Login

मुक्तरंग - रंग आयुष्याचे भाग १५

Nariwadi
"अहो कुठे होतात?"- एक बाई जिना उतरत बोलते.

"हे काय आताच आलो आणि तू एवढी तयार होऊन कुठे चालली आहे?"- तो माणूस.

"अहो असे काय करतात शरद भाऊजींकडे आज पूजा नाही का आणि हर्षित कुठे राहील? आई कधीच्या फोन करून एकच हर्षित ला घेऊन या.... लवकर चला ओ..."- ती बाई वैतागून म्हणते.

"अश्विनी आवारतो आणि आई तिथे कधी गेली म्हणजे ती इथे येते ना?"- तो माणूस

"मिस्टर नंदन मोहिते आपण विसरले दिसता त्या आपल्या मातोश्री आहे आणि त्यांचे शब्द जो पर्यंत हर्षित चे लग्न होत नाही त्या ह्या घरात येणार नाही माहित आहे ना....."- अश्विनी.

"हो ते प्रकरण अजून लक्षात आहे... चल मी आवरतो तू हर्षित ला फोन करून बघ निघाला का? आणि हो माते तिथे जाऊन तुम्ही ही आईसाहेब ह्यांच्या सोबत वधू परीक्षण करू नका प्लिज मागच्या वेळी माहीत आहे ना त्या बायका कश्या विचारपूस करत होत्या. हर्षित अक्षरशः पळाला तिथून."- हर्षित चे पप्पा.

"हो हो करते...."- अश्विनी.

"आई कोणाला कॉल करते..."- हर्षित बॅग सोफा वर टाकून त्याच्या आई शेजारी बसतो.

"अरे हर्षित ला करते अजून कसा आला नाही... एक तर जायचं पूजेला..."- अश्विनी.

"आई हॅलो बोल..."- हर्षित मुद्दाम कानाजवळ हात नेत बोलतो.

"अरे कधी येतो तू?"- अश्विनी टेन्शन मध्ये बोलतात. तस हर्षित हसतो तेव्हा ती बाजूला बघून डोक्याला हात लावते.

"मघाशी पण तुला काय झालं? एवढी सजून कुठे चालली?"- हर्षित सॉक्स काढत म्हणत होता...

"ती एकटी नाही आपण ही चाललो आहे जा लवकर तयार हो नाही तर आपली खैर नाही."- नंदन.

"काय झालं पप्पा नक्की कुठे जातो...."- हर्षित.

"शरद काकांकडे....."- नंदन.

"आ हम.... काय? कशाला?"- हर्षित.

"पूजा आहे विसरला का तू? आणि तिथे आजी आली आहे."- अश्विनी.

"आजी...."- हर्षित ताडकन उठला आणि रूम मध्ये पळाला तो १५ मिनिटात आवरून आला एवढ तो आजी च धाक.

सगळे शरद काकांकडे जातात स्वागताला मात्र आजीच बसलेली असते. अश्विनी नंदन तिच्या पाया पडतात हर्षित ही पाया पडतो आजी मात्र थोड रागात बघते.

"फार लवकर आली ग अश्विनी अगदी सगळ आटपून आली म्हणायचं."- आजी.

"आई सॉरी ते हे येण्याची वाट पाहत होते."- अश्विनी.

"ह्याला काम सुटत असता का? आणि ह्या हर्षित चे ही तसच जा जाऊन पाया पडा आणि काय काम आहे का बघा."- आजी.

तिघ पाया पडतात आणि शरद च्या परिवाराला भेटतात. शरद कडे अजूनही मित्र मंडळी आलेली असते.

"वहिनी काय ओ किती उशीर तरी नशीब आलात नाही तर आता काही खैर नसते ह्यांची."- ज्योती ( शरद ची बायको.)

"काय झालं ग ज्योती अस?"- अश्विनी.

"ताई काय सांगू आई ना डोहाळे लागले बोलू की वय झालं म्हणून भ्रमिष्ट पण... अहो सारखं तेच लग्न आणि आता तर उदय ला ही सांगून झालं लग्न कर आणि उदय च तुम्हाला माहित आहे तो उगाच लंडन ला नाही गेला. त्याच मास्टर होई पर्यंत तरी तो येणार नाही असच बोललं मागे आई आलेल्या नेमका तो ही आलेला तेव्हा पासून तो आम्हाला नो इंडिया असच बोलतो."- ज्योती ने जे घडलं आणि बरंच अजून सांगितलं त्यामुळे अश्विनी ला टेन्शन येत. ती सगळ जाऊन नंदन ला सांगते.

इथे पूजेत ज्योती ची आणि शरद ची ओळखीत असलेली फॅमिली ही येते ते शरद आणि ज्योती ला बिझनेस निमित्त अनेक वर्षा पासून ओळखत असतात त्यामुळे ते नंदन आणि अश्विनी ला ही ओळखत असतात. राऊत फॅमिली दिनेश राजे, सुनंदा राजे आणि त्यांची मुलगी प्रेरणा ती ही आपल्या वडिलांसोबत बिझनेस सांभाळत असते. सुनंदा ची नजर हर्षित वर जाते आणि तिच्या डोक्यात एक विचार येतो तो ती तिच्या नवऱ्याला दिनेश ला सांगते. दिनेश तिला थोड शांत राहून घरी बोलूया अस सांगतो. पण प्रेरणा मात्र हर्षित वर फिदा झालेली असते. दोघा मध्ये फक्त औपचारिक बोलण होत तरी सुद्धा हर्षित ने तिच्या मनात घर केलेलं असत.

पाहुया पुढे काय होत आजी आल्यावर? मुक्ता आणि आजी ची भेट निर्णायक ठरणार आहे......... कस होईल हर्षित चे?