Login

मुक्तरंग - रंग आयुष्याचे भाग ११

नारीवादी
"देशपांडे तुम्ही ह्या मुलीबद्दल का कॉन्फिडन्ट होता ते आता कळलं मला. खूप हुशार आहे ती आणि त्याच बरोबर तिचा आत्मविश्वास. फक्त तिला जरा जेवणाचे महत्व सांगा कामात एवढी झोकून असते ती. सकाळी येताना पाहिल मी तिला. सगळ्यात आधी तिचं मीटिंग रूम मध्ये होती."- मेन सिनियर डायरेक्टर.

"हो सर ती खूप मेहनती आहे, आज कदाचित तिला उशीर झाला असेल किंवा तिची बस उशिरा आली असेल अस काही असेल कारण आज पहिल्यांदा ती अस वागली. नेहमी ती कॅन्टीन मधेच नाष्टा करते आणि जेवते."- देशपांडे.

"अहो तुम्हाला समजलं नाही माझं म्हणणं."- सिनियर डायरेक्टर.

"म्हणजे सर?"- थोड गोंधळून देशपांडे म्हणाले.

"म्हणजे अस की तिला जरा ब्रेक घ्यायला ही सांगत जा की. किती काम बाकीचे मस्त असतात ही मात्र काम एके काम अहो अश्याने ती आजारी पडेल. आरोग्य ही तेवढंच महत्त्वाचे आहे की नाही सो तिला म्हणावं भूक लागली की खाऊन घ्यायचं काम बाजूला आणि हो उद्या ह्याच संदर्भात आपण सगळ्या हेड ऑफ डिपार्टमेंट ची मीटिंग घेऊया."- सिनियर डायरेक्टर.

"ओके सर."- देशपांडे सरांच्या केबिन मधुन बाहेर जातात.

"या चिरंजीव या उभे राहून पाय दुखले असतील ना."- सिनियर डायरेक्टर. ते हसत बोलतात आणि त्यांच्या मुलाला खुर्ची वर बसायला म्हणतात

"काय पप्पा तुम्ही पण ना...."- तो ही हसत म्हणतो आणि बसतो.

"मग १ तासभर उभे राहून कसे वाटले? चिरंजीव तुमच्यात एवढा मोठा बदल छान हा...."- सिनियर डायरेक्टर.

"पप्पा कम ऑन.... मी फक्त तुम्हाला भेटायला आलेलो पण तिथे तो गोंधळ...."- तो मुलगा.

"बाळा तुला जन्मापासून ओळखतो तू कुठे थांबू शकतो आणि कुठे नाही सगळ माहित आहे. भलेही तुमच्या आई नी तुम्हाला जन्म दिला ९ महिने पोटात वाढवलं पण तुम्हाला तिच्या पेक्षा जास्त मी ओळखतो हे तुम्हाला चांगल माहित आहे.. सरळ मुद्द्याच बोला आता."जी ते हसत म्हणाले आणि हातातील फाईल खाली ठेवली.

"पप्पा खरच तसे काही नाही फक्त ही मुलगी इथे कशी त्याच आश्चर्य आहे आम्हाला बस."- तो मुलगा.

"तू ओळखतो तिला?"- सिनियर डायरेक्टर.

"हो म्हणजे नाही म्हणजे तशी काही खास ओळख नाही."- तो.

"मग कस?"- सिनियर डायरेक्टर.

"पप्पा तुम्हाला आठवत मी एक पेंटिंग कॉम्पेटिशन च जज होतो त्या कॉलेज ने मला बोलावलं तर तिथली ती पेंटिंग..."- तो मुलगा.

"तिचं जी तू घरी आणली आणि त्या पेंटिंग मध्ये एवढ हरवलास की.... हे हे जस्ट ए मिनिट मिन्स ती ती पेंटिंग वाली ती ही...."- सिनियर डायरेक्टर.

"येस पप्पा."- तो मुलगा.

"हर्षित हर्षित ओ माय गोड फायनली ती मुलगी इथे सापडली ओ...."- सिनिअर डायरेक्टर उभे राहून त्याच जवळ गेले तो ही उभा राहिला आणि त्याच पप्पा ना मिठी मारली.

"येस पप्पा...."- हर्षित.

"चल मी तिची माहिती..."- सिनियर डायरेक्टर.

"मिस्टर नंदन मोहिते लगेच CID बनू नका. वेळ घ्या जरा."- हर्षित हसत म्हणाला.

"हा हा हा तुला माहित आहे ना मी नाही यार थांबू शकत ही तिचं मुलगी आहे जिच्या पेंटिंग वर माझा मुलगा वेडा झालं ही तिचं आहे जिने माझ्या मुलाच आयुष्य बदललं खरच खूप गोड आहे रे मुलगी."- हर्षित चे पप्पा.

डोअर नोक होतो.
"मे आय कमिंग सर."- शिपाई.

"येस या."- हर्षित चे पप्पा.

"सर तुम्हाला दिनेश सरांनी बोलावलं."- शिपाई.

"ओके मी आलो..."- हर्षित चे पप्पा. ते हर्षित ला निरोप देतात आणि पुढील मीटिंग ला जातात.

मुक्ता ला कळेल का तिचे आयडॉल हर्षित सर ह्यांचे हे ऑफिस आहे हे? पुढे दोघांची भेट होईल का? वाचत रहा मुक्तरंग...