Login

मुक्तरंग - रंग आयुष्याचे भाग ९

ध्येयवेड्या मुलीची गोष्ट
"कोण एवढ्या जोरात दरवाजा वाजवत आहे? ममता बघ जरा."- मदन वैतागुन बोलतो.

"अहो मी पाणी भरते तुम्ही बघा ना."-ममता आतून बोलते.

"ये म्हश्या बघ कोण आलं.... उठतो का? दिवसभर मोबाईल घेऊन पडलेला असतो."-मदन वैभव ला म्हणाला तसं तो ही वैतागुन उठला दरवाजा उघडला.

"मदन काका येऊ का?"- नयना.

"तुम्ही? काय काम आहे?"- मदन तिघींना पाहून वैतागतो आणि थोडा राग ही येतो.

"अहो काका घरात घेणार की बाहेरूनच पळवून लावणार."- किर्ती वैभव ला बाजूला करून आत येते तिच्या मागून त्या दोघी येतात.

"काय काम आहे तुमचं? तुमची मैत्रीण आता इथे राहत नाही कुठे राहते हे मी सांगणार पण नाही."- मदन ते ऐकून तिघींना राग येतो.

"सांगू पण नका लग्न करून घराबाहेर काढलं ना.... आम्ही तुम्हाला खास भेटायला आलो हे घ्या पेढे."- किर्ती एक पेढा काढते त्याच्या तोंडात जबरदस्ती कोंबते. सखी ची आई ही आवाज ऐकून बाहेर येते तिच्याही तोंडात कोंबते आणि एक पेढा तिच्या भावाच्या.

"ये मुली हा काय प्रकार आहे...."- मदन रागात बोलतो.

"काका अहो आज आम्ही खूप आनंदात आहोत म्हणून आलो आमच्या आनंदात तुम्हाला सहभागी करायला. आता आमची मैत्रीण नाही आहे तर काय झालं तिचे प्राणहून प्रिय असलेले तिला तिचे आई वडील आहे ना..... काका अहो आजचा दिवस सोन्याचा दिवस आहे आमच्यासाठी आज आमचा रिझल्ट होता ना...."- नयना.

"मग मी काय करू? तुमच्या रिझल्ट च आणि माझा काय संबंध आहे."- मदन.

"अस कस काका बोलता अहो तुमच्या अश्या वागण्याने तर आमचे रिझल्ट किती छान आले बघा जरा..... किती मोठी शिक्षा दिली तुम्ही सखी ला..."-किर्ती रागात ओरडत बोलते. मदन त्या रिझल्ट कडे पाहतो... त्याचे डोळे पांढरे पडतात.. ममता आणि वैभव ही जवळ येऊन पाहतात.. ममता तर रडायला लागते.

"काकू रडून काय उपयोग. जी मुलगी एवढी अव्वल आली ती भविष्यात अजून शिकून तुमचं नाव करणार होती ना पण तुम्ही शी.... तिची सगळी स्वप्न धुळीला मिळवली."- नयना.

"आमच्या मुलीच काय करायचं काय नाही ते आम्ही ठरवू कळलं का..."- मदन रागात बोलला.

"अच्छा तिच्या आयुष्याची वाट लावायची का? अहो हिरा होती तुमची मुलगी तिला तुमच्या साठी काय काय करायचं होत पण तुम्ही शी.... जन्म कशाला दिला तिला... किती रडायची ती."- किर्ती पटकन रागात बोलते तसे सखी चे वडील मदन हातातील पेपर्स फेकून देतात.

"ह्या ह्या मार्कांच लोणच घालू का? शिकली तरी काय करणार नवऱ्याकडे जाणार ना. आमचा काय संबंध मग. मुलगी आहे मुलीने जास्त शिकून काय रांधा वाढा करायचं. तिची आई आमच्या वेळी ची १२ वी बर का पण काय तिच्या बापाने माझ्यासारख्या १० वी पास शी लग्न करून दिलं काय करते ही तेच आता सखी करते. मुलगी काय दिवे लावणार शिकून. शिकली तर तुमच्या सारखी डोक्यावर मिऱ्या वाटेल. जन्माला आली तेव्हा च मेली असती तर...."- मदन. रागात बोलले शब्द एवढे तीव्र होते की आज मुक्ता च आवाज चढला.

"काका बास खूप बोललात. स्वतः च पोटच्या मुलीला अस बोलता लाज कशी वाटली नाही. बरं झालं एका अर्थी लग्न झालं बिचारी सुटली एकदाची. तिची स्वप्न तिची इच्छा सगळ्या मेल्या तुमच्या मुळे. तुमच्या दोघांसाठी काय काय करायचं होत पण सतत धाकात होती. आबांना येऊन हात पाय जोडायची अहो आबा नेहमी तिला त्यांची मुलगी मानून तुमच्या कडे यायचे कारण आबांना तिची तगमग कळायची. तिचं लग्न झालं हे कळलं त्या दिवशी आबा जेवले नाही किती दुःख झालेलं कारण तिची स्वप्न आबा ही जगत होते तिच्या सोबत. बरोबर बोललात शिकून काय होणार अगदी बरोबर पण किमान तिच्या आयुष्याची माती तरी करायची नाही. लग्न करून तरी कुठे सुखी आहे ती ... माझ्या दादाने ने पाहील तिला तब्येत खराब किती झाली त्यातून ते दोन माणस तिच्याशी अरेरावी करत होते. आमच्या सखी ला दोन वेळेच खायला तरी देत असतील का? अहो शिकून खूप मोठ व्हायचं स्वप्न होत तिच. ऑफिसर व्हायचं त्या साठी ती किती अभ्यास करत होती. ह्या ह्या किर्ती ला बोलता ना तुम्ही डोक्यावर मिऱ्या वाटणारी अहो तिच्या आई बाबांनी च सखी ला गेली ३ वर्ष अभ्यासाची पुस्तक दिली. स्वतःच मुली सोबत तिला ही शिकवत होते ते. ती अर्धा वेळ कॉलेज करून अर्धा वेळ किर्ती च्या आई च्या बुटिक मध्ये ड्रेस शिवायची कारण तिला कोणाचे उपकार नको होते. एकदा ती उशीरा आली म्हणून ज्या प्रकारे तुम्ही तिला मारलं हाकलले ते पाहून एखाद्या पाषाणाला पाझर फुटला असता पण नाही तुम्हाला तिचं ऐकायचं नव्हतं न. शेवटी किर्ती चे बाबा तिला घेऊन गेले त्यांच्या घरी. किर्ती च्या आई ने तिची काळजी घेतली. आबा सुद्धा भेटून आलेले तिला तेव्हा. हा वैभव ताई ताई करत रात्री च रडत आला तिला शोधत शेवटी दादा ने त्याला किर्ती च्या घरी नेले रात्री चे १ वाजलेले. पण तुम्ही शी काका खरंच एवढे कसे निर्दयी वागलात."- मुक्ता रागात बोलून शांत झाली. आज तिचं अस वागणं सगळ्यांसाठी अनपेक्षित होत. शांत समंजस मुक्ता एवढी तिची ओळख. पण आज मुक्ता च हा एक नवीन रंग पाहिला मिळालं सगळ्यांना खास करून किर्ती नयना ला. आपल्या मैत्रिणीसाठी बाजू घेणारी मुक्ता सगळ्यांना माहित होती पण आज तिच्या साठी भांडणारी मुक्ता आज सगळे पाहत होते. ममता आणि वैभव एका कोपऱ्यात एकमेकांना बिलगून रडत होते.

तिघी तिथून निघून आपापल्या घरी जातात. मुक्ता घरी येते तेव्हा ज्ञानेश आलेला होता आणि आबा ही.

"मुक्ता पेढे आणले का."- ज्ञानेश हसत बोलतो. मुक्ता मात्र हातातील बॉक्स त्याला देत निघून जाते आत जाऊन पाणी पिते. आई आणि आबा ही पाहतात अशी अचानक आत गेली न बोलता. बाहेर येते देवाला नमस्कार करते.

"आबा हा रिझल्ट. मी तिसरी आली."- मुक्ता अगदी शांत सांगते.

"अरे व्वा अभिनंदन बेटा."- आबा.

"व्वा व्वा छान मुक्ता अभिनंदन."- विजया.

"व्वा काँग्रेटुलेशन.... पार्टी बनती हे... ये..."- ज्ञानेश तिला मिठी मारतो आणि तिच्याकडे पाहतो चेहरा अगदी निर्विकार असतो.

"आबा विचारणार नाही पहिले कोण आले."- मुक्ता.

"बेटा हे बघ तू तुझ्या बाजूने १००% दिले ना बस.... आम्हाला आनंद आहे तू पास झाली त्याच."- आबा.

"आबा विचारांना कोण आलं पहिले..."- मुक्ता त्यांच्या जवळ येऊन बसते खाली त्यांच्या मांडीवर हात ठेवते आबांना कळत नाही हिला काय झालं. विजया डोळ्यांनी खुणावतात विचारा.

"कोण बाळा?"- आबा.

"सखी..... आबा सखी..."- मुक्ता बोलते आणि त्याच्या मांडीवर डोक ठेवून जोरजोरात रडते. आई आणि ज्ञानेश दोघ सुन्न होतात ऐकून.

मुक्ता च आज च हा नवीन रंग कसा वाटला? आबा तिला काय सल्ला देतील? पुढे काय भविष्य आहे मुक्ता चे वाचूया पुढील भागात.....