करायला मि समर्थ आहे विशाल, आणि राहायला प्रश्न तिच्या चुकीचा किंवा अजुन काही. तु सुद्धा विचार कर, की तु कुठे आता पर्यंत चुकला नाही का..? " सावंत कठोर शब्दांत बोलतात.
" बाबा अहो तुम्ही माझी कुठे चुक काढतायत, प्रश्न असा आहे की तिने तुमच्यासाठी काय केलं ह्याचा. मि तर माझी जबाबदारी पुर्ण पणे निभावली आणि पुढे ही निभावणार.. " विशाल त्यांच्या शब्दाला शब्द लावुन बोलतो..
" खरंच तु आमच्यासाठी केलंस..? आणि काय काय केलंस..? तु मुलगा म्हणुन चुकला नाही का..? कुठेच चुकला नाही का..? " मीना ताई फारच रागात त्याला जाब विचारतात..
" अगं मीने तु तरी शांत हो.. शांत राहुन बोलुया उगाच डोक्यात त्रावा घेऊन काही होणार नाही... शांत हो.. " सावंत मीना ताईंना कस बसं शांत बसायला सांगतात..
" बरं तर मग तुझं काय म्हणणं आहे..? " सावंत (बाबा )
विशाल ला शांत पणे विचारतात तेवढ्यात दाराची बेल वाजते..
विशाल ला शांत पणे विचारतात तेवढ्यात दाराची बेल वाजते..
" आता कोण..? कोणाला बोलावलं आहे का तुम्ही..? " विशाल बाबांना विचारतो.
" थांबा मि पाहते.. " असं बोलुन संगीता दार उघडायला जाते..
संगीता दार उघडताच चकित होते, " तुम्ही..!" संगीताचा आवाज ऐकताच..
" कोण आहे गं..? " विशाल विचारतो..
" दादा अरे मि वैशाली.." वैशाली फारच आनंदात विशाल ला हाक मारते..
विशाल सावंत आणि मीना ताई कडे पाहतो..
" म्हणजे बोलावलं होत तर..!" विशाल रागातच बोलतो.
वैशालीच्या पाठोपाठ तिचा नवरा ही आत येतो, त्या दोघांना ही पाहुन विशाल आणि संगीता चा चेहरा पडतो.
" ह्या इथे कशा...? आणि दोघ ही..? " संगीता हळुच विशाल च्या कानात कुजबुजते..
" तु इथे कशी..? " विशाल कठोर शब्दांत विचारतो..
" अरे मीच बोलावलं तिला इथे, म्हटलं वडील आता रिटायर्ड झालेत तु ये. म्हणुन ति आली आहे, आणि म्हटलं जावयांची भेट सुद्धा होईल त्या निमित्ताने.. " मीना ताई बोलतात..
बोलताना मात्र त्यांच्या डोळ्यांत पाणी होतं..
बोलताना मात्र त्यांच्या डोळ्यांत पाणी होतं..
क्रमश..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा