Login

मुक्तरंग - रंग आयुष्याचे भाग ८

गोष्ट ध्येयवेड्या मुलीची
"मुक्ता मी नयना बोलते कुठे आहेस तू?"-नयना.

"अग मी क्लास मध्ये आहे बोल ना काय झालं?"-मुक्ता.

"तू विसरली वाटत आज आपला रिझल्ट आहे लवकर ये कॉलेज ला लिस्ट लागली."-नयना.

"काय तू मला आता सांगते थांब मी आलेच घरी जाऊन लगेच येते."- मुक्ता. मुक्ता क्लास च्या सरांशी बोलते ते ही तिला जायला परवानगी देतात कारण तिचं काम प्रामाणिक होत ती धावत घरी येते.

"आई आई मी कॉलेज ला जाते."- मुक्ता.

"अग काय झालं... ही कुठे गेली."- विजया.

"आई आज आमचा रिझल्ट आहे, नयना ने कॉल केला. माझ्या तर डोक्यातून निघून गेलेल. मी कळवते तुला तस येते चल मी."- आपली बॅग घेत मुक्ता बाहेर निघाली.

"ठीक आहे सांभाळून जा.... कळव..."- विजया मागून तिला बोलते आणि घरात येऊन देवापुढे हात जोडून उरलेल्या कामाला लागते.

"ये सरक ना पाहू दे ना...."- नयना एका मुलाला बोलते तो ही थोडी हुज्जत घालतो परत एक दोन मुली ही त्याच्याशी हुज्जत घालत असतात. मुक्ता पळत येते. ती त्या घोळक्यामध्ये जायचं प्रयत्न करते.

"अग कुठे होतीस किती वेळ वाट पाहतो."- किर्ती

"अग क्लास मध्ये होती मी तर पूर्ण विसरून गेलेली रिझल्ट च नशीब नयना ने सांगितलं पण ती आहे कुठे?"- मुक्ता

"ती बघ तिथे आहे रिझल्ट पाहते आपले."- किर्ती.

"किर्ती........ मुक्ता या लवकर..."- नयना ओरडते त्या दोघी जातात तिथे. रिझल्ट पाहून दोघींना धक्का बसतो.

किर्ती आणि नयना ला सारखे मार्क असतात.... डिस्टिंक्शन असते मुक्ता कॉलेज मध्ये ३ री असते आणि सखी सखी चे मार्क पाहून तिघांच्या डोळ्यात पाणी येते.... सखी कॉलेज मध्ये पहिली आलेली असते..

"आज सखी तू हवी होतीस ग.... का गेली आमच्या पासून दूर तू..."-नयना.

"हो ना मदन काका ना सांगाव लागेल तिचे मार्क."- किर्ती.

"उपयोग नाही आता काही."- मुक्ता. बाजूला एका बँच वर बसून बोलते

"काय ग काय झालं?"- नयना.

"तिचं लग्न झालं तशी काकांनी तिला तंबी दिली शिक्षण हा विषय डोक्यातून काढून टाकायची तिचा मोबाईल काढून घेतला. तिच्या नवऱ्याला ही सांगितलं तिला मोबाईल द्यायचं नाही. बाबा भेटायला गेलेले त्यांना तेव्हा मदन काका बोलले."- मुक्ता.

"हे चुकीचं आहे पण मुक्ता आपल्याला थोड तरी बोलाव लागेल च चल मार्कशीट घेऊ आणि तिच्या घरी जाऊया."- किर्ती

"नको उगाच मदन काका काही बोलायचे त्यातून तिच्या आई ला तर काही बोलून त्रास देतील."- नयना.

"किर्ती बरोबर बोलते जाऊया तिच्या घरी चला आणि पेढे घेऊन च जाऊया काका ना जाणीव करून द्यायला हवी आधी आपल्या घरी कळवू पास झाल्याचे मग जाऊ तिथे."- मुक्ता काहीश्या निर्धाराने बोलते. तिघी घरी कळवतात फक्त सखी च्या घरी जात आहे हे सांगत नाही. उशीर होणार एवढ सांगतात.

काय करणार ह्या तिघी सखी च्या घरी जाऊन? सखी चे घरचे सखी चे मार्क पाहून कसे रिऍक्ट होतील? वाचूया पुढील भागात