सालाबाद प्रमाणे याही वर्षी चॅम्पियन ट्रॉफी ची घोषणा झाली.फॉर्म भरला. ग्रुप ही पडले. खरंतर खूप हुरहुर लागून राहिली होती की ग्रुपमध्ये कोण पार्टनर भेटतील. कशा भेटतील. (मुळात त्यांच्याशी पटेल की नाही.)
ग्रुप नंबर एक मध्ये माझं नाव आल्याची माहिती मिळाली. ग्रुप जॉईन केला तर. सगळ्याच अनोळखी.
( उडी बाबा अब क्या करेंगे )
असं मी मनातल्या मनात म्हटलं.
हळूहळू सर्वांनी आपला परिचय द्यायला सुरुवात केली.
( उडी बाबा अब क्या करेंगे )
असं मी मनातल्या मनात म्हटलं.
हळूहळू सर्वांनी आपला परिचय द्यायला सुरुवात केली.
बाकी तुम्हाला तर माहितीच आहे मी नावाप्रमाणे उत्साही मूर्ती..
कॅप्टन ठरे-ठरेपर्यंत फरमान काढलं, चला ग बायांनो सगळ्यांनी फोटो पाठवा. मला व्हिडिओ आणि पोस्टर बनवायचे आहेत.
पण रिस्पॉन्सच येईना. मग आमच्या धडाकेबाज कॅप्टन नी सांगितलं, "पाठवा ग पोरींनो फोटो."
बरं सगळ्यांनी फोटो पाठवले. व्हिडिओ पण तयार केला. पण कुणीच एकमेकांना ओळखत नसल्यामुळे संवादाची खूप कमी होती.
पण रिस्पॉन्सच येईना. मग आमच्या धडाकेबाज कॅप्टन नी सांगितलं, "पाठवा ग पोरींनो फोटो."
बरं सगळ्यांनी फोटो पाठवले. व्हिडिओ पण तयार केला. पण कुणीच एकमेकांना ओळखत नसल्यामुळे संवादाची खूप कमी होती.
बाकी तसं तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की, मी किती शांत गुणी मुलगी आहे ते. पटकन कुणाकुणावर म्हणून रुसायची नाही.
पण त्या दिवशी मात्र रुसले.
अगदी कोपऱ्यात तोंड फुगवून बसले.
सगळे ग्रुप मेंबर आले मनवायला.
पण मी थोडीच जुमानते कोणाला.
खूपच संयमी बर का आमची कॅप्टन.
खूप लाडीगोडी लावली.
पण तुम्हाला म्हणून सांगते.
मी कुणालाच नाही बोलली.
आणि मग आला एक फोन
मी म्हटलं, "हॅलो कोण?
पलीकडून बोलत होती आमची मुक्ताई.
बोलली "रुसायला काय झालं गं लाडूबाई."
मायेच्या शब्दांन तिने समजूत काढली.
मग काय?
रुसलेली लाडू बाई खुदकन हसली.
हळूहळू एकमेकींना समजून घेतलं आणि सगळ्यांचीच भारी गट्टी जमली.
खरं तर मुक्ता ताईला मी कधीच ओळखत नव्हते. चॅम्पियन ट्रॉफीच्या निमित्ताने तिची ही ओळख. आमचा फोनवर बोलणं झालं तेव्हाच तिच्या शब्दाने तिने माझं मन जिंकून घेतलं. आई-वडिलांची एकुलती एक मुलगी असूनही संस्कार मात्र इतके छान झाले की, समंजसपणा जणू रक्तातच असावा.
तिच्यात आणि माझ्यात एक कॉमन गोष्ट आहे.
ती म्हणजे दोघींनाही लहानपणापासून आयपीएस व्हायचं होतं.
तिच्यात आणि माझ्यात एक कॉमन गोष्ट आहे.
ती म्हणजे दोघींनाही लहानपणापासून आयपीएस व्हायचं होतं.
शिक्षण असो की साहित्य किंवा राजकारण सब जगह राज करके आई है ये हमारी मुक्ताई.
अगदी अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे तिचं. अनेक सामाजिक संस्था सोबत मिळून ती काम करते. तिच्या सोबतच इतर महिला डॉक्टरांच्या सोबतीने कॅन्सर अवरनेस कार्यक्रम तिने केले. सगळं मिळूनही पाय मात्र जमिनीवर. अहंकाराचा स्वभावात लवलेश नाही.

खरंतर मला भरभर कुणाची स्तुती करता येत नाही ( स्वतःची स्वतः सोडून ) म्हणजे ना, शब्दच सापडत नाहीत.
आणि तसंही आमची मुक्ताई म्हणजे खळखळ वाहणारा ज्ञानाचा झरा. तिला शब्दबद्ध करणे खरंतर खूप अवघड गोष्ट.
फक्त एवढेच सांगेल,
तुला देवाने सगळं काही भरभरून दिले. आई-वडिलांचे संस्कार,सासू-सासर्यांची माया, गुणी मुलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीव लावणारा नवरा.
आता आयुष्यात तुझ्या ज्या पण काही इच्छा अपूर्ण राहिल्या असतील त्या पूर्ण होवो. तू अशीच उत्तरोत्तर प्रगती करत जावे.
हीच देवा कडे मनापासून प्रार्थना.
हीच देवा कडे मनापासून प्रार्थना.
आणि देवाला थँक्यू पण म्हणायचं आहे. तुझ्यासारखी गोड मोठी बहीण दिली.
अजून काय लिहू तुझ्याबद्दल.. शब्दच संपले..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा