मृगजळ भाग 5
कोण आहे वहिनी ती जिला तू माहेरपणाचे सुख द्यायचे ठरवले आहेस सांग ना...लेक
सून...ताई आहो ,आई
लेक.. आईला माहेरपण ??
सून.. हो आहो ताई ,आईला माहेरपण..
लेक... मग जा तू तुझ्या माहेरी ,छान सुख सुख उपभोगून ये, मज्जा असेल तिकडे तुझ्या माहेरी
सून...ताई माहेरपण माझ्या आईला नाही द्यायचे, तुमच्या आईला द्यायचे आहे, त्यांनी त्यांच्या आयुष्यात लग्नानंतर कधी हे सुख उपभोगलेच नाही असे समजले मला.. त्यांना त्यांच्या बाबांनी ही कधी माहेरी बोलावले नाही ,आईने ही नाही ,बहीण तर नाहीच आईला मग कोण ही असे नाही की जे त्यांना ह्या सुखासाठी बोलवेल..आणि ह्या सुखाची किंमत काय हे आपण दोघी ही जाणतोच ना...उन्हातून थकून आल्यावर विसाव्यासाठी एक सावलीची जागा म्हणजे माहेर पण तेच नेमके आईंना मिळाले नाही...त्यांना फक्त उन्हाचे चटके नशिबात मिळत गेले...म्हणून आईला मी ते सुख द्यायचे म्हणते..
लेक.....आई ,माझी आई !! तिला आणि माहेरपण!!
सून... हो ताई आईला तुमच्या हे सुख मिळालेच नाही...त्यांनी कधी बोलून नाही दाखवले ,त्यांच्या कडक ,हेकेखोर स्वभावाचा आड एक हळवी माहेरवाशीण माहेरपणाला इतकी आसुसलेली असेल असे कधीच वाटले नाही ग...आणि कोणाला त्याची जाणीव ही झाली नाही ,आईने ती जाणीव होऊ ही दिली नाही कधी...तेव्हा त्यांना त्यांच्या सुखापेक्षा आपल्या मुलांचे सुख महत्वाचे होते...ह्यामुळे त्यांनी कायम पडदा टाकला त्यांच्या भावनिक बाजूंवर..
लेक...खरे आहे ग वहिनी ,मी सतत इतर सुनांना न्याय मिळवून दिला आहे ,त्यांना समजून घेतले आहे पण आपली आई ही पण एक सासुरवाशीण होती ,कधी काळी तिने ही सासुरवास भोगला आहे ,पण कधी तिने त्या दुःखाचे आपल्या सारखे प्रदर्शन नाही केले बरं... सहन सहनशील ,सहनशीलता हे शब्द आई कडे बघून लक्षात येतात...म्हणूनच ती इतकी कठोर झाली असावी...त्यात जर माहेरचे आधार असते तर तिला सावरून घेतले असते त्यांनी...पण ते ही नव्हते तिच्या नशिबात...
सून...म्हणून मी आईंचा आदर करते, बोलू दे मला काय बोलायचे ते पण निदान दुःख बाहेर तर पडत असेल, माझ्या बद्दल जी कटुता दाबून ठेवली तर ती निदान वाढीस तरी लागणार नाही ,पण त्या इतर सासू सारख्या नाहीत हे मला पटते... मला ही मूळूमूळू रडतांना पाहिले की त्या लगेच दोन शब्द ऐकवतात , म्हणतात हतासाठी जन्म झाला आहे का...जरा धीट हो..आणि निदान माझ्या समोर रडू नकोस...पण त्यावेळेस त्यांचा राग यायचा...वाटायचे यांना भाव भावना कश्या नाहीत..पण आता समजते त्यांना भाव भावना होत्या म्हणूनच मला रडतांना बघू शकत नव्हत्या..
सासूबाई खरंच चांगल्या होत्या की सून त्यांची बाजू सांभाळून घेत होती ,का सांभाळून घेत असेल सून आपल्या हेकेखोर सासूची बाजू पाहू पुढील भागात..
क्रमशः.?
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा