Login

मुक्तरंग - रंग आयुष्याचे भाग १६

नारीवादी

"अहो ऐकलं का?"- अश्विनी.

"ऐकतो आहे तुमचं बोला..."- बेडरूम मध्ये जात नंदन बोलतात.

"अहो काय तुम्ही... ते सोडा तुम्हाला माहित आहे प्रेरणा चे स्थळ आले हर्षु साठी."- अश्विनी.

"कोण प्रेरणा ते सोड आपण उद्या बोलू मला झोप आली..."- नंदन चेंज करायला निघून जातात आणि लगेच येतात.

"अहो अस काय करतात सुनंदा आणि दिनेश ची मुलगी..."- अश्विनी.

हे ऐकून नंदन शॉक होते.

"काय बोलली परत बोल?"- नंदन तेव्हा अश्विनी सगळ सांगते.

"अहो सुनंदा ने विषय काढला आणि तिथे आई ही होत्या त्यांनीही दुजोरा दिला ते लोक म्हणाले पुढील बोलणी साठी या लवकर."- अश्विनी ही तिचं आवरत आवारत सांगत होती.

"आशू थांब जरा..."- नंदन तिच्या जवळ येत म्हणाला आणि तिला जवळ असलेल्या सोफा वर बसवले.

"काय झालं नंदन?"- अश्विनी थोडी गोंधळून म्हणते.

"आशू आता मी जे काही सांगणार आहे ते नीट ऐक. खर तर तुला मी आधी सांगणार होतो पण कामामुळे आणि हर्षु च्याच बिझी शेड्युल मुळे मी सांगू शकलो नाही."- नंदन. नंदन अश्विनी ला हर्षित आणि मुक्ता बद्दल सगळ सांगतो. अश्विनी ला खूप मोठा धक्का बसतो.

"अहो हे काय बोलता तुम्ही? कळत का? आणि आई त्यांना कळलं तर.... अहो हर्षु अस कस म्हणजे त्या मुलीबद्दल तिचं घर वगैरे नाही नको मी..."- अश्विनी ला कस व्यक्त व्हावं हे कळत च नव्हतं.

"शांत हो आशू... मी त्या मुलीला ओळखतो चांगल खूप छान आहे मुलगी आणि घरचे म्हणशील तर हर्षित ओळखतो म्हणजे एक दोनदा तिच्या भावाला भेटला. आशू सामान्य घरातली आहे ती खूप चांगली आहे.. तुला खूप आवडले."- नंदन.

"अहो मला आवडून काय अर्थ आई माहित आहे ना तुम्हाला आणि सामान्य घरातली आहे ती आपलं हर्षु आज किती मोठ स्टेटस आहे त्याच आई कदापि होकार देणार नाही. कितीही झालं तरी त्या आपल्या तोडीस तोड पाहणार आणि तुम्हाला माहित आहे आईना किती राग आहे अशा लग्नाचं."- अश्विनी.

"व्वा अश्विनी हे तू बोलते अग तू ही एका छोट्या शेतकरी कुटुंबाची मुलगी आहे. तुझ्या भावांनी कष्टाने तुझं लग्न केलं तुझ्या वडिलांकडे काय होत, आताही तुझ्या माहेरी वैभव आहे ते फक्त तुझ्या दादा वहिनी मुळे... आणि लक्षात ठेव सुन तुला नांदवायची आई किंवा ज्योती ला नाही कळलं. माझं ठरलं सुन म्हणून मुक्ता च येणार ती साधी सरळ मुलगी आहे. अशीच मुलगी हर्षु चे आयुष्य छान ठेऊ शकते."- नंदन.

नंदन च निर्धार बघून अश्विनी शांत बसली आणि थोड भूतकाळात पाहिल तिला सासऱ्यांनी पसंत केलेलं सासूबाई कधीही आधी नीट वागत नव्हता सुरुवातीला पण आपल्या साध्या स्वभावाने तिने सासूबाई ना ही जिंकले. सासूबाई म्हणून नाही तर आई म्हणून त्यांना आपलस केलं आणि आज त्या आपल्या सगळ्या मनातील गोष्टी अश्विनी ला सांगतात पण त्यांना आपल्या घराला साजेल अश्याच नातसून आणायचं निर्धार आणि एकीकडे नंदन चे मुक्ता ला सुन म्हणून आणण अश्विनी कात्रीत सापडली होती. हर्षित शी आल्यावर ह्या विषयावर तिने बोलायचे ठरवलं.

हर्षित ही आला आवरून बसलेला शांत हॉल मध्ये तेव्हा अश्विनी ने येऊन मुद्द्याला हात घातला. हर्षित ने सगळ सांगितलं आणि मुक्ता शी भेट घालून द्याच ठरवलं. आणि तो दिवस उजाडला जेव्हा अश्विनी आणि मुक्ता भेटतात.

मुक्ता नमस्कार करते तिचं साधं राहणं बोलणं अश्विनी ला भावत. अश्विनी जुजबी बोलते आणि विचार करते हिचा कस निभाव लागेल आईंपुढे. मुक्तालाही अश्विनी च स्वभाव आवडतो. आपल आयुष्य एका चांगल्या मुलासोबत सुरू होणार म्हणून ती खुश असते आणि घरी येते. तिने अजून ही घरी सांगितलं नसत.

इथे हर्षित आणि अश्विनी घरी येतात आणि समोरच दृश्य पाहून शांत उभे असतात...... समोर आई आणि........

कोण आलेलं असत आजी सोबत हर्षित च्या घरी? मुक्ता सांगू शकेल का तिच्या घरी? पाहुया येणाऱ्या पुढील भागात....

सगळ्यात आधी माफी मागते तब्येत बरी नसल्याने नवीन भाग आला नाही पण ह्या पुढे येत राहील. सगळ्यांनी आपली तसेच आपल्या घरातील अबाल वृद्धांची काळजी घ्या. वातावरण बदली होत आहे आणि आजारपण वाढत आहे. स्वस्थ रहा.... छान रहा....