Login

मृगजळ आभास भाग 1

Mrugjl
भाग 1 मृगजळ

सासू सून जेवायला बसतात

सासू जेवायला बसतांना स्वतःच्या ताटात जास्त वाढते आणि सुनेचा ताटात... कमी

तेव्हा मुलगी म्हणते आई वहिनीला जास्त वाढ ती माझ्या माहेरपणासाठी स्वतः तारेवरची कसरत करते..म्हणजे तिला जास्त मेहनत करावी लागत आहे...मी आरामाला यावे म्हणून तिने आग्रह धरला होता...

सासूबाई .. अग तिला आयते मिळते ना तेच नशीब ,इथे कमवावे लागते ,घरचे काम तर कोणी ही करतेच ,त्यात काय मोठी गोष्ट आहे...जेवण मिळण्यापूरते काम तर करते ती..

लेक...आई मी माझ्या सासूबाईला ह्याच गोष्टी वरून खूप भांडून घर सोडून आले आणि त्यांना सांगितले की मी पुन्हा इथे येणार नाही ,मी मोलकरीण नाही..तुम्ही आणि तुमचे घर आणि सगळा व्याप तुमचा तुम्हीच सांभाळा... हे तूच मला करायला सांगितले होते ,म्हणजे माझ्या सासूबाईला चार दिवसात कळेल की घरात काम किती आहे आणि ते करताना माझी किती फरफट होते , मी किती थकून जाते , आणि तू मला सांगितले की मी सरळ माहेरी निघून येऊ..आणि मी तेव्हा चार पाच दिवस माहेरी निघून ही आले होते..आणि तू सांगितल्या प्रमाणे सासूबाईला घरातील कामाचा व्याप किती असतो हे कळून चुकले होते ,त्यात त्यांची चांगलीच दैन झाली होती...आणि त्यांना त्यांची चूक ही कळली होती..त्यांनी माझ्या नवऱ्याला सांगितले ही मला परत घेऊन ये..पुन्हा तिला काय काम असते ,ती काय काम करते ह्यावर मी कोणतीच तक्रार करणार नाही.. आठवते का तुला आई हे सगळे करायला मला कोणी सांगितले होते...तू सांगितले होते...तुला जर लेकीची किंमत वाढवण्यासाठी ही युक्ती सुचते तर मग हीच युक्ती वहिनीची किंमत वाढवण्यासाठी मला ही सुचली आहे..मी ही तिला सांगते तू ही चांगले महिना भर माहेरी जाऊन ये मग ह्या तुझ्या सासूला तुझी किंमत कळेल..

वहिनी...अहो ताई आई गम्मत करत आहेत अहो मीच आईंना सांगितले होते की,आयते खाऊन खाऊन मी खूप सुस्त होत चालले आहे ,आणि जरा वजन ही वाढले आहे माझे...आणि त्यामुळे मला माझ्या वजनावर ही नियंत्रण आणायचे आहे , मला तर खूप भूक लागते आणि मग मी ह्या नादात सगळ्यांच्या वाटचे संपून टाकेल , म्हणून आई तुम्हीच मला कमी वाढत जा...म्हणजे मी सुस्त ही होणार नाही आणि जाड ही होणार नाही ,वजन ही मापात राहील ...मग काय आईने काल पासून मला कमी वाढायला सुरुवात केली..त्यात तर नाही नाही म्हणत होत्या , त्या ऐकायला ही तयार नव्हत्या पण मीच खूप आग्रह केला आणि त्यांना ऐकावे लागले...हे जे काही वाढले आहे ना त्यांनी माझ्या ताटात ते माझ्याच सांगण्यावरून वाढले आहे...