भाग 4 मृगजळ आभास
लेक...बास झालं आई इमोशनल होऊन नकोस.. मला ही एक कळते सगळ्यांचे दिवस सारखे नसतात...सून आली की ती सासू च्या धाकात वावरते आणि सासू म्हतारी झाली की सुनेचा धाकात वावरते..जर असे होवू नये असे वाटत असेल तर आपण जरा तरी सुनेला जीव लावून आपले से करायला पाहिजे...म्हणजे बघ आज तिला तू कॉर्नर करणार ,उद्या तिचे दिवस असले की ती तुला कॉर्नर करणार.. तशी नशिबाने तुझी सून तशी नाही..पण सांगता येत नाही बरं , ( हसून )
वहिनी....ताई अहो माझ्या नशिबाने माझ्या सासूबाईने कधीच मला कॉर्नर केले नाही हो,
लेक...बरं आता सून आपल्या सासूची बाजू घेते तर ...हम्मम...
सासू...दोघींचे ही डाव कळले बरं मला...( हसून)
लेक....चला म्हणजे वहिनी ईथुनपुढे जर ह्या तुझ्या सासूबाईने काही त्रास दिला तर माझ्या कडे एक फॉर्म्युला आहे मी तो तुला निवांतपणे सांगेन...अगदी तो तुझ्या लाडक्या सासूबाईने मला दिला आहे...
सून....ताई त्याची गरज नाही पडणार...मी सांभाळून घेते पण मला तुम्ही आणि तुमची सोबत असताना कोणत्याही फॉर्म्युल्याची गरजच पडणार नाही .. म्हणजे मी तर म्हणते अशी नणंद असताना कोणत्या ही वहिनीला अशी नणंद असताना ह्या फॉर्म्युल्याची गरज पडू नये...ताई कधी कधी मला वाटते आपण माहेरपण घेण्याऐवजी दिले तर किती पुण्य पदरात पडेल ना.
लेक...अग वहिनी तू देतच आहेस ना माहेरपण मला ,मग अजून कोण आहे तुझ्या मत जिला माहेरपण देऊन पुण्य पदरात पडायचे आहे..कोण आहे ही दुसरी मुलगी जिला माहेरपणासाठी तू बोलावणार आहेस बाई वहिनी...सगळ्यांना बोलव पण तू मात्र जाऊ नकोस..
कोण असेल ही जिला माहेरपणाचे सुख देणार होती वहिनी....?
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा