Login

मुखवट्याच्या मागचं सत्य भाग -1

एका निरागस मुलाच्या आयुष्यात प्रेमाच्या मुखवट्यामागे लपलेलं क्रूर सत्य हळूहळू उलगडत जातं.
मुखवट्याच्या मागचं सत्य
भाग – 1
जलद लेखन स्पर्धा – नोव्हेंबर 2005

यश लहान मुलगा होता. आजच त्यांची आई वारली होती.
ती सतत आजारी राहत असे, आणि आज अचानक ती वारली.
यश खूप रडत होता. त्याची आत्या त्याला समजवत होती.

कोणी, कोणी त्यांच्या सोबत राहत होते.
यशची आजी हे सगळं बघत होती.

काही दिवसांनी पाहुणे पण निघून गेले…

आजी बसल्या होत्या. यशचे बाबा आजी जवळ बसले होते.

“मी काय म्हणते, विकास… तू आता दुसरे लग्न कर.
यश खूप शांत झाला आहे. कोणासोबत बोलत नाही.
एकटा बागडत असतो. तुझे पण वय काही जास्त झाले नाही आहे.
तू लग्न केले तर यशला आई मिळेल. मी किती दिवस तुम्हांला पुरणार आहे?”
आजी म्हणाल्या.

विकास पण विचार करायला लागले. त्यांनी यशला बोलावले.

“यश, तुला आई हवी का?” विकास म्हणाले.

चार,पाच वर्षाच्या मुलाला आई हवीच होती. तो लगेच म्हणाला,
“हो बाबा, मला आई हवी आहे. तुम्ही लवकर घेऊन या.” यश म्हणाला.

विकासने त्याला आपल्या कुशीत घेतले.
त्यांना पण वाटू लागले, यशला आईची गरज आहे.
मग ते दुसरं लग्न करायचा विचार करतात.
त्यांच्या आईलाही ते सांगतात.

विकासच्या आई शेजारच्या ताईकडे जातात आणि त्यांना सांगतात,
“विकाससाठी चांगली मुलगी असेल तर बघा… यशला पण आई हवी ना.”

“एक मुलगी आहे. तिच्या आई, बाबांना विचारून बघते. तुला सांगायला येते,”
ती बाई म्हणाली.

“विचारून बघ. मला लवकर लग्न करायचं आहे. यशला आईची गरज आहे,”
विकासची आई म्हणाली.

“हो, मी तिला विचारून घेईल,” ती बाई म्हणाली.

“तू विचारून घे. मी निघते,” विकासाची आई म्हणाली आणि घरी आल्या.

यश शांत बसला होता. आजी सांगेल तेच करायचा.

असेच दिवस जात होते.

एके दिवशी शेजारची बाई आली.
विकासच्या आईसोबत बोलत होती.
मुलीकडच्यांनी ‘हो’ सांगितलं होतं.
ती बाई तेच सांगायला आली होती.

विकासच्या आईने लगेच चहा ठेवला.
त्या बाईसोबत गोड, गोड बोलत होती.
त्यांनी चहा घेतला आणि बाई निघून गेली.

थोड्यावेळाने विकास घरी आला.

“विकास, त्या मुलीचं होकार आलाय,” त्यांची आई आनंदात म्हणाली.

“बरं, मग तूच ठरव. मला बघण्याचा प्रोग्राम करायचा नाही आहे.
तू लग्नाची बोलणी करून घे,” विकास म्हणाले.

यशला काय समजलं, माहिती नाही…
पण त्याला खूप आनंद झाला.

“मला आई मिळणार!”
तो आनंदात म्हणत होता.