Login

क्षण प्रेमाचे हळवे!

प्रेमाचे हळवे क्षण !
शीर्षक:- क्षण प्रेमाचे हळवे! (सुनीत काव्य)

प्रेमभाव नात्यात हवाहवासा वाटे
समजुतीने बहरेल का दोघांची प्रीत ?
गुलाबाचे फूल प्रेमाचे झाले प्रतीक
विरहाच्या काळात डोळ्यांत का अश्रू दाटे ?

हळव्या क्षणांची येईल का त्यांना आठवण?
चेहऱ्यावरचे हसू राहीले फक्त लक्षात
कधी हे पुन्हा दिसेल आता प्रत्यक्षात?
गेलेल्या वेळेची केली मनातच साठवण

दुराव्याच्या सोसल्या कशा दोघांनी यातना?
दिसे फक्त त्यात निस्वार्थ मनाचा भाव
पुनर्मिलनाने जाग्या होतील का भावना?
त्यात नसावी कधीही वासनेची हाव

नाजूक क्षण पसरवे गुलाबी वारे
दोघे देती प्रीतस्पर्शाने प्रेमाचे नारे

© विद्या कुंभार

🎭 Series Post

View all