"मुक्ता हे बघ प्रत्येकाच कर्म वरच्याने लिहिलेलं असत कदाचित सखी च्या बाबतीत काही चांगले घडेलही... काळजी करू नको हे ही दिवस जातील आणि एक दिवस आपल्याला नक्की सखी ची चांगली बातमी कळेल... प्रारब्ध कधीच कोणाला चुकत नाही. मदन ला ही त्याची चूक कळेल एव्हाना कळायला हवी. तू रडू नको उलट तू साजरा कर हा आनंद फक्त तुझा नाही तर आपण सखी चा ही आनंद साजरा करू आणि देवाला प्रार्थना करू की तिला बळ दे तिचं स्वप्न पूर्ण करायचे."- आबा.
मुक्ता ला त्यांच्या बोलण्याने धीर येतो. आई दादा ही तिला समजून घेतात. असेच दिवस जात असतात आता मुक्ता ही जॉब साठी प्रयत्न सुरू करते. एव्हाना तिला कॉम्प्युटर क्लास मध्ये शिकवत असताना बरेच सॉफ्टवेअर कसे वापरायचे हे येत तसेच तिची मेहनत चिकाटी ही असते. जॉब करत ती इंटरव्ह्यू देते आणि अशातच तिची मेहनत फळाला येते तिचे सिलेक्शन होते एका मल्टी नॅशनल कंपनी मध्ये. नवीन असल्या कारणाने ती एक महिना ट्रेनिंग सेक्शन मध्ये असते त्यामुळे फार कमी जणांशी तिची ओळख असते. हळू हळू ती सगळे काम शिकत असते आणि लवकरच तिला आणि तिच्या सोबत काही जणांना एक प्रोजेक्ट दिला जातो.. मुक्ता मन लाऊन काम करते आणि ऑफिस मध्ये तिच्या कामाने सगळ्यांचे मन जिंकते. जिद्द चिकाटी मेहनती म्हणून तिची निवड वेगवेगळ्या प्रोजेक्ट साठी केली जाते. तिच्या कामामुळे वरिष्ठ ही खुश असतात आणि अशातच तिचे नाव हे मॅनेजिंग कमिटी मध्येही चर्चेचा विषय असते कारण आतापर्यंत तिने तिचे काम प्रमाणिक पणे केले होते. ६ महिने कसे गेले कळलेच नाही तिलाही.
"मुक्ता अग नाष्टा तरी करून जा ग बाई...."- आई (विजया)
"आई उशीर होतो ग बस ला एक तर यायला उशीर होतो..."-मुक्ता बॅग आवरत म्हणते.
"मुक्ता आज आधीच तू डब्बा नेणार नाही काय आहे ते ऑफिस मध्ये ऑफिस ॲनिवर्सरी का काय नाष्टा तर कर."-आई
"अग आई आज महत्वाची मीटिंग आहे ग्रुप प्रेझेंटेशन आहे मला वेळेत जायला हवं."- मुक्ता.
"हा डब्बा ने नाष्टा आहे वेळ भेटेल तसं खा."- आई. मुक्ता आई ला बाय करून डब्बा घेऊन निघते. नशिबाने आज बस वेळेवर येते. ऑफिस मध्ये सगळे कामात असतात मुक्ता कामात होती त्यामुळे तिने नेलेला नाष्टा ही केला नाही, ती आणि तिचा ग्रुप प्रेझेंटेशन ची तयारी करत होते सगळी तयारी करून बाकीचे फ्रेश व्हायला गेले ब्रेक घेऊन मुक्ता मात्र तिथेच उर्वरित तयारी करत होती तेव्हा तिला आठवल आई ने डब्बा दिलेला तिला खूप भूक ही लागली होती. तिने तो डब्बा उघडला भूक लागलेली पर्याय नव्हता तेव्हा ती तिथेच बाजूला बसून खाऊ लागली. तिथून एक जण जात होता त्याच लक्ष तिच्याकडे जात आणि किंचित हसू येत त्याला. तो एकटक तिला न्याहाळत होता. ती मात्र पटापट खात होती भूक ही होती आणि बाकीचे ब्रेक संपवून येतील काम पेंडिंग राहील तर काही म्हणून ती पटापट खात होती.
"अरे चल..... आत.."- मागून एक सिनिअर त्या मुलाला बोलला त्याने हाताने शांत अशी खून केली. तो सिनिअर ही आत पाहत होता मुक्ता तिथे मीटिंग रूम मध्ये खाते हे पाहून त्याने डोक्याला हात लावला कारण मागून ऑफिस चे काही मोस्ट सिनियर येत होते. हिला कसं सांगाव म्हणून तो गोंधळला.
"तिला शांत पणे खाऊ द्या.... मघाच पासून पाहतो ती काम करते. कदाचित नाष्टा करून आली नसेल."- तो मुलगा. मागून ते सिनिअर ही आले सगळे ते आत जाणार तेच ह्या दोघांना बाहेर थांबलेले पाहतात.
"व्हॉट हॅपेन? व्हाय यू स्टँड हिअर?"- ते मेन सिनियर म्हणाले तस तो मघाच च सिनियर घाम पुसत एकदा आत एकदा मागे पाहतो.
"काय झालं देशपांडे? सरका मागे..."- राऊत ऑफिस मधले हेड आणि मुक्ता च्या टीम चे हेड बोलतात आणि पुढे जातात तस तो मघाचाच मुलगा त्यांच्या कडे थोडा रागात बोलतो.
"सर ते.. ते..."- देशपांडे. राऊत देशपांडे ना बाजूला करतात. तसही मुक्ता च्या कामावर जेवढे खुश होणारे असतात त्यात काही जळणारे ही असतात त्याला अपवाद हे राऊत ही नव्हते कारण मुक्ता चे काम हे सिनियर मंडळी पर्यंत गेलेलं तसेच प्रत्येक काम न चुकता करणे ही कलाच सगळ्यांना आवडली त्यामुळे राऊत ह्यांचं डिमांड कमी झालं त्यामुळे आज त्यांना आयती संधी मिळाली.
"ओ मिस देशमुख.... ही काय डब्बा खायची जागा आहे का?"- राऊत. केबिन मध्ये शिरत म्हणतात तसे मुक्ता घाबरते आणि डब्बा लपवत बॅगेत ठेवते. उभी राहते.
"स स सॉरी सर.."- मुक्ता मान खाली घालत म्हणते. आणि बाहेर एवढी लोक आहे हे पाहून तिला अजून वाईट वाटत. आपण मीटिंग रूम मध्ये डब्बा खातो हे सगळ्यांनी पाहिलं.
"सॉरी काय ही मीटिंग रूम आहे कॅन्टीन नाही.. उद्या तुम्ही ज्या जागेवर काम करतात तिथे जेवाल. कॅन्टीन मध्ये जाऊन खायच ना होता ना ब्रेक होता ना..."- राऊत. राऊत मुद्दाम मुक्ता ला ऐकत होता जेणेकरून सिनियर खुश होतील.
"सॉरी सर."- मुक्ता.
"यू शूल्ड बी सॉरी..."- मागून मेन डायरेक्टर येऊन बोलले तस त्या मुलाने पण पाहिल.
"बघा ना सर मी कधीच सांगतो माफी मागा पण बघा आता तुम्ही आले म्हणून."- राऊत.
"ती नाही तुम्ही राऊत तुम्ही तिची माफी मागा."- डायरेक्टर. मुक्ता त्यांच्याकडे पाहत राहते. राऊत तिची माफी मागतो आणि रागाने मागे जातो.
"बाळा जेवढ काम महत्वाचे आहे तेवढं जेवण ही... काम आपण करतो पण ते करण्यासाठी ताकत हवी ना.. ह्या पुढे अस जेवण स्किप करत जाऊ नकोस.. आम्ही थांबतो बाहेर तू खाऊन घे. सकाळपासून तुला पहिलं तू काम करतेस अस करत नको जाऊस."- डायरेक्ट.
"सर थँक्यू पण माझं झालं आणि मीटिंग ला उशीर होईल."- मुक्ता.
बाकी सगळे आत येतात. बाकीची मंडळी ही येतात पण तो मुलगा बाहेर उभा राहून सगळ पाहत असतो.
कोण असेल तो मुलगा? त्याच आणि मुक्ता च काय संबंध असेल? वाचत राहा मुक्तरंग.....
सगळ्यात आधी क्षमस्व गणेशोत्सव असल्यामुळे लिखाण करायला वेळ मिळाला नाही ह्या पुढे भाग येत राहतील.
सगळ्यात आधी क्षमस्व गणेशोत्सव असल्यामुळे लिखाण करायला वेळ मिळाला नाही ह्या पुढे भाग येत राहतील.
©®- श्वेता पवार.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा