आई आयुष्यातील खरी मैत्रीण. भाग -1

आई ही आयुष्यातील खरी मैत्रीण असते
भाग -1


विषय - मुलीची आई..

" अवंतिका आवर लवकर आणि हो हि साडी न्हेस, पाच वाजता तुला पहायला मंडळी येणार आहेत लक्षात आहे ना.." अवंतिका ची आई बोलते.

" अगं हो आई आताशी दुपारचा एक वाजला आहे, मंडळी पाच वाजता येणार आणि तुझी आत्ताच इतकी घाई. पुढे लग्न जमल्यावर श्वास तरी घेशील ना..? " अवंतिका बोलते.

आई तिचं बेडरूम आवरत असते, बेडवर झालेला पसारा पाहुन ति चिडचिड करते.

" अगं काय हे, किती हा पसारा. आता तुझं लग्न होणार निदान पसारा तर आवरायला शिक स्वतःचा. "

अवंतिका आई ने दिलेली साडी स्वतःला आरशात लावुन पाहते, " आई गं, कशी हि साडी. मला नाही न्हेसायची, कशी आऊट डेटेड वाटतेय.. " अवंतिका नाक मुरडते आणि साडी बेडवर टाकते.

" नाक मुरडायला काय झालं ? आणि काय वाईट आहे ह्या साडीत. आम्ही आमच्या वेळेस नाही नाक मुरडले, तुम्हाला बरं जमत. गप्प पणे हि साडी न्हेस, बाकी मला काही ऐकायचं नाही. " आणि आई चिडून स्वयंपाक घरात सगळं आवरायला जाते.

संध्याकाळ होते, पाहुणे मंडळी यायची वेळ होते. आईचा जीव वरखाली होत होता.
सगळं नीट होईल ना ह्याची तिला सतत काळजी सतावत होती.

आणि ति वेळ आली मुलाकडची मंडळी आली, अवंतिकाच्या बाबांनी त्यांच चांगलच स्वागत केलं. मुलगा, त्याचे आई वडील इतकेच लोक अवंतिका ला पहायला आले.

बराच वेळ गप्पा झाल्या नंतर, तिची आई कांदे पोह्यांची डिश घेऊन बाहेर येते आणि मुलाकडच्या मंडळींना देते.

" बरं मुलीला बोलवाल का..? " मुलाचे बाबा बोलतात.

" हो हो,, बोलावतो. " आणि अवंतिकाचे बाबा तिला आवाज देतात.

अवंतिका लाजत मुरडत बाहेर येते, खांद्यावर पदर घेऊन मुलाच्या आई वडिलांना नमस्कार करते.
आणि सामोरं ठेवलेल्या खुर्चीवर बसते.

" मुली नाव सांग..? " मुलाची आई कणखर शब्दांत बोलते.
तिचा आवाज भारदस्त असतो.

अवंतिका हळूच नाजुक आवाजात स्वतःच नाव सांगते.

" नाव तर छान आहे, जॉब ला जातेस का..? " मुलाचे वडील तिला विचारतात.

" हो जाते की, आय टी कंपनीत कामाला आहे. " अवंतिका बोलते.

" छान,,,बरं... " मुलाचे वडील पुढे विचारायला जाणार तेवढ्यात त्याची आई टिपिकल प्रश्न करते.

" नुसतं जॉब ला जाऊन उपयोग नाही, बाई म्हणुन घरातली कामे येतात का..? स्वयंपाक बनवायला येतो का वगरे वगरे.. " स्वयंपाक आणि अवंतिकाचा छत्तीसचा आकडा, प्रश्न ऐकुन आईला घाम फुटतो. पण अवंतिकाच्या तोंडून उत्तर येतं नाही.

क्रमश...

🎭 Series Post

View all