Login

मुक्तरंग - रंग आयुष्याचे भाग २

मुक्तरंग
"मुक्ता इथे मुक्ता...." तिच्या मैत्रीणी जोरात तिला आवाज देता. ज्ञानेश आणि मुक्ता कॉलेज च्या गेट जवळ पोहचलेले असतात.

"आल्या सगळ्या कोकलत... नुसत्या ओरडत असतात..."- ज्ञानेश.

"ये तू गप नेहमी त्यांना नाव ठेवतो.. जा ना आता उशीर होत नाही तुला."- मुक्ता थोड खोट चिडून बोलली.

"जातोच शेंबडी बाय बाय...."- हसत ज्ञानेश बोलतो आणि निघुन जातो...

"तुला बघते घरी ये तू..."- मुक्ता जोरात ओरडत बोलते. तो पर्यंत तिच्या मैत्रीणी तिथे येतात.

"गूड मॉर्निंग मुक्ता."- सगळ्या एकत्र बोलतात.

"गूड मॉर्निंग."- मुक्ता.

"अग मुक्ता चल पटकन तुला काही तरी दाखवायचं चल लवकर..."- सखी. सगळ्या जणी तिला नोटीस बोर्ड कडे नेतात.

"हे बघ."- किर्ती. मुक्ता नोटीस बोर्ड बघून खूप खूप आनंदी होते.

"व्वा व्वा शेवटी मला चान्स मिळाला, मी भाग घेणार स्पर्धेत."- मुक्ता आनंदी होत म्हणते.

"हो आमची ही खुप इच्छा आहे. तू भाग घ्यावा. मुक्ता तु खुप छान पेंटिंग करतेस."- नयना.

"ये चला पटकन फॉर्म भरू तिचा."- सखी. सगळ्या जाऊन फॉर्म घेउन येतात भरतात आणि सबमिट करुन लेक्चर ला जातात. लेक्चर होतात मग सगळ्या जणी घरी जायला निघतात.

"सखी तू वक्तृत्व स्पर्धेत भाग घे ना तुला खूप छान जमत."- मुक्ता

"घेतला असत ग पण तुला माहित आहे ना माझ्या घरी कसं आहे ते. कॉलेज करून आता क्लास मध्ये जॉब करते पार्ट टाइम त्यातुन बाबांना नाही आवडत काही. ते सध्या गरज आहे म्हणून जॉब करु देतात नाही तर १२ वी नंतरच लग्न झालं असत तुला तर सगळ माहीत आहे आपण शाळेपासून च्या मैत्रीणी. तूझ्या आबांनी समजावलं म्हणून मी आणि नयना शिकू शकतो नाही तर केव्हाच आमची लग्न झाली असती."- सखी.

"हो मुक्ता, आज आबांमुळे आम्ही शिकत आहोत. आणि राहिला प्रश्न स्पर्धेचे तर तू घे भाग तु जिंकली की आम्ही जिंकलो अशीच आमची भावना असेल हो की नाही किर्ती, सखी."- नयना.

"हो मग."- त्या दोघी एकत्र बोलतात. सगळे ह्या स्पर्धसाठी खुप एक्साईट असतात. मुक्ता खुप छान पेंटिंग काढत असते अगदीं शाळेपासून. तिचा एलिमेंटरी आणि इंटरमिजेट मध्ये शाळेत पहिला नंबर आलेला असतो. पण ती तिचं कौशल्य एक छंद म्हणून ठेवते आणि कॉमर्स ला ऍडमिशन घेते. कशी ४ वर्ष निघुन गेली तिला ही कळलं नाही. विविध ड्रॉइंग स्पर्धेत भाग घेउन ती कॉलेज मध्येही आघाडीवर असायची. हे तिचं शेवटचं वर्ष असत कॉलेज च.

सगळ्या जणी गप्पा मारत रिक्षा आणि बस स्टॉप जवळ येता आणि आपल्या घरी जातात. मुक्ता घरी येऊन आई ला मदत करते आणि आई ला स्पर्धेच सांगते. आई ला ही आनंद होतो. दोघी गप्पा मारत मारत काम करतात. तितक्यात ज्ञानेश येतो.

"आई चहा टाक खुप थकायला झालं."- ज्ञानेश आत फ्रेश व्हायला जातो.

"मुक्ता दादा साठी चहा टाक मी तो पर्यंत हे भाजी च बघते."- आई.

"ओके बॉस."- मुक्ता हसत बोलते आई डोळे मोठे करुन दटावते आणि हसते. मुक्ता ज्ञानेश ला चहा नेऊन देते.

"आबा नाही आले अजुन?"- ज्ञानेश.

"अरे आज त्यांना लेट होणार आहे त्यांचा ऑफिस मध्ये सेवानिवृत्त कार्यक्रम आहे साठे सरांचं."- मुक्ता.

"अच्छा ठीक आहे."- ज्ञानेश चहा पीत म्हणतो. आई आणि मुक्ता बाकीचं काम आवरतात. आबा ही येतात... सगळे जेवून घेतात.

"आबा मी पेंटिंग स्पर्धेत भाग घेतला आहे कॉलेज मध्ये."- मुक्ता.

"अरे व्वा छान, ओल द बेस्ट बेटा."- आबा त्यांना आनंद होतो कारण मुक्ता अभ्यासाबरोबर तिचा छंद ही जोपासत असते.

"अरे व्वा मुक्ता ग्रेट, ओल द बेस्ट. छान छान सराव कर हा..."- ज्ञानेश.

"थँक्यू आबा आणि दादा."- मुक्ता.

मुक्ता तिचा अभ्यास सांभाळून तिचा छंद जोपासते हे पाहूनच आबा खुश असतात. म्हणून ते तिच्या लग्नाचं विचार करत नसतात.

मुक्ता खुप जोमाने प्रॅक्टिस सुरू करते कारण आता दिवस कमी राहिलेले असतात. कॉलेज स्टडी सांभाळून प्रॅक्टिस. शेवटीं तो दिवस उजाडतो......

पुढें पाहुया मुक्ता च पेंटिंग कॉमपीटिशन कसं होत.....

क्रमशः
0

🎭 Series Post

View all