Login

मिसेस महाराष्ट्र क्वीन स्पर्धा

प्रत्येक स्त्री ही सुंदर असते कारण ती स्वतःचं लग्न विसरून तिच्या घरासाठी जगत असते.
"आणि मिसेस महाराष्ट्र क्वीन 2025 हा मानाचा किताब जिंकणारी स्पर्धक आहे मिसेस नंदिता जाधव.."
अचानक सगळीकडे रॅपिड फायर झाला. मानाचा ताज नंदिताच्या डोक्यावर सजवला गेला. कालपर्यंत साधीशी गृहिणी असणारी ती आज मिसेस महाराष्ट्र क्वीन झाली होती.
तिला तिच्या भावना व्यक्त करण्याची विनंती करण्यात आली. नंदिताने हातात माईक घेतला आणि आठवला तिला तिचा भूतकाळ..
21- 22 वर्षाची नंदिता नुकतंच कॉलेज संपलं होतं. सुहासचं स्थळ सांगून आलं आणि आई-बाबांनी लगेच लग्न करून दिलं. सुरुवातीला काही दिवस नोकरी केली तिने एका फर्ममध्ये, पण मिनू झाली आणि तिने नोकरीतून गॅप घेतला. मीनू थोडी मोठी झाली की लगेच दुसरी गोड बातमी आली आणि विनू चा जन्म झाला. पुढे सासूबाईंचा आजारपण त्यांचं अकाली जाणं. संपूर्ण घराची जबाबदारी सासऱ्यांचे पथ्य पाणी सगळं नंदिताला बघावं लागलं. या सर्वांमध्ये स्वतःसाठी वेळ काढणं स्वतःच्या आवडीनिवडी जपणं तिला कधी करताच आलं नाही. चाळीशतली नंदिता अगदी पन्नाशीची दिसायला लागली होती.
हल्ली तर सुहास पण तिला टोमणे मारत होता, "काय दिवसभर तो कळकट गाऊन घालून फिरत असतेस, जरा तरी फ्रेश राहत जा, घरीच तर असतेस,काय करतेस दिवसभर?"
तिला आतून म्हणावसं वाटे, "एकदा पहाटे पाचला उठून बघ ना, सर्वांचे डबे वेगवेगळ्या नाश्त्याच्या फर्माईशी, दिवसभर अस्ताव्यस्त झालेलं घरावरून संध्याकाळचे जेवण. मागचे आवरावर करून झोपायला बारा वाजतात. कुठे वेळ मिळतो यातून स्वतःसाठी?"
पण ती ते शब्द तसेच गिळून टाकत असे, उगाच वाद घालायची सवयच नव्हते तिला.

त्यादिवशी मेनू कॉलेजमधून आली ती अगदी आनंदाने उड्या मारतच.. आल्या आल्या तिने मोबाईल दाखवत नं नंदिताला सांगितलं "आई तुला माहितीये, एक स्पर्धा आहे मिस महाराष्ट्र प्रेरणा नावाची ज्यामध्ये मी भाग घेते हा. संपूर्ण महाराष्ट्रातून होणार आहे ही स्पर्धा."
नंदिता ही कौतुकाने तिच्या मोबाईल मध्ये बघू लागली,
"अग बाई! हो का, घे हो तू भाग आणि जिंकून ही दाखव, मी ही कॉलेजमध्ये असताना अशा अनेक स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. आणि जिंकायची सुद्धा."

"अगं आई कॉलेजमध्येच काय तू तर आत्तासुद्धा स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतेस आणि जिंकूही शकतेस."मिनू उत्साहाने म्हणाली.

"छे ग, आता कुठे मला काय येतं, आणि मुळात ह्या सौंदर्य स्पर्धा ज्या असतात त्यात भाग घेण्यासाठी सौंदर्य गरजेचं असतं."नंदिताला उगाचच स्वतःच्या पांढऱ्या केसांची आठवण झाली. मीनूने लगेच तिचा हात हातात घेतला
"आणि ती तू आहेस आई, कोण म्हटलं तू सुंदर नाहीस तू इतकं छान जेवण बनवतेस, छान छान रांगोळ्या काढतेस, भजन म्हणतेस, पाळणे गातेस, घर सजवतेस किती सारे टॅलेंट आहे तुझ्यात."
"अग ते तर प्रत्येकच बाई करते, तिच्या घरासाठी तिच्या मुलांसाठी."
"हो ना, मग आता हीच गोष्ट कर तू स्वतःसाठी, जिंकण्यासाठी कारण ही स्पर्धा आहे मिसेस महाराष्ट्र क्वीन ही स्पर्धा प्रत्येक स्त्रीसाठी आहे ज्यामध्ये वयाची दिसण्याची कसलीही अट नाही अट आहे ती फक्त टॅलेंटची, तुमच्यात अशी कुठलीतरी खास गोष्ट असेल तर तुम्ही नक्कीच जिंकू शकता असं ब्रीदवाक्यच आहे त्यांचं."
मिनूच ऐकून नंदितालाही कुठेतरी वाटू लागलं की करून बघायला काय हरकत आहे.

हो नाही करत शेवटी नंदिता तयार झाली. आणि आत्मविश्वासाने सर्व फेऱ्या पार करून आज ती स्पर्धा जिंकली होती. तिच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.
तिने बोलायला सुरुवात केली, "एक स्त्री खूप काय करू शकते फक्त तिच्याकडे आत्मविश्वास पाहिजे, केवळ गृहिणीच नाही तर अशा कितीतरी स्त्रिया आहेत ज्या स्वतःचा बिजनेस नोकरी सांभाळून घर सुद्धा तेवढ्याच जबाबदारीने सांभाळतात मुलांना संस्कार देतात, पण हे सगळं करत असताना त्या स्वतःसाठी जगायचं विसरूनच जातात. लोक नेहमी विचारतात – "तू काय करतेस?"
पण खरं सांगायचं तर –
आपण खूप काही करत असतो… फक्त आपल्याला सवय असते गप्प राहायची.
आज मला इथे उभं राहून एकच सांगायचं आहे –
तुमचं अस्तित्व महत्त्वाचं आहे.
तुमची स्वप्नं, तुमच्या आवडीनिवडी, तुमचा आवाज…
हे सगळं ऐकवलंच पाहिजे.
आजच्या दिवशी फक्त क्राऊन नाही मिळालं मला,
तर स्वतःवरचा विश्वास परत मिळाला आहे.
आणि हेच मी तुम्हा सगळ्या बहिणींनाही सांगू इच्छिते –
स्वतःवर विश्वास ठेवा.
कारण तू आहेस, म्हणून घर आहे,
आणि घर आहे, म्हणून सगळं आहे!"

अशा कित्येक महिला आहेत, ज्यांच्याकडे खूप टॅलेंट असतं पण घर,नोकरी, मुलं बाळ सांभाळताना त्या स्वतःलाच हरवून बसतात.. अशा प्रत्येक स्त्रीसाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक अनोखी स्पर्धा..

मिस महाराष्ट्र प्रेरणा आणि मिसेस महाराष्ट्र क्वीन 2025
मिस महाराष्ट्र प्रेरणा व मिसेस महाराष्ट्र क्वीन स्पर्धा

(ऑगस्ट २०२५ – ग्रँड फिनाले, विरार)

स्पर्धेचा उद्देश:

या स्पर्धेचा हेतू केवळ सौंदर्य नव्हे,
तर महिलांमधील आत्मविश्वास, विचारशीलता, कला, आणि सामाजिक सजगता यांना प्रोत्साहन देणं आहे.

या स्पर्धेच्या माध्यमातून –
फक्त तरुणीच नाही तर सर्व गृहिणी, कामकाजी महिला, विधवा, सिंगल मदर, शिक्षिका, उद्योजिका, कलाकार...
सर्व महिलांना त्यांचं खऱ्या अर्थाने अस्तित्व दाखवता येतं.

फॉर्म भरण्याची माहिती:

फॉर्म सुरू: 1 जुलै 2025 पासून
फी: ₹499 (पहिल्या 50 महिलांसाठी ₹399)
फॉर्म – ऑनलाईन व ऑफलाइन दोन्ही स्वरूपात
ग्रँड फिनाले – ऑगस्ट 2025 मध्ये, विरार

अधिक माहितीसाठी - 9764785793 या नंबर वर संपर्क करा.


विभाग:

1. मिस महाराष्ट्र प्रेरणा- सोळा वर्षापासून पुढे सर्व अविवाहित मुलींसाठी
2. मिसेस महाराष्ट्र क्वीन – सर्व विवाहित स्त्रियांसाठी