Login

मुक्तरंग - रंग आयुष्याचे भाग ३

नारीवादी
"आई आबा मी येते आज लवकर जाते."- मुक्ता.

"हो बाळा नीट सावकाश जा. नाष्टा केला का नाही तर थांब विजयाला सांगतो डब्बा द्यायला."- आबा.

"हो बाबा केला नाष्टा आणि थोड डब्बा पण घेतलं नाष्टा च किती वेळ लागेल सांगू शकत नाही."- मुक्ता आपली बॅग भरतं बोलते. आणि निघणार तेवढयात आई येते.

"अहो ही गेली नाही ना?"- आई.

"नाही अजुन काय झालं."- आबा. आई बाहेर येते वाटी मध्ये दही असत.

"मुक्ता हात पुढे कर."- आई.

मुक्ता दही साखर घेते आणि दोघांचे आशीर्वाद घेऊन निघते. बाहेर तिचा ज्ञानेश दादा उभाच असतो.

"चल तुला सोडतो कॉलेज ला."- ज्ञानेश.

"अरे पण तुझा ऑफिस टाईम नाही झाला ना?"- मुक्ता.

"चल ग आज तुझा महत्वाचा दिवस आहे. त्यातुन ट्रॅफिक बघतेस ना रोज उगाच उशीर नको व्हायला."- ज्ञानेश.

दोघ ही कॉलेज कडे निघतात. तिथे तिच्या मैत्रीणी ही आलेल्या असतात. सगळे तिला ओल द बेस्ट करतात. ज्ञानेश ही निघुन जातो.

"मुक्ता मुक्ता आज एकदम बेस्ट होऊन जाऊं दे नेहमी सारखं."- नयना हसत बोलते.

"हो मुक्ता, ह्या वेळी वेगवेगळ्या कॉलेज मध्यले ही आहे स्पर्धेत. पण तू मात्र बेस्ट दे तुझ." - किर्ती. सखी एका घोळक्यामध्ये जाते. तिथून ती धापा टाकत येते.

"हे गेस करा जज कोण आहे?"- सखी.

"असेल कोणी आर्टिस्ट, एवढं तुला शॉक लागल्या सारखं काय झालं."- नयना.

"अग आर्टिस्ट च आहे मोठा... पण पण मुक्ता तु तर ओरडशील नाव ऐकून..."- सखी बसत म्हणते.

"ये बाई पटकन सांग कोण आहे, आधीच तिला टेन्शन आहे ऑन द स्पॉट थीम देणार त्यांच तुझ काय वेगळंच."- किर्ती.

"सांगते, मुक्ता श्वास रोखून धर, जे नाव सांगते ते कदाचित तुझ स्वप्न होत अश्या महान आर्टिस्ट ना भेटायचं. पहिले जज आहे दिपश्री हजारे, कलाश्री आर्ट वर्ल्ड च्या सर्वेसर्वा... आणि दुसरे..."- सखी. मुक्ता मात्र पहिलं नावच ऐकून शॉक होते कारण ती त्यांना एक इंस्पिरेशन मानायची. एक स्त्री आर्ट वर्ल्ड मध्ये कशी पुढें जाऊं शकते ह्याच मूर्तिमंत उदाहरण त्या होत्या. त्यांच्या हातात अक्षरशः सरस्वती चा वरदहस्त होता. त्यानी काढलेलं प्रत्येक पेंटिंग हे जिवंत वाटायचं.

"अजुन एक आहे जज?"- किर्ती भुवया उंचावत म्हणते.

"हो... दिलं थाम के बेटो मेरी सहेलियो... अगले जज हे.... नन ओथर द्यान हर्षित मोहिते... फेमस कॅलिग्राफार अँड वर्सटाईल पेंटिंग आर्टिस्ट ज्याची एक्सीबिशन पाहण्यासाठी तिकीट नेहमी हाऊसफुल असतात."- सखी.

आता मात्र मुक्ता चक्कर यायची बाकी होती. तितक्यात माईक वर अनाउन्समेंट होते स्पर्धा सुरु होणार आहे सगळे स्पर्धक ह्यांनी हॉल मध्ये या स्पर्धेचे उद्घाटन करायचं. मुक्ता ला सगळे जागे करतात. हॉल मध्ये जातात सगळ्या जणी. स्पर्धेचे उद्घाटन होते. सगळ्या स्पर्धकांना एक जागा दिलेली असते आणि बाकीच्यांना बसायला जागा दिलेली असते. मुक्ता तिचे दोन आयडेल लांबून पाहत असते. मनात भीती हि असतेच. तितक्यात हर्षित टॉपिक ची घोषणा करतो, टॉपिक असतो.... "स्त्री - शक्ती." सगळे स्पर्धक सुरु करतात त्यांची पेंटिंग. स्पर्धेचे अवधी फक्त १ तास असतो त्यात ती पेंटिंग पुर्ण करायची होती. मुक्ता ही सुरूवात करते तिचं नेहमी असतं एकदा का ती पेंटिंग सुरु करते करायची तर तिला आजुबाजूच भान राहत नाही. सगळ्या भाग घेतलेल्या कॉलेज चे प्राचार्य आपल्या आपल्या सपर्धकांकडे जजेस ना नेत होते. शेवटीं मुक्ता चा नंबर येतो ती मात्र तलीन झालेली असते तिला कळत ही नाही तिचे सर तिला आवाज देतं आहे.

"मिस देशमुख, अहो मिस देशमुख..."- प्राचार्य कामात.

"सर मी बघते तुम्हाला माहीत आहे ना ती किती तल्लीन असते चित्रकरागिरी करतं असताना."- सोबत असलेल्या फडके मॅडम म्हणतात....

"मुक्ता अग मुक्ता..."- मॅडम तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या. आणि बाजुला झाल्या.

मुक्ताने दचकून मागे पाहिलं आणि तिच्या ब्रश मधला रंग हर्षित च्या शर्ट वर उडाला. मुक्ता घाबरून त्याच्या कडे पाहत होती.... पहिले त्याची नजर शर्ट कडे गेली मग मुक्ता कडे थोड रागात पाहत होता पण जेव्हा त्याची नजर तिच्या पेंटिंग कडे गेली तो थक्क होऊन पहात राहिला...

पाहुया पुढें काय असेल त्याचे मत मुक्ता च्या पेंटिंग बद्दल.....

क्रमशः
0

🎭 Series Post

View all