"आई आबा...."- ज्ञानेश संध्याकाळी घरी पाऊल ठेवत च आत येतो आणि ओरडू लागतो.
"ज्ञाना काय झालं?"- आबा.
"आबा तुम्हाला कळलं का? अस कस सखी चे बाबा करू शकतात."- ज्ञानेश.
"हे बघ जे झालं ते झालं तुला कस माहित पडलं पण."- आबा.
"अहो आज पाहील मी तिला स्टेशन ला सोबत ३ माणसं होती आताच ती एका ट्रेन मध्ये बसून गेली गळ्यात मंगळसूत्र...."- ज्ञानेश.
"ज्ञाना हळू बोल मुक्ता आत च आहे ती सखी ला फोन लावते पण लागत नाही. तिला आम्ही सांगितलं नाही काही आणि हो आम्हाला ही माहिती होती सखी च्या लग्नाची. मदन ने परस्पर सगळ ठरवलं आणि लग्न करून तिला कायमची गावी पाठवली."- आबा.
"ज्ञाना हे सगळ मुक्ता ला आताच सांगू नकोस."- आई ही बाहेर येत म्हणाली.
"काय सांगू नकोस म्हणते आई..."- मुक्ता बाहेर येत म्हणाली.
"काही नाही ग ते आई ला मी ट्रेन मध्ये आज कशी मारामारी झाली ते सांगत होतो."- ज्ञानेश.
"अरे दादा निदान माझ्याशी तरी खोट बोलू नको."- मुक्ता आता तिचे डोळे लाल झालेले डोळ्यातून पाणी येत होते.
"मुक्ता अग..."- आई.
"आई आबा का लपवलं सांगा ना तुम्हाला माहित होत ना मदन काका अस करणार आहे."- मुक्ता.
"हे बघ मुक्ता तो काही ऐकण्याचा मन स्थिती मध्ये नव्हता. त्याच्यासाठी आणि त्याच्या घरच्या साठी मुलगी ही एक ओझ आहे एवढंच आहे. तिचं लग्न ही त्याने गावी जाऊन लावलं आज अचानक ह्याला कशी दिसली ती देव जाणे कारण मी आणि बाकी मंडळींनी त्याला विरोध केला असता म्हणून तो गावी निघून गेलेला. नयना चे बाबा तर कितीदा त्याच्या घरी जाऊन आले फक्त तुम्हा मुलीनं आम्ही काही सांगितलं नाही."- आबा.
"आबा अहो काय चूक होती त्या सखी ची सांगा ना... का काका असे वागले... तिची सगळी स्वप्न तिने मारली हो लहानपणा पासून. कुठे असेल ती कशी असेल ती."- असे म्हणत मुक्ता आबांच्या मांडीवर डोक ठेऊन रडते.
"बाळा रडू नकोस भगवंत आहे तिच्या पाठीशी... सगळ नीट होईल बाळा अशी रडू नकोस तिच्यासाठी प्रार्थना कर चल आपण प्रार्थना करूया."- आबा तिला देवासमोर उभे करतात.
मुक्ता ला खूप मोठा धक्का लागलेला असतो. ती तिच्या मैत्रिणीनं ही सगळ सांगते त्या ही एकमेकांच सांत्वन करून रडू लागतात. आबा मनाशी ठरवतात आणि आई ला ही समजावतात मुक्ता चे जॉब विषयी आई ही तयार होते.
मुक्ता जवळच्या एका कॉम्प्युटर क्लास मध्ये जॉब साठी जाते. सकाळी ३ तास आणि संध्याकाळी ३ तास बाबा ही तिला परवानगी देतात. दिवस जात असतात एक महिना होतो. मुक्ता ही कामात रुळली असते तरी अधून मधून तिला सखी ची आठवण येते.
"विजया बघ दोन्ही मूल आपापल्या परीने आपल्या पुढील वाटचाली साठी किती कष्ट घेत आहे."- आबा जेवण झाल्यावर रात्री आईशी गप्पा मारत होते झोपताना.
"हो ते ही आहे पण मुक्ता ला खरच गरज आहे का?"- विजया (आई) थोडी नाराजीत म्हणाली.
"हे बघ विजया आपण कधीच मुलगा मुलगी भेद केला नाही जस आपण ज्ञाना ला परवानगी दिली तशीच तिला. त्यातून ती जॉब करते एक वेगळा आत्मविश्वास तिच्यात येईल पुढे जाऊन तिला तिच्या आवडत्या गोष्टीत काम करायचं हा अनुभव नक्की कामी येईल तिला. एकच सांगतो ती ह्या मुळे आपल्यावर मनापासून विश्वास ठेवते काही लपवत नाही सगळ सांगते हेच मुख्य आहे आपल्यासाठी. काळजी करू नको सगळ छान होईल तीच आणि हो सखी बद्दल ही तिचे विचार सध्या बंद आहेत नाही तर मध्ये किती कोमेजून गेलेली."- आबा.
"हो तुम्ही म्हणतात तसेच आहे. आपण विश्वास ठेवायला हवं तिच्यावर. तरी मुक्ता आपलं किती विचार करते ना."- विजया.
"मग आपले संस्कार तर आहेच पण मूल आपली काळजी ही किती करतात.... चला झोपूया उद्या जायचे ऑफिस ला."- आबा.
मुक्ता ची स्वप्न पूर्ण होतील का? सखी सारखं अनपेक्षित वळण मिळेल का मुक्ता च्या आयुष्याला पाहुया येणाऱ्या पुढील भागात.
©®- श्वेता पवार
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा