Login

मुखवट्याच्या मागचं सत्य भाग -2

एका निरागस मुलाच्या आयुष्यात प्रेमाच्या मुखवट्यामागे लपलेलं क्रूर सत्य हळूहळू उलगडत जातं.
मुखवट्याच्या मागचं सत्य
भाग – 2
जलद लेखन स्पर्धा – नोव्हेंबर 2005


विकासच्या आईने सगळं ठरवलं.
त्या मुलीने पण विकासला बघायचं आहे असं काही म्हटलं नाही.
त्यांचं लग्न ठरलं. ते लवकर लग्न करणार होते.

दहा दिवसात त्यांनी लग्न केलं.

लग्न खूप छान झालं.
यश पण खुश होता.

शिल्पा तिचं नाव होतं.
ती यशला खूप जीव लावत होती.
त्याला खायला देत होती.
त्याचे अभ्यास घेत होती.
त्याचे लाड करत होती.

विकास आणि त्यांच्या आईला खूप छान वाटायचं.
घरातलं काम पण छान करत होती.
नवीन, नवीन जेवायला बनवत होती.
सगळं काम मन लावून करत होती.
विकासच्या आईचे पायसुद्धा दाबून देत होती.

असेच पाच, सहा महिने गेले.

शिल्पाला समजलं, ती आई होणार आहे.
तेव्हापासून ती यशला काम करायला लावू लागली.

यशला वाटलं, आईला बरं नाही आहे म्हणून काम सांगते.
असं समजून यश सगळं काम करत होता.

शिल्पाची आता चिडचिड होत होती.
तिला यश सारखा “आई… आई…” म्हणतो ते आवडायचं नाही.

हे सगळं विकासची आई बघत होती,
पण त्या आजारी असल्यामुळे काही बोलू शकत नव्हत्या.
त्यांना सतत यशची काळजी वाटायची.
त्याच चिंतेतच त्या गेल्या…

आता शिल्पा यशला मारतही होती.
जेवण बनवलेलं असलं तरी यशला देत नव्हती.
यश रूममध्ये जाऊन रडत बसायचा.
कोणाला काहीच बोलत नव्हता.
शिल्पाला कामात मदतही करायचा.

विकास घरी आल्यावर मात्र शिल्पा यशला मिठीत घ्यायची,
त्याचे लाड करायची,
त्याला खायला द्यायची.
तेव्हा यश खाऊन घ्यायचा.

असेच दिवस जात होते.

आजूबाजूच्या बायका यशला बोलायच्या
“तुला आई खूप चांगली मिळाली आहे.”

हे ऐकलं की शिल्पाला खूप छान वाटायचं.

यश मात्र अबोल झाला होता.
तो आजूबाजूच्या कोणासोबत बोलत नव्हता.
कुणाशीही संवाद करत नव्हता.

शिल्पा विकासला यशबद्दल सांगायची
“यश बघत नाही, अभ्यास करत नाही.
मला पण त्रास देत असतो.
आता मला सहन होत नाही.
घरातली काम पण असतात.
थोडं यशला करायला लावते…”

ती लहानसा चेहरा करून बोलायची.

विकासला ते खरं वाटायचं.
तो यशला अभ्यास करायला बसवायचा.

यश काही बोलत नाही.
तो खूप शांत झाला होता.
त्याला सगळं सांगायचं होतं…
पण तो खूप घाबरत होता.

कारण त्या घरात मौन म्हणजे
तोड दाबून बुक्क्याचा मार…

काही महिन्यांनी शिल्पाला मुलगा झाला.