Login

मुखवटा ( भाग १)

A Story Of Fighters

           निर्मनुष्य रस्ता आणि त्या रस्त्यावर चालणारा तो. त्याने त्याचा पुर्ण चेहरा झाकला होता पण नजर अशी भेदक आणि करारी होती त्याची की एखाद्याने त्या नजरेत त्या वेळेला पाहिले असते तर त्या माणसाच्या अंगावर नक्कीच भितीने शहारा आला असता एवढा त्यात भेदकपणा होता. नजर भिरभिरत ठेवत तो पाहिजे त्या ठिकाणी पोहोचला. हळुच भिंतीवरून ऊडी मारुन तो आत शिरला. जरा कानोसा घेत त्याने कोणाला तरी मेसेज केला तसे काही वेळातच एक फुलपाखरू त्याच्या डोक्यावरून ऊडत गेले. त्या फुलपाखराला पाहुन तो हसला आणि योग्य वेळेची वाट पाहु लागला. त्याचा मोबाईल वाजला तसं त्याने तो ओपन केला आणि त्यावर आलेला व्हिडिओ पाहु लागला. पुर्ण व्हिडिओ पाहुन होताचं तो अँक्शन मोडमध्ये आला आणि त्याने त्याचे काम चालु केले. पुढच्या अर्ध्या तासात ती बिल्डिंग जवळ जवळ २० प्रेतांनी भरली होती. पोलिसांना फोन करुन, सिम कार्ड डिस्ट्रॉय करत त्याने तिथुन पोबारा केला आणि गुपचूप घरी येऊन तो झोपुन गेला.


          आज राणावत फॅमिलीची सकाळ काही वेगळीच होती. गोंधळ झाला होता सकाळी सकाळी आणि त्याला कारणीभूत नवीन आलेले पाहुणे होते. सकाळी अर्जुनला जाग आली ती कोणत्यातरी आवाजाने. त्याने कानोसा घेतला तर बाहेर गार्डनमधुन आवाज येत होता. कानोसा लागला तसा तो ऊठुन बाल्कनीत गेला आणि बाल्कनीतुन बागेतला नजारा पाहुन त्याने कपाळावरचं हात मारला. घरातले सगळे लहानमोठे एकमेकांना हाताशी धरुन कसरत करत होते. त्याला ते खुप हास्यास्पद वाटले तेव्हा. त्याची झुंड काय आहे हे त्याला चांगलेच माहीत होते त्यामुळे हा बनाव कोणासाठी आहे हे काही त्याला कळेना. मागच्या काही दिवसांमध्ये त्याला घरी वेळचं देता येत नव्हता त्यामुळे घरातील सगळे नेमके कशात व्यस्त आहेत हे त्याला माहीत नव्हते. आता हे असे कसरती चाळे पाहून काहीतरी घडले आहे घरातं याची त्याला जाणीव झाली आणि त्याने पटकन आवरुन खाली जायचे ठरवले.

             तो खाली आला तेव्हा घरचे सगळे नाश्त्याला बसले होते. तो शॉक होऊन सगळ्यांना पाहतं होता. व्यायाम केल्यानंतर नाश्ता करणे म्हणजे.......! कस शक्य होतं ते? नक्कीच गोंधळ चालु आहे यांचा कहा, असे मनातच म्हणतं तो डायनिंग टेबलाजवळ गेला.

" अरे अर्जुन, ये ये. आम्ही केव्हाची तुझी वाट पाहतं आहोत? एवढा वेळ लागतो का खाली यायला तुला. वेळ असेल तर जरा माणसांच्यात बसावे, असं माणुसघाण्यासारखं वागणं बरं नाही दिसतं का तुला! "..... आजोबा अर्जुनवर डोळे वटारत म्हणाले.

      त्यांचे बोलणे ऐकून ईकडे अर्जुनच्या भुवया वर गेल्या. अर्जुनने एकदा सगळ्यांवर नजर फिरवली आणि त्याची नजर एका ठिकाणी स्थिर झाली. त्याच्या समोर एक जोडपे बसले होते जे त्याच्या आई वडिलांच्या वयाचे होते व त्यांच्या शेजारी एक मुलगी बसली होती. तो काय समजायचे ते समजला आणि पुन्हा सगळ्यांकडे बघु लागला तर सगळे बत्तीशी दाखवतं त्याला पाहु लागले. आता एवढ्या सगळ्यांच्या बत्तीशी पाहुन अर्जुन हसणार नाही असे होईल का? एक छान स्माईल आली त्याच्या चेहर्यावर आणि तो गोड हसला तशी ईकडे कोणाचीतरी विकेट पडली.

         अर्जुन राणावत, एक डॅशिंग व्यक्तिमत्त्व. दिसायला कडक आणि स्माईल तर त्याहून कडक. मुलींची रांग संपणार नाही ईतक्या मुली त्याला लग्नासाठी सांगुन यायाच्या पण हा पठ्ठ्या कोणाला बधेलं तरं ना! त्याला त्याच्यासारखीच व त्याच्या अर्धवट डोक्याच्या माणसांना सांभाळणारी हवी होती मुलगी त्यामुळे तो "चार हात लांब" या तत्त्वावर राहायचा. " चान्स नको आणि नंतर गोंधळ नको, त्यापेक्षा एकटा बरा".

         अर्जुनच्या घरी त्याचे आई बाबा, आजी आजोबा, दादा वहिनी, छोटी बहीण आणि दोन छोटी पिल्ले असायचीतं. सगळे एकास एक बिलंदर. कोण कोणाला कमी नाही की जास्त नाही, अगदी एकरुप असे. एकमेकांना एकमेकांकडे पाहुन घडवले होते त्या सर्वांनी आणि तसे ते घडलेही होते. अर्जुन व त्याचा भाऊ अर्णव त्याच्या वडिल व आजोबांच्या पाऊलावर होते तर छोटे कॅप्टन आर्या व श्वेत बाकी सगळ्यांच्या पाऊलावर होते. अर्जुन व अर्णवने काही गोष्टी अगदी छान पद्धतीने मुलांना शिकवल्या होत्या जेणेकरून गरज लागेलं तेव्हा मुले त्या गोष्टी वापरु शकतील.

          अशा या फॅमिलित एन्ट्री झाली होती ती नको त्या माणसांची. अर्जुनसाठी त्याच्या आजीच्या आजोळच्या गावाकडून स्थळ सांगुन आले होते आणि बाकी सगळ्यांची ईच्छा असो वा नसो त्यांना काहीही बोलता आले नव्हते कारण ते आजीच्या वडिलांचा जे अजुनही होते पण आता थकले होते पुर्णपणे, त्यांचा रेफरन्स घेऊन आले होते. आजीच्या वडिलांना खुप मानायची राणावत फॅमिली त्यामुळे जास्त काही न बोलता त्यांना हे प्रकरण मिटवायचे होते.

      अर्जुनने हळुच त्याच्या सेनेला विचारले तेव्हा त्यांनी नंतर सांगतो म्हणून अर्जुनला गप्प केले होते. नाश्ता झाला तसा अर्जुन बाहेर जायला निघाला तेव्हा आजीने हळुच त्याला आवाज दिला. आवाज ऐकताच त्याने मागे वळून पाहिले तर आजी केविलवाणा चेहरा करुन अर्जुनला पाहतं होती. अर्जुनने आजीला नजरेनेच आश्वस्त केले  तेव्हा कुठे त्या शांत झाल्या आणि त्या लोकांची ओळख करुन द्यायला लागल्या.

" अर्जुन, हे आपल्या दाजी आजोबांच्या मित्राचा मुलगा. ही त्यांची बायको आणि ही मुलगी. यांच्याकडून तुला मागणी आली आहे लग्नासाठी. "..... आजी.

" आजी, तुलाही माहिती आहे मला कशी मुलगी हवी ते. सर तुमची मुलगी छानच आहे पण माझ्या काही अपेक्षा आहेत मुलीकडून त्या तुमची मुलगी पुर्ण नाही करु शकतं त्यामुळे मी तुमच्या मुलीला होकार देऊ शकतं नाही. ".... अर्जुन स्पष्टपणे म्हणाला.

" बाळा, एकदा बोलुन तर बघं. माझी मुलगी सर्वात हुशार आहे, तुला सुखात ठेवेल. ".... मुलीचे वडील म्हणाले.

" सर, आल्यापासून तुमची मुलगी नुसतीच लाजते आहे. मला माझ्या डोळ्यात डोळे घालुन पाहणारी मुलगी हवी आहे नाकी लाजत बसणारी त्यामुळे सॉरी मला नाही जमणार आणि तसेही समोरचा माणूस कसा आहे हे मला चांगलेच कळते. "..... अर्जुन.

" अर्जुन, असे बोलु नये. हे पहा दिनकरराव; मी माझ्या मुलांवर कधीही जबरदस्ती केली नाही कुठल्याच गोष्टीची. त्यात तुमची मुलगी आमच्या घरात अॅडजस्ट होणे म्हणजे शक्यच नाही तर तुम्ही पुढे विचार न केलेलाच बरा. "..... नितेश राणावत ( अर्जुनचे बाबा म्हणाले.)

        त्यांच्या बोलण्यावर दिनकरराव व फॅमिली थोडी खट्टु झाली होती. अर्जुन त्यांना खुप आवडला होता पण त्याचा तो तोरा सांभाळणे आपल्या लेकीला काय जमायचे नाही हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी मनोमन माघार घ्यायची ठरवले. ( जास्त विचार करु नका दिनकरराव, तुमच्या मुलीला पुर्ण घराचा तोरा सांभाळणे जमणार नाही त्यामुळे हा विचार करुच नका.)

क्रमशः


टिम  पुणे

विषय- रहस्यकथा.