Login

आईची ममता

आईची माया
आई माझी आहे हो खूप भोळी
कोणाच्या बोलण्याची
चाल तिला समजत नाही
तरी सगळ्यांच्या सुखासाठी
सतत ती धडपडत हो राही.......

स्वत च्या आधी करते इतरांचा विचार
सगळे राहो आनंदात हेच असते मनात
सगळ्यांना एकत्रित बांधून ठेवणे
हास असतो तिच्या जीवनाचा ध्यास........

जाणून बुजून केला जर कोणी गुन्हा
तरी मोठ्या मनाने करून माफ
म्हणते ती करू नको असे पुन्हा
इतकी ती आहे साधी कि
चूक अन गुन्ह्यातला
फरक तिला कळत नाही......

नसेल जरी शिक्षित तरी
दिले तिने मला शिक्षण
कशी जपावी नाती
अन कशे चालवावे घर..........

बांधून प्रेमाने नात्याला
जोडावे हर एक मन
अन सुखात आनंदाने
जगावे हे जीवन.........

हीच तिची शिकवण
आहे खूप मोलाची
साधी भोळी आईच आहे
माझ्या आनंदी जीवनाची शिल्पकार..........