Login

मातृदिन भाषण

मातृदिन भाषण
व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि इथे जमलेल्या माझ्या मित्र-मौत्रिणींनो आज आपण इथे एक खास दिवस साजरा करण्यासाठी जमलो आहोत.


तो म्हणजे मातृदिन मे महिन्यातला दुसरा रविवार म्हणजे जागतिक मातृदिन आणि हा दिवस सगळ्यांसाठी जिव्हाळ्याचा असतो. कारण आई म्हणजे प्रत्येक मनाचा हळवा कोपरा असते. आई आणि आपले नाते आपण जन्माला येण्याआधीच तयार झालेले असते. ती आपल्याला न पाहता ही आपल्यावर प्रेम करत असते आणि आपण या जगात आल्यावर आपल्याला तिचं तर आपली वाटत असते. अगदी लहान असल्यापासून आपण किती ही मोठे झालो तरी तिच्या कुशीत गेलं की आपल्याला सुरक्षित वाटते.

“ स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी”

अशी आईची महती सांगितली जाते ती उगाच नाही कारण निरपेक्षपणे आणि निःस्वार्थपणे जगात आपल्यावर कोणी प्रेम करत असेल तर फक्त आणि फक्त आपली आई असते. आपण कसे दिसतो? कसे असतो? याच्याशी तिला काही देणे घेणे नसते तिच्यासाठी आपण तिचे असतो. लहानपणापासून ती आपल्यासाठी झटत असते. आपल्या मुलांसाठी कितीही काबाड कष्ट करण्याची तिची तयारी असते.

ती कायम आपल्याला चांगले आणि वाईट यातला फरक सांगत असते. ती आपल्यावर कायम चांगले संस्कार करते आपल्याला तिच्या प्रेमाच्या छायेखाली कायम सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असते. ती कायम आपले चांगले व्हावे म्हणून प्रयत्न करत असते म्हणून तर म्हणतात

“कुपुत्राने व्हावे परी कुमाता नच दिसे.”

म्हणजे पुत्र कुपुत्र असू शकतो पण कुमाता दिसत नाही. आई ही आईच असते ती कायम तुमच्या चांगल्यासाठी झटत असते. आईने आपल्याला हे जग दाखवलेलं असतं. तिने नऊ महिने उदरात ठेवून. आपल्याला जन्म देताना तिने खूप यातना सोसलेल्या असतात. ती आपल्यासाठी आपल्याही नकळत खूप काही करत असते. ती जी माया ममता करते अशी माया आपल्यावर जगात कोणीच करू शकत नाही.

आईपुढे देवही नतमस्तक होतात. फक्त आईच असते जी आपल्या मुलाच्या हृदयातील सर्व काही त्याच्या डोळ्यात बघून समजते. मुलाला जेव्हा चिंता, त्रास जाणवतो. तेंव्हा आई प्रत्येक वेदना सहन करत असते. आई ही आपल्या मुलाची ढाल असते आणि जगातील कोणतीही समस्या तिच्या मुलाला स्पर्श करू शकत नाही.

आईचे प्रेम अनमोल आहे, त्याची तुलना जगातील कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही. लहानपणी जसं होतं तसं लहानाचे मोठं झाल्यावरही आईचं प्रेम तसंच राहतं. आईच्या प्रेमाची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. आईचे आपल्या मुलावरचे निःस्वार्थ प्रेम हे आयुष्यभर असते. मूल तिच्या जवळ असो की दूर याने काही फरक पडत नाही. आई ही फक्त एक आई असते.जिची आपल्या मुलाच्या संगोपन आणि संगोपनात सर्वात महत्त्वाची भूमिका असते.

जिच्या कुशीत जगातील सर्वात मोठे सुख मिळते ती आईच असते. मी आजपर्यंत जो किंवा जी आहे ती माझ्या आईमुळे आहे. मला जन्म दिला, मला वाढवलं. माझ्या आईनेच मला प्रत्येक चुकीच्या गोष्टीबद्दल आधी सावध केलं आणि चांगल्या वाईटातील फरक समजावून सांगितला. माझी पहिली शिक्षिका माझी आई आहे. जिने मला माझ्या शिक्षकांचा आदर करायला शिकवले. आई जिच्या कुशीत मला सर्वात मोठी शांती मिळते.

“ आई म्हणजे गुरू
आई म्हणजे कल्प तरु
वात्सल्याचा सागरु
आई माझी ”

आई ही आपली पहिली गुरू आणि मार्गदर्शक असते. मुलासाठी आई देवाचे दुसरे रूप असते.आई आपल्याला चालायला, बोलायला आणि लिहायला शिकवते.आईचे प्रेम आणि मुलासाठीची काळजी कधीच संपत नाही.

आईबद्दल आपण जितके बोलू तितके कमीच आहे. तरी मी एवढे बोलून माझे भाषण संपवतो.
★★★

व्यासपीठावर उपस्थित आदरणीय शिक्षकगण आणि माझ्या बाल मित्रांनो. आज मे महिन्यातील दुसरा रविवार म्हणजे मातृदिन साजरा करण्यासाठी इथे जमलो आहोत मी त्या निमित्त जे दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावेत ही नम्र विनंती

आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर असा शब्दाचा पवित्र मेळ घालत तयार झालेला शब्द म्हणजे आई. केवळ शब्दच नाही तर जगाची निर्मिती आणि जगाची कायमस्वरूपी गरज अशी दयाळू,मायाळू आई. भारतासह इतर अनेक देशांमध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन म्हणजेच मदर्स डे साजरा केला जातो.यावर्षी आईला समर्पित हा दिवस 12 मे रोजी साजरा केला जात आहे. हा विशेष दिवस साजरा करण्यामागील उद्देश हा आहे की आईच्या निःस्वार्थ सेवेबद्दल आणि प्रेमाबद्दल आभार आणि कृतज्ञता दाखवता यावी.

“घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही.
जीवनात आई नावाचे पान कधीच मिटत नाही.”

खरंच तर आहे ना आपले पूर्ण अस्तित्व आणि आयुष्य हे आईची देणं असते. आई आपल्याला नऊ महिने पोटात वाढवते. आपल्याला न पाहता आणि आपल्या जन्माच्या आधीपासून ती आपल्यावर प्रेम करत असते. जन्माला आल्यावर देखील ती आपल्याला जीवापाड जपते. ती आपली पहिली गुरू आणि मार्गदर्शन असते. ती आपल्याला चालायला, बोलायला शिकवते. चांगले-वाईट गोष्टीमधील फरक ती आपल्याला शिकवत असते. वेळप्रसंगी ती आपल्याला रागावते बोलते पण सगळं आपल्या चांगल्यासाठीच असते.

तिच्या इतके प्रेम आपल्यावर जगात कोणीच करू शकत नाही. आईचे प्रेम अनमोल आहे, त्याची तुलना जगातील कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही. लहानपणी जसं होतं तसं लहानाचे मोठं झाल्यावरही आईचं प्रेम तसंच राहतं. आईच्या प्रेमाची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. आईचे आपल्या मुलावरचे निःस्वार्थ प्रेम हे आयुष्यभर असते. मूल तिच्या जवळ असो की दूर याने काही फरक पडत नाही. आई ही फक्त एक आई असते.जिची आपल्या मुलाच्या संगोपन आणि संगोपनात सर्वात महत्त्वाची भूमिका असते.


“ तू आहेस मंदिराचा उंच कळस
तू आहेस अंगणातील पवित्र तुळस
तू आहेस भजनातील पवित्र अशी संतवाणी
तू आहेस माठातले थंडगार पाणी
तुझ्याशिवाय आई हा जन्म व्यर्थ आहे.
तू आहेस म्हणून माझ्या असण्याला अर्थ आहे.”

असं म्हणतात की देव स्वतः सगळीकडे उपस्थित राहू शकत नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली. आणि खरंच आहे आई आपल्यासाठी देवा पेक्षा कमी नसते. कारण तीच एक असते जी आपल्यावर जीवापाड आणि निःस्वार्थ प्रेम करत असते. तिच्या कुशीत विसावलं की आपल्या मनाला जी शांती आणि जो धीर मिळवितो. तो जगात कुठेही मिळू शकत नाही.ती वात्सल्याचा निर्मळ झरा असते. तिच्यासाठी आपण तिचे संपूर्ण जग आणि आपल्यासाठी ती जगातील सगळ्यात विश्वासहार्य व्यक्ती असते.आपण किती ही मोठे झालो तरी आपली काळजी करणारी तिचं असते.

आईपुढे देवही नतमस्तक होतात. फक्त आईच असते जी आपल्या मुलाच्या हृदयातील सर्व काही त्याच्या डोळ्यात बघून समजते. मुलाचा प्रत्येक चिंता, त्रास आईला जाणवतो. तेंव्हा आई प्रत्येक वेदना सहन करत असते. आई ही आपल्या मुलाची ढाल असते आणि जगातील कोणतीही समस्या तिच्या मुलाला स्पर्श करू शकत नाही.

“आई म्हणजे दैवत
आई म्हणजे माया
आई म्हणजे सुखाची छाया.”

एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. तुम्हा सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक आणि मनस्वी शुभेच्छा!