कथेचे नाव : मुखवटा ( भाग ५)
विषय : रहस्यकथा.
फेरी: राज्यस्तरीय कथामालिका स्पर्धा.
मैथिली आता बरी होत होती. एक कुटुंब म्हणून घरातील सगळे तिची चांगली काळजी घेत होते. त्याच काळजीमुळे ती आता अजुन तिच्या ध्येयासाठी तयार होत होती.
आज ब-याच दिवसांनी मैथिली खाली नाश्त्यासाठी आली होती. सगळ्यांना तिला तसे पाहुन छान वाटले होते तरीही अजुनही तिच्याबाबत सर्व साशंकच होते. तिच्याबाबतची साशंकता नाही म्हटले तरी योग्यच होती कारण त्यादिवशी तिला आजींनी पाहिले होते. तिच्या चेह-यावरचे हावभाव जोखले होते तेव्हाच त्यांची खात्री झाली होती की ही मुलगी दिसते तशी नाही आहे.
" अरे मैथिली! बरे वाटते आहे का आता? ", आजी.
" हो आजी, खुप छान वाटत आहे. तुमच्यामुळे मी आज बरी झाले. सर्व कुटुंबाने माझी छान काळजी घेतली त्यामुळेच मी आज माझ्या पायावर उभी आहे यासाठी मी तुमची ऋणी आहे. ",मैथिली
मैथिली अगदी मनापासून ते सर्व म्हणाली होती पण शेवटी राणावत कुटुंब ते! इतक्या सहजासहजी कोणाला चांगले म्हणतील तर नशीब. मैथिली जे म्हटली ते मनापासून म्हटली होती आणि हेड सगळ्यांच्या लक्षात आले होते पण तरीही सगळे शांत होते.
" अगं त्यात काय? तु आमची पाहुणी म्हटल्यावर तुझी काळजी घेणे कर्तव्य होते आमचे? ",आजी तिरकस हसत म्हणाल्या. आजींचे तिरकस बोलणे मैथिलीला कळाले होते पण तिकडे दुर्लक्ष करत ती पुढे बोलु लागली.
" हो बरोबर आहे तुमचे, मी पाहुणी आहे तुमची त्यामुळे कर्तव्य करणे गरजेचेच होते. "...... मैथिली.
मैथिलीच्या बोलण्यात नाराजीचा सूर होता आणि तो सगळ्यांच्या लक्षातही येत होता पण पण पण अहो राणावतच ते ....
" पुढे काय करायचे ठरवले आहेस तु आता? ", आजोबा.
" आजोबा, माझे बी. एड्. झाले आहे त्यामुळे मी कोणत्या तरी स्कूलमध्ये चौकशी करते. ", मैथिली.
" अरे वा छान! ", आजोबा.
" एक प्रॉब्लेम आहे पण! ", मैथिली.
" कसला प्रॉब्लेम आहे आता? ", नितेश कपाळावर आठ्या आणत म्हणाले.
" सर, माझी कागदपत्रे त्यादिवशी हरवली ज्यादिवशी मी यांना सापडले होते. ", मैथिली अर्जुनकडे पाहत म्हणाली
" काय? ", सगळे एकसाथ.
" हो! ", मैथिली खाली मान घालून म्हणाली.
" कागदपत्रे नसताना कसे काय तुला काम मिळणार? ", आजी डोक्याला हात लावून म्हणाल्या.
" आजी, एक विचारले तर चालेल का? ", मैथिली.
" विचार! " , आजी.
" आजी, माझ्या शिक्षणावरुन मला नवी आणि पार्थच्या स्कूलमध्ये मिळेल का काम? ", मैथिली सगळ्यांचा अंदाज घेत म्हणाली.
" तुला कळते आहे का तु काय म्हणते आहे ते? ", आजोबा चांगलेच भडकून म्हणाले.
" सॉरी आजोबा, मला तुम्हाला दुखवायचे नव्हते पण प्लीज माझा मुद्दा लक्षात घ्या. ज्या अनुषंगाने मी शिक्षण घेतले आहे त्या अनुषंगाने मला दुसरीकडे कागदपत्रे नसताना काम मिळणार नाही. नवी आणि पार्थ जिथे शिकतात ते तुम्ही सुरू केलेले स्कुल आहे आजोबा त्यामुळे मला तिथे लगेच काम मिळेल. ", मैथिली स्पष्टीकरण देत म्हणाली.
" मैथिली, माझी मुले, माझी नातवंडे, मी सुरु केलेल्या शाळेत शिकली आणि शिकत आहेत पण याचा अर्थ असा नाही की ते सहजासहजी तिथे पोहोचले आहेत. त्यासाठी त्यांनी मेहनतही तितकीच घेतली आहे. माझी स्कूल म्हणून माझी मुले तिथे वशिल्याने नाही तर त्यांच्या जोरावर त्या स्कूलमध्ये होते. मी कधीही त्यांच्याबाबत स्कूलचा निर्णय घेतला नाही. इतर मुले जशी स्कुलसाठी होती तशीच माझी मुले व नातवंडेही. त्यांना काही वेगळे अधिकार नाही मिळालेत माझे कुटुंब असण्यासाठी त्यामुळे तुला कोणत्या गोष्टींच्या आधारे मी काम देऊ? ", आजोबा पुन्हा कडाडले.
" आजोबा, शांत व्हा. कोणा बाहेरच्यासाठी तुम्ही का तुमचा मुड खराब करत आहात. ", अर्जुन मैथिलीकडे रागात पाहत म्हणाला.
" आजोबा, प्लीज मला समजून घ्या. काम मिळाले आणि पहिला पगार झाला की त्याच दिवशी मी घराच्या बाहेर असेन याची खात्री देते मी तुम्हाला पण त्यासाठी सध्या तुम्हाला माझी मदत करावी लागेल. ", मैथिली.
" मला विचार करायला वेळ हवा आहे. त्यानंतर सांगतो मी काय ते? ", असे म्हणत आजोबा त्यांच्या रुममध्ये निघून गेले.
आजोबा जाताच बाकी मंडळीही जागेवरून उठून आपापल्या कामाला गेली. नवी व पार्थ तर खुष होऊन मैथिलीला बिलगले. या दिवसांमध्ये मैथिली जास्त जवळ या दोघांच्याच आली होती. नकळतपणे मैथिलीने अवनीची कमी काही अंशी पुर्ण केली होती या दोघांच्या आयुष्यात त्यामुळे आता आपली आंटी आपल्यासोबत स्कूलमध्येही येणार यामुळे खुप खुष झाले होते दोघेही.
" आंटी, तु येणार का आमच्यासोबत स्कूलमध्ये? ", नवी म्हणाली. तिला मैथिली काही उत्तर देणार तेवढ्यात अर्जुन म्हणाला.
" नवी पार्थ, निघा तुम्ही स्कूलमध्ये. उशीर होईल तुम्हाला. ", अर्जुन.
" हो चाचू! ", असे म्हणत नवी व पार्थ निघून गेले.
" चलाख लोमडी, गोष्ट ऐकली आहे का ही? ", अर्जुन मैथिली जवळ येत म्हणाला. त्याच्या बोलण्यावर मैथिली गप्प बसली. तिला हा विषय जास्त ताणायचा नव्हता त्यामुळे तिने शांत राहणेच पसंत केले होते. अर्जुनच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करुन ती जातच होती की अर्जुनने तिचा हात पकडला.
" लक्षात ठेव, माझी नजर २४ तास तुझ्यावर आहे. जास्त काही करण्याचा विचार पण करायचा नाही नाहीतर काय होईल याचा तु विचारही करु शकणार नाहीस. समजले का? "..... अर्जुन.
" सर, मी फक्त माझी बाजू मांडली आहे. मला फक्त स्वत:च्या पायावर उभे राहयचे आहे आणि कागदपत्रे नसल्याने माझ्यासाठी ते सहज शक्य नाही आहे म्हणून मी आजोबांना विनंती केली होती. ".... मैथिली.
अर्जुनला तिचे बोलणे पटले तसा तो काही न बोलता तिथून निघून गेला आणि मैथिली तिच्या कामाला लागली.
क्रमशः
देतील का परवानगी आजोबा तिला शाळेत काम करण्याची तेही नवी व पार्थ सोबत? काय वाटते तुम्हाला?
विशाखा शिगवण
टिम पुणे