Login

मृत्यूचे गूढ भाग १

गूढ
मृत्यूचे गूढ.

"बाबा, उठा ना. डोळे उघडा. तुमची वैदेही तुम्हाला आवाज देतेय. बाबा प्लिज उठा." वैदेही तिच्या वडिलांना उठवण्याचा प्रयत्न करत होती. ते आता कधीच उठणार नव्हते.

निपचित पडलेला त्यांचा देह तिला पाहवत नव्हता.

"वैदेही, तुला  वाढदिवसाच्या खूप खूप  शुभेच्छा." श्रीधर रावांनी वैदेहीच्या डोक्यावर हात ठेऊन शुभेच्छा दिल्या. वैदेही त्यांची  लाडकी एकुलती एक  लेक दिसायला देखणी आणि तितकीच हुशार.  नुकतच एमबीएचं शिक्षण पूर्ण करून वडिलांच्या कंपनीत जॉईन झाली होती. हा वाढदिवस खूप खास होता, कारण आज वैदेहीचा साखरपुडा होता. श्रीधर रावांचा बालमित्र केशव ह्यांचा एकुलता एक मूलगा राजवीरसोबत साखरपुडा होणार होता.  राजवीर देखील हॅन्डसम होता. वैदेहीला साजेसा असाच होता. दोघांचे स्टेटस देखील समान होते. बाबांची लाडकी लेक वैदेही काही महिन्याने राजवीरची बायको होणार होती.

"बाबा, खूप खूप धन्यवाद." श्रीधररावाच्या पाया पडतच ती म्हणाली. तितक्यात वैदेहीची आई नम्रता आली.

"वैदेही बेटा वाढदिवसाच्या शुभेच्छा."  वैदेहीला मिठी मारत म्हणाली.
ती नम्रताच्या पाया पडली.

तर अशी ही संस्कारी वैदेही, आई-बाबांची एकुलती एक परी. परीच होती. आई बाबांनी कसल्याच गोष्टीची कमी नव्हती केली. तिच्या सर्व ईच्छा,आकांक्षा पूर्ण केल्या होत्या.

"वैदेही, तू मेकअप आर्टिस्टला  बोलावणार होती, तुझं बोलणं झालं का?"

"हो आई." ती जरा नाराजीच्या सुरात म्हणाली.
आई-बाबांनी तिची नाराजी ओळखली.

"अगं काय झालं? इतकी नाराज का ?" आईने तिच्या गालावर हात फिरवत विचारले.

"आई, मला असं वाटतयं माझा साखरपुडा खूप लवकर होतोय. थोडं थांबायला हवं होतं का?" हा प्रश्न विचारून ती शून्यात कुठेतरी हरवली.

"वैदेही, आजवर रागळं तुझ्या मर्जीने केलं. तूला बाहेरगावी  शिक्षण पूर्ण करायचे होते ते देखिल ऐकलं; पण  माझी तब्येत कशी असते माहीत आहे ना." ते तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले.

"बाबा, तुम्हाला काही होणार नाही. तुम्ही अगदी व्यवस्थित आहात. हे बोलत असताना तिचे डोळे भरून आले. त्यांच्यावर खूप जीव होता. 
तितक्यात राजवीरचा फोन आला.


"बोलून घे. "
श्रीधर आणि नम्रता दोघेही रूमच्या बाहेर आले.

"तूम्ही का असं बोलला ?" नम्रता म्हणाली.

" नम्रता, खरं आहे तेच बोललो.  सहा महिन्यापूर्वी मला  अटॅक येऊन गेला, तेव्हापासून भिती वाटते, देवाने किती आयुष्य दिले आहे माहीत नाही. श्वास आहे तोपर्यंत जबाबदारी पूर्ण करायची आहे."
हे सर्व ऐकून नम्रताच्या डोळ्यात पाणी आलं.

" हे असं अभद्र बोलू नका. मला ऐकवत नाही. तुम्हाला काही झालं तर मी कसं जगायचं? माझा विचार करा." नम्रताची ती अवस्था पाहून त्यांनाही वाईट वाटलं.

"माफ कर. यापुढे असं काही  बोलणार नाही."
तिच्या डोळयातील पाणी पूसत म्हणाले. तिला किती जरी समजावले तरी त्यांना मृत्यूची चाहूल लागली होती.

"'बरं तयारी झाली आहे ना?" श्रीधररावांनी विचारले.

"हो सर्व तयारी झाली आहे.  वैदुची मैत्रिण प्रिया तिच सर्व पाहत आहे. इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे, तर वैदेही म्हणाली  सर्व तयारी तीलाच करू दे. डेकोरेशन, संगीत, जेवण सर्वकाही तीच मॅनेज करणार आहे. तिला अनुभवही येईल.

इथे वैदेही राजवीरसोबत गप्पा मारत होती.
"माझ्या गोड बायकोला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा."

" थँक्यू सो मच राजवीर" वैदेही

"काय मग झाली का तयारी ?" तो उत्साहाने म्हणाला.


"हो." वैदेही जास्त बोलत नव्हती.

"वैदू आर यू ओके?" राजवीर म्हणाला.

"येस, आय एम फाईन."

"मला नाही वाटत, तुझा  आवाजा तर वेगळच काही सांगतोय." राजवीर म्हणाला.

"राजवीर, खरं सांगू का? मला खूप वाईट वाटतयं. आई-बाबांना सोडून सासरी जावं लागणार. त्यांची सवय झाली आहे. त्यांच्याशिवाय मी कशी राहणार?"


"माझ्याकडे एक मस्त प्लॅन आहे. सांगू का?"

"काय प्लॅन?"

"मी घरजावई होतो. चालेल ना तुला?" असं बोलून तो हसायला लागला.

"राजवीर तू  ना खरंच?" वैदेही लटक्या रागात म्हणाली.


"वैदेही, खरं तर ह्याबाबतीत मूलीचं कौतूक वाटतं. आई-वडील सर्वांना सोडून दुसऱ्या घरी जायचे.  सासरी सर्वांना आपलसं करायचं. हे सगळं विचार करुनही घाबरायला होतं आणि तुम्ही तर  करता."

राजवीर खूप समजूतदार होता. खरंतर वैदेही त्याचं पहिलं प्रेम.   नेमकं त्याच्या वडिलांनी म्हणजे केशवने  वैदेहीबद्दल लग्नासाठी विचारले.  राजवीरने देखिल आढेवेढे न घेता होकार कळवला.

आज साखरपुडा होता आणि  सहा महिन्याने लग्न होतं. वैदेहीला तिच्या बाबांची काळजी सतावत होती.


'मी गेल्यावर कसं  होईल? बाबा गोळ्या देखील  वेळेवर घेत नाही. रोज आठवण करून द्यावी लागते. खाण्याकडे देखील दुर्लक्ष करतात.' हेच विचार तिला सतावत होते.

बाबांची लाडकी लेक बाबांचा जास्त विचार करत होती.
तिला माहीत नव्हतं पुढे काय वाढून ठेवले आहे.