Login

मुक्तरंग - रंग आयुष्याचे भाग १३

नारीवादी
"हॅलो मी तुझ्याशी बोलतो काय झालं तुला?"- हर्षित.

"आ माझ्याशी... काही नाही बोला तुम्ही?"- मुक्ता.

"काही तरी नक्की आहे सांग मला एवढ तर सांगू शकते तुझा अजूनही विश्वास नाही का माझ्यावर"- हर्षित.

"सर तस काही नाही आहे. बोला काय बोलत होतात."- मुक्ता.

"काही टेन्शन आहे का?"- हर्षित थोडा चिडत म्हणतो.

"नाही."- मुक्ता.

"ऑफिस मध्ये काही टेन्शन? ते राऊत काही म्हणाले का की पप्पा?"- हर्षित.

"नाही कोणीही काही बोलल नाही."- मुक्ता.

"मग घरी काही आई आबा की दादा?"- हर्षित. मुक्ता एकदम शांत झाली.

"बोल न काय झालं?"- हर्षित तिचा हात हातात घेत बोलतो कारण ती घरच्यांचे नाव काढल्या बरोबर शांत बसते.

"काही नाही झालं."- मुक्ता दुसरी कडे बघत थोडी त्रासिक होऊन बोलते.

"मग काय झालं मी मूर्ख गेले अर्धा तास इथे बसून बोलतो तुझं लक्ष नाही. मुक्ता बोल काही काय झालं ठीक आहे नको बोलून मी परका आहे हे तू सिद्ध केलंस ओके बाय."- रागात हर्षित उठून चालू लागतो. मुक्ता ला काय बोलावे कळत नाही ती घाबरते रडवेली होते तिच्यात मिश्र भावना जागरूक होतात. भीती, दुःख, घाबरणे आणि ती जोरात बोलते.

"सर माझं लग्नाचं बघतात घरचे."- मुक्ता. हे ऐकून हर्षित जागीच थांबतो आणि मागे वळतो त्याचे डोळे नकळत पाणावतात काय बोलावे काय करावे कळत नाही. मुक्ता मात्र त्या अथांग समुद्राकडे पाहत असते.

"काय लग्न?"- हर्षित च्या तोंडातून निघत.

"हो लग्न आई ची इच्छा आहे आणि बाबांनी संमती दिली."- मुक्ता. हर्षित तिच्या जवळ जातो.

"तू तयार आहेस? तुझ्या मनात कोण आहे का? म्हणजे असेल तर घरी सांग तस."- हर्षित.

"तयार? थोडी हसून आणि राहील प्रश्न कोण असण्याच तरी काय उपयोग आई वडील शेवटी महत्वाचे त्यांचे निर्णय महत्वाचे पण मला लग्नच मुळात नको आहे."- मुक्ता बोलते तसा हर्षित आश्चर्याने पाहतो.

"म्हणजे तुला लग्न नाही करायचे."- हर्षित.

"खर तर नाहीच करायचे पण करावे लागेल. लग्न खरच सुखाचे बंधन असते का? आई आबांचा संसार आणि चाळीत असलेले काही संसार सोडले तर कुठे आता संसार सुख आहे.. आता फक्त पैसा आणि दिखावा."- मुक्ता. हर्षित ला कळत नव्हतं नक्की तिला काय म्हणायचे आहे. आज मुक्ता ला पहिल्यांदा तो एवढ इमोशनल पाहत होता. तो तिच्या बाजूला जाऊन बसला आज आपल्या मनातील भावना तो तिला सांगणार होता त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि मुक्ता त्याच्या खांद्यावर डोके ठेऊन रडायला लागली. आज खूप काही तिला बोलायचे होते असे हर्षित ला वाटले म्हणून त्याने तिला रडू दिले.

"मुक्ता माझ्याजवळ तुझे मन मोकळे करू शकते काय झालं सांग ना? लग्न ठरलं आहे का तुझ्या मर्जी शिवाय."- हर्षित.

"नाही सर माझे आई वडील माझ्या मर्जी शिवाय कधीही माझे लग्न नाही ठरवणार पण....."- मुक्ता बोलत रडते.

"काय झालं सांग ना... अशी रडू नकोस..."- हर्षित.

"सर लग्न हे किती खास बंधन असते पण तेच आपल्या मर्जी शिवाय केले तर....... माझी सखी...."- मुक्ता जोरात रडते आणि हर्षित ला सखी बद्दल सगळे सांगते. ह्या दोन वर्षात बिचाऱ्या सखी ने खूप भोगलं होत मुलगी झाली म्हणून सासरी जाच होताच त्यातून गरीब घरातून म्हणून सतत अपमान. माहेरचे दरवाजे तिचे बंद करून टाकले सासरच्यांनी. खूप बिकट परिस्थिती होती आणि हे सगळे मुक्ता आणि तिच्या बहिणी ना सखी च्या भावामुळे कळले तो ही ह्या दोन वर्षात पुणे ला निघून गेला होता शिक्षणासाठी आणि तिथेच त्याची गाठ सखी शी योगायोगाने पडली तेव्हा त्याला सारा प्रकार कळला पण नवरा समोरून येतो म्हणून सखी तिथून दुसरी कडे जाऊन उभी राहिली. भाऊ तरी काय करणार शिक्षण कसे बसे करत होता घरी सांगितलं तरी वडिलांमुळे आई ही गप होती पोरीचा संसार तुटू नये म्हणून.

हर्षित हे अस पहिल्यांदा ऐकत होता. आपण किती राजेशाही जीवन जगतो आपल्या जवळील गोतावळा ही राजेशाही त्यामुळे आपण कधी अशा समस्या पाहिल्या नाहीच. तो मुक्ता ला मिठीत घेतो. ती ही रडत त्याच्या मिठीत सामावून जाते.

"मुक्ता तुला कधीच असे जीवन जगावे लागणार नाही मी कायम तुझ्यासोबत आहे तुला कायम आनंदी ठेवेन."- हर्षित तिचे डोळे पुसत म्हणतो.

मुक्ता फक्त एकटक त्याच्याकडे पाहते.

हर्षित असे का बोलला? पुढे दोघांचे नाते किती पुढे जाईल? मुक्ता हर्षित ला आपल्या आयुष्यात येऊन देईल का? वाचत राहा मुक्तरंग - रंग आयुष्याचे....