भाग 2 मृगजळ आभास...
सासूबाई जरा खजील झाल्या...आपण अति ही करायला नको की आपल्याच मुलीसमोर आपला खुजेपणा उघडकीस येईल..कारण ह्या दोघींचे आता एकमत झाले आहे...लेकीला वहिनी सुटत नाही आणि वहिनीला नणंद...आता ह्या मैत्रिणी झाल्या आहेत म्हणजे मी माझ्या लेकीला इतकी ओळखत नाही जितकी माझी लेक माझ्या स्वभावाला ओळखते...तिला नाहीच आवडणार मी सुने बाबतीत वर खाली पाहिलेले... आणि तशी ही माझ्या लेकीला नारी हक्क आणि सासुरवास ह्या विषयात जरा जास्तच रस आहे हे मला समजायला हवे..
सासू...सुनबाई तू माझी बाजू मांडतेस की माझी चेष्टा करतेस...खरे तेच सांग मी किती सासुरवास करते ते...उगाच मोठेपणा करून माझ्या लेकीच्या नजरेत मोठी होऊ नकोस..
लेक.. सांगून टाक वहिनी , आई सासुरवास करते ते, नाहीतर आहेच माझा तो फॉर्म्युला ,जा सुट्टीवर महिना भर तरी...माझे माहेरपण आईच करेन, मला आराम मिळावा म्हणून तीच घर काम करेन....तुझ्या माहेरी तू जा आणि आराम करून ये...तसे ही खूप दिवस झाले आहेत तुला माहेरी गेलेले...तुझी आई ही वाटत बघत असेल तुझी...मी आहे मी घेईल सांभाळून..आणि हे मी खऱ्या अर्थाने बोलत आहे...नेहमीच माझे माहेरपण आणि त्याचा तुला सासुरवास कश्याला..माझी आई आणि मी जरा आमचा निवांत वेळ मिळेल...थोडे हितगुज होईल ह्या निमित्ताने...
लेक...वहिनी कडे जाऊन तिला सांगते ,वहिनी तू जा काही दिवस माहेरी ,तू खूप थकते आणि तुला ही आराम हवा.. मी समजू शकते हा आराम किती म्हणत्वचा आहे, ह्या रोजच्या कटकटीतून निदान काही दिवस मुक्ती...आई खूप चीड चीड करते आणि मला ते बघवत नाही..तुझा तरी किती अंत पहावा..तुला ही सन्मान आहे ना.. किती अपमान सहन करत जातेस तू आईने केलेला.. मी असते तर सरळ म्हणाले असते नवऱ्याला आपण वेगळे राहू...हा सल्ला तर बऱ्याचदा आईनेचे मला दिला आहे..
वहिनी...आईने हा सल्ला दिला तुम्हाला, वेगळे राहण्याचा...पण तुमच्या सासूने अति केले होते म्हणून दिला असेल हा सल्ला.. नाहीतरी एक आई लेकीचे दुःख बघू शकत नाही..मग निदान तुमचे मन ठेवण्यासाठी त्या असे म्हणाल्या ही असतील..
लेक.. वहिनी पण तरी तू ज्यातून जात आहेस त्यातून मी ही गेले होते ,आणि हो अजून ही जात आहे ,आणि त्यातून बाहेर काढण्यासाठी आईने हा सल्ला दिला होता, मग तुला ही हे करता येऊ शकते..म्हणजे आईला थोडी तरी समज येईल ग..तू जा माहेरी.. मी आहे मी सांभाळून घेईल, आईला ही समजून सांगते ,अति करशील तर अति एकटी पडशील..तिला आता कळायला हवेच माझे माझे.. माझे घर.. माझा पैसा.. माझा मुलगा.. हे सगळे मृगजळ आहे.. दिसते तसे कायमच माझे राहील असे नसते.. आता वय होत आहे....एका वयानंतर परावलंबित्व येतेच.. तिथे माझे पैसे... माझी घर...माझी प्रॉपर्टी.. हे कामाला येत नसते. तिथे आपली सूनच कामी पडते...खुद्द लेक ही आपल्या संसारात अडकलेली असते.. तीचे प्रेम ही मृगजळ सम असते...ती ही दरवेळी येऊन सेवा करू शकत नसते..
क्रमशः... ?
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा