दिवस पटपट जात होते. मुक्ताची फायनल इयर ची परीक्षा जवळ आली होती.. ती खूप जोमाने अभ्यास करतं होती. एक्साम झाली की एखादा पार्ट टाईम जॉब करायचं तिने ठरवल होत.
"मुक्ता अग डब्बा घेऊन जा."- आई.
"आई अग नको कशाला परीक्षा झाली की घरीच येइल जेवायला."- मुक्ता.
"अग नाष्टा पण नीट केला नाहीस तु."- आई.
"आई उशीर होईल."- मुक्ता बॅग अवरत म्हणाली.
"मुक्ता आई देते ना डब्बा घेऊन जा."- आबा.
"ठीक आहे."- मुक्ता बॅग आवरात बोलते डब्बा घेते देवाच्या आणि आई आबांच्या पाया पडून परीक्षेला जाते.
सगळे पेपर तिला चांगले गेलेले असतात. आता मैत्रिणींना लवकर भेटता येणारं नाही ह्याची खंत त्या चौघी ना असते. तश्या त्या मोबाईल मुळे संपर्कात असणार आहेच. किर्ती घरच्यांसोबत फिरायला जाणार असते. सखी पार्ट टाइम जॉब करणार असते आणि नयना ब्युटी पार्लर च कोर्स त्या तिघींच आधीपासून ठरवलेलं असत त्यामुळे मुक्ता ही पार्ट टाइम जॉब च बघणार होती जेणेकरून पुढील शिक्षणासाठी आर्थिक जबाबदारी तिला घेता येइल.. ती घरी ह्याबदल बोलायचं ठरवते. परीक्षा संपली असेच दोन तीन दिवस गेले. सकाळी सगळें एकत्र नाष्टा करत असतात.
"आबा आई मला काही तरी बोलायचं."- मुक्ता.
"बोल ना."- आबा नाष्टा करतं म्हणाले.
"आबा मला पार्ट टाईम जॉब करायचं."- मुक्ता.
"ही तरं चांगली गोष्ट आहे. कर सुरूवात शोधायला. नाही काही झालं तरं मी आहेच."- आबा तिला प्रोत्साहित करतं म्हणाले. ज्ञानेश ला ही तिची कल्पना आवडते पण आई ला आवडत नाही.
"काय गरज आहे आताच जॉब ची रिझल्ट लागला की कर काय ते."- आई.
"विजया अग तिला करायचं तरं करूं दे ना. आता ती घरात बसून असणार त्यापेक्षा करूं दे तिला."- आबा.
"आई प्लिज."- मुक्ता.
"पण कशाला आता...."- आई थोड नाराजीत बोलते.
"विजया चहा दे."- बाबा चहा मागतात म्हणून आई आत जाते. बाबा मुक्ता ला धीर देतात मी समजावेल तिला. मुक्ता ही रिलॅक्स होते. आबा ज्ञानेश चहा घेतात आणि कामाला जायला निघतात.
"विजया येतो."- आबा .
"अहो...."- आई.
"आल्यावर बोलू...."- आबा. ते निघुन जातात. आई तिच्या कामाला लागते. मुक्ता ही पार्ट टाईम जॉब बघते सर्च करत असते. आणि सोबतच एखादा चांगला कोर्स. दिवसभराची काम आटपून ती आणि आई जेवतात आराम करतात. मुक्ता च्या डोक्यात एक आयडिया येते. ती घराबाहेर जाते आवरून आई ला सांगून. आई ही तिला जाऊं देते. आबांची येण्याची वेळ झाली. आई दिवाबत्ती करत असताना आबा येतात.
"विजया पाणी आण थोड."- आबा बसत म्हणतात. आई पाणी घेऊन येते.
"काय ओ थकेलेल वाटतं आहात."- आई.
"हो ग काम खुप होत आता साठे न च काम मला दिलं आणि माझं काम."- आबा.
"बसा फ्रेश व्हा. मी गरमा गरम चहा करते."- आई.
"कर खूप गरज आहे लवकर आण आलोच."- बाबा फ्रेश व्हायला जातात. आई चहा करते बाबा येतात त्यांना देते.
"आपले शेंडेफळ कुठे आहे."- आबा.
"बाहेर गेली, कुठे गेली सांगून गेली नाही. येइल बोलली लवकर."- आई.
"अच्छा. विजया मला माहीत आहे सकाळी तुला राग आला पण हे बघ आपल्या मुलीवर आपला विश्र्वास आहे ना मग कशाला काळजी करते. तिला करूं दे हवं ते आपल्या कडे आहे तो पर्यंत करणार मग सासरी गेली की कुठे हौस करता येईल. चांगलं सासर भेटल तरं ठीक."- आबा.
"अहो मी कुठे नाही म्हणते पण शिकून झाली की कर जॉब आणि हो लवकर लग्न नको. तिच्या इच्छे ने होऊ दे."- आई.
"हो हे अगदीं खर बोलली. सखी च न सांगता लग्न ठरलं आहे पुढल्या महिन्यात साखरपुडा लग्न आहे."- आबा चहाच कप ठेवत बोलले. आई ला आश्चर्यच धक्का बसला.
"तुम्हाला कोणी सांगीतलं, मुक्ता काही बोलली नाही."- आई विचारते.
"तिचे बाबा भेटलेले येताना ते बोलले. कशाला पुढें शिकवा आला स्थळ चांगलं करुन मोकळं व्हा. आमंत्रण दिलं आताच लग्नाचं.. सखी ला सांगितलं नाही अजुन. पुढल्या रविवारी ते मुलाकडचे पाहायला येणारं आहे."- आबा. हे ऐकून आईला ही सखी विषयी वाईट वाटतं. मुक्ता दारातून ओरडतच येते.
"ये आई, ये आई...."- मुक्ता. दोघ तिचा आवाज ऐकून शांत होतात.
"काय झालं ग एवढी खुश."- आई.
"अग मला जॉब पण भेटला आणि कोर्स पण. ते ही तूझ्या आवडत्या विषयात."- मुक्ता.
"माझा आवडता "- आई विचार करू लागते.
"सांग ना मुक्ता."- आबा.
"आबा मी शिवणकाम शिकणार ती वर्षा ताई ती बघा तिची छोटी इन्स्टिट्यूट आहे तिथे बघा मी शिकणार आणि बाजुला बुक शॉप आहे तिथे पार्ट टाईम करणार सकाळी. ९.३०- २ वाजेपर्यंत.. मग क्लास."- मुक्ता आनंदाने म्हणाली.
"हे बाकी शिकायचं बरोबर निवडलं तु.. पण हे काम कशाला."- आई विचारते.
"अग विजया कुठली काम छोटं मोठ नसत आपणच बघ पहिले तु घरासाठी शिवणकाम च करायची ना आणि मी परदेशी काकांच्या दुकानात जायचो नोकरी मध्ये ब्रेक भेटला तेव्हा. आता देवाच्या कृपेने चांगली नोकरी आहे सगळ नीट आहे."- आबा.
"ते ही झालंच चला मी बाकीचं आवरते."- आई.
"मी आले सखी ला कॉल करुन तिने कॉल केलेला आता उचलत नाही ती."- मुक्ता बोलते आणि आत जाते.
"विजया आताच मुक्ता ला सखी विषयी सांगू नकोस तिला वाईट वाटेल. सखी ला अजुन शिकायचं मुक्ता किती सांगते आपल्याला पण मदन काही केल्या ऐकत नाही."- आबा हताश होत म्हणाले.
"हो मदन दादा काही ऐकतात का. तुम्हीं समजूत घातली म्हणून त्या पोरीला शिकू दिलं. खरच सखी च वाईट वाटतं मला."- आई.. दोघ आपली काम करतं बसतात......
मुक्ता ला कळेल का सखी च्या लग्नाबद्दल? मुक्ता च पुढचा प्रवास सुरु होणार.... तिची जिद्द मेहनत आणि एक नवं वळण कसं असेल पाहुया पुढें.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा