Login

मुक्तरंग - रंग आयुष्याचे भाग १४

नारिवादी
"पप्पा पप्पा...."- हर्षित जोरजोरात ओरडत आपल्या वडिलांच्या रूम मध्ये जातो.

"काय झालं युवराज आज स्वारी एकदम वेगळी भासते काय मुक्ता हो बोलली का?"- हर्षित चे पप्पा.

"ना पप्पा त्यासाठीच तर हालचाल करायची आता..."- हर्षित हसत म्हणाला.

"म्हणजे?"- त्याचे पप्पा.

"तिच्या घरचे मुलगा बघत आहे तिच्या साठी..... त्या आधी मी तिला सांगणार माझं प्रेम आहे तिच्यावर...."-हर्षित.

"That's माय बॉय.... ऑल दि बेस्ट..."- त्याचे पप्पा त्याला आशिर्वाद देतात.

इथे आबा आणि आई मुक्ताला लग्नासाठी आलेले स्थळ दाखवत असतात. अनुरूप अशी स्थळ असतात पण मुक्ता चे कशात लक्ष नसत हल्ली हर्षित बद्दल तिच्या मनात भावना निर्माण होतात. हर्षित समोर जरी नसला तरी तिचा दिवस चांगला जात नाही. नाही म्हटलं तरी त्यांची मैत्री आता पुढे गेली होती दोघ एकमेकांचा विचार करायचे.

"हॅलो मुक्ता...."- हर्षित तिला कॉल करतो.

"हॅलो सर बोला ना..."- मुक्ता.

"आज जमेल का यायला तुला माझं महत्त्वाचे काम आहे?"- हर्षित.

"हो म्हणजे हो जमेल.... कुठे भेटायचे ऑफिस ला का?"- मुक्ता थोड विचार करून बोलते कारण आज सकाळी च आई ने लग्नाचा विषय काढला पुढल्या रविवारी पाहुणे येणार आहे पहायला असे. ती आई ला किर्ती ला भेटायचे असे सांगून निघते आणि तसेच किर्ती ला बाहेर जाऊन आपण हर्षित ला भेटायला जातो असे सांगते घरून विचारणा झाली तर सांग तुझ्याकडे येणार आहे किंवा निघाली आहे. फक्त किर्ती च आता तिच्या कॉन्टॅक्ट मध्ये होती किर्ती ही आता एक स्वतंत्र अस बुटीक टाकून आपलं फॅशन डिझाइन च काम वाढवत होती. ठरलेल्या जागी मुक्ता पोहचते हर्षित आधीच आलेला असतो. तिथे मात्र तो एकटा असतो आणि आजूबाजूला तिला आवडणारी फुले..... मोगरा, गुलाब, गुलाबाचे गुच्छ ती पाहूनच हरवून जाते. तिथे जवळ असलेल्या टेबल शेजारी तो तिला बसवतो.

"सर हे सगळ...."- मुक्ता.

"बस मुक्ता पहिले आपण थोडा नाश्ता करू मग तुला मी सगळ सांगतो."- हर्षित. तिथे एक माणूस येऊन त्यांना नाश्ता देतो मुक्ता चे आवडणारे सगळे पदार्थ असतात. मुक्ता ला काही कळत नाही काय सुरू....... अचानक एक गाण सुरू होत......

"कुछ ना कहो, कुछ भी ना कहो
क्या कहना है, क्या सुनना है
मुझको पता है, तुमको पता है
समय का ये पल, थम सा गया है
और इस पल में कोई नहीं है
बस एक मैं हूँ बस एक तुम हो
कितने गहरे हल्के, शाम के रंग हैं छलके
पर्वत से यूँ उतरे बादल जैसे आँचल ढलके
सुलगी सुलगी साँसें बहकी बहकी धड़कन
महके महके शाम के साये, पिघले पिघले तन मन"

मुक्ता आश्चर्याने हर्षित कडे पाहते दोघ गाणे ऐकत नाष्टा संपवत असताना अचानक गाण संपताना हर्षित मुक्ता समोर खाली गुडघ्यावर बसतो......

"सर अहो तुम्ही..."- मुक्ता थोडी गोंधळते.

"मुक्ता गेली २ वर्ष आपण एकत्र आहोत पण खर सांगू त्या आधीची दोन वर्ष फक्त नी फक्त तुझी वाट पाहण्यात घालवली आहे मी... तुझी पेंटिंग तुझी कलेसाठी असलेली तल्लीनता मी पाहिली आणि तेव्हाच तू माझ्या मनात घर करून बसली. मुक्ता आयुष्यभरासाठी ह्या वेड्या मुलाचा हात कायमचा हातात घेशील तुझ्या...."- हर्षित त्याचे दोन्ही हात तिच्यासमोर धरतो.

मुक्ता च्या डोळ्यातून पाणी येते आपण स्वप्न तर पाहत नाही आहोत ना असे तिला वाटत असते पण तिला जाणीव होते ती परिस्थिती ची. एक धनाढ्य मुलगा आणि आपण एक सर्वसामान्य घरातील. ती शांत बसून असते.

"मुक्ता सॉरी जर तुला राग आला असेल तर.. मी फक्त माझं मन मोकळं केलं... तुझा नकार आहे तर मी तो मान्य करतो पण काही तरी बोल अशी रडू नकोस...."- हर्षित रडणाऱ्या मुक्ता कडे पाहतो.

"स स सर.... नाही सर... ते "- आणि ती पुन्हा रडू लागते...

"काय झालं मुक्ता घरचे काय म्हणतील त्याच विचार करते का मी आहे ना पप्पा न सगळ माहित आहे ते आई ला नक्की तयार करतील आणि हो तुझ्या घरी मी स्वतः बोलेल तू नको ना रडू.... का मी तुझ्या लायक नाही आहे मुक्ता..."- हर्षित असे म्हणतो आणि मुक्ता त्याच्या ओठावर आपले हात ठेवते.

"काही काय म्हणता तुम्ही सर तुम्ही आणि लायक अहो तुम्हाला कोणीही छान मुलगी मिळेल तरी तुम्ही माझ्यासारख्या सामान्य घरातील मुलीवर... सर विचार करा..."- मुक्ता ची भीती आपसुक बाहेर पडते.

"ये वेडा बाई जर मला तशी मुलगी हवी असती तर मी ४ वर्ष थांबलो असतो का? मला तर माझी ही गोड समजूदार मुक्ता हवी...... तू मनातून काढून टाक सगळ.... मी फक्त तुझा आहे मुक्ता..."- हर्षित तिचे डोळे पुसत म्हणतो तशी ती त्याला मिठी मारते आणि हर्षित ला त्याचे उत्तर मिळते. आज दोघांच्या नव्या कथेला सुरुवात होते.. थोड बोलून मुक्ता आणि हर्षित निघतात तो तिला घरी सोडतो. कीर्तीला मुक्ता सगळं सांगते. किर्ती खूप आनंदी असते मुक्ता साठी.......

हर्षित ही घरी येऊन पप्पा ना सगळ सांगतो.. पप्पा तर जाम खुश होतात फक्त पुढे असणार शिव धनुष्य त्यांना पेलायचे असते.

मुक्ता च्या घरी कळणार का हर्षित बद्दल? हर्षित ची आई परवानगी देईल का? पाहुया येणाऱ्या पुढील भागात...