मृगजळ आभास भाग 6 ( अंतिम )
वहिनी ने आपल्या सासूची बाजू त्यांच्या लेकी समोर सांभाळून घेतली ,तिच्या मनात आई बद्दल उगाच आपल्या मुळे द्वेष वाढिस लागू नये आणि आई लेकीचे नाते दूषित होऊ नये..तिला जरी कळत नसले तरी आपण ते अजून भरीस घालून त्यांच्या मध्ये कटुता निर्माण करू नये हे सुनेला समजत होते..
लेक...वहिनी मी ही देईल आईला माहेरपण, माझे माहेरणाचे हे लाड खूप झाले आहेत ,मी उगाच आईवर चिडते पण जरा समजून घ्यावे म्हणते आईला ह्या पातळीवर...
सून...हो ताई, मी ही चुकते कधी कधी म्हणून त्या ओरडतात...मी आयते खाते म्हणत असतात त्या पण त्या मागे त्यांचा हा हेतू असतो की मी शिकून घरी बसण्यापेक्षा नौकरी करून स्वाभिमानाने जगावे...घर कामात कुठे पैसा मिळतो हे म्हणाल्या भले ही त्या पण त्यांना हेच म्हणायचे आहे की ,सगळ्यांना खुश ठेवणे हे कठीण असते, सगळे खुश राहतील हे कठीण आहे ,म्हणून त्यांच्या सुखासाठी तू तुझी ओळख पुसून टाकू नकोस ,दोन पैसे कमव...हा त्या बोलण्याचा हेतू असावा...म्हणून मी त्यांचे बोलणे मनावर घेत नाही
लेक...अग असा हेतू असेल आईचा तर तू तिचे बोलणे मनावर घे ,घरात बसून राहू नकोस ,आणि नौकरी कर...हा भ्रम आहे की तू राब राब राबलीस तर सगळे खुश असतील तुझ्यावर...तर तसे नाही...कुठे ना कुठे काही ना काही कमी शोधतीलच हे...म्हणून तू खऱ्या अर्थाने बाहेर पडावे..
सून...चला आता खूप बोलणे झाले मी काही तरी आईंचा आवडीचे करते आज , तुम्ही ही सांगा काय बनवू त्यांच्या साठी...
लेक...आज तुम्ही राहू द्या , आजचा संध्याकाळचा स्वयंपाक माझ्या कडून...खूप आयते खाल्ले मी दोन तीन दिवसांपासून ,मला खूप सुस्ती येते, जरा वजन ही वाढल्यासारखे वाटत आहे, थोडी जाड ही झाले आहे आयते खाऊन ,म्हणून आता मी तुम्हाला आयते खाऊ घालावे म्हणते, आयते किती चविष्ट लागते हे वहिनीला ही चाखवावे म्हणते मी...हो ना आई...
सासूबाई.. ..ठरलंय ना तुमचं तर मी आपली शांत बसलेली बरी, नाहीतर पुन्हा मला धडा शिकवायला तयार माझी लेक...
लेक....आई बोलली ,मी आईला समजून घेऊ म्हणते तोच आईला माझ्यात कुठे तरी चूक दिसेल..हया वयात त्रास होत असला तरी त्यांचा त्रास कितपत सहन होईल आपल्याकडून वहिनी.. तरी प्रयत्न करणार मी..
वहिनी.. ताई काही असो, सासूबाईला वयानुसार होणारा त्रास हा उद्या आपल्याला ही होणार नाही हे कशावरुन ,आपण ही असेच वागणार नाही हे कशावरुन ,हे सुख एक मृगजळ आहे हे सगळ्यांना माहीत असते तरी वयानुसार त्याची ही समज कमी होत जाते ,माझ्या ही आईला हेच होत आहे..पण वहिनी सांभाळून घेत आहे.. आणि जे त्या करत आहेत आईसाठी तेच मी माझ्या सासूबाईसाठी करत आहे..वहिनीला कळते हे कोणी मुद्दाम करत नाही ते आपोआपच होते..त्या ही मला समजून सांगतात.. आणि तसे मी ही तुम्हाला समजावून सांगते.. तुम्ही काळजी करू नका..सगळे खेळ आहेत तसे देवाच्या मर्जीने होत आहेत तसेच चालू द्या..
वहिनीला समजत होते आपले माहेरपणाचे सुख जणू मृगजळच ,कारण माहेरी वहिनीने आपल्या आई मध्ये आणि आपल्या मध्ये कटुता निर्माण करून फूट पाडली होती , आणि तिचे माहेर तोडले होते ...पण हेच ती आपल्या नणंद आणि सासूबाई मध्ये दुरावा निर्माण करून इच्छित नव्हती... आता तिच्या ही आयुष्यात नावाला फक्त माहेर होते...
सासरी सगळेच काही वाईट नसतात, तिथे गोड नणंद ही असते ,जिला वहिनीची बाजू घ्यायाला आवडते...
©®अनुराधा आंधळे पालवे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा