Login

मुक्तरंग - रंग आयुष्याचे भाग १.

एका स्वच्छंदी मुलीची रंगीबेरंगी दुनिया. दुसऱ्यांच्या आयुष्यात विविध रंग भरणारी ती..... ह्या रंगीबेरंगी दूनियात पाहूया कुठलं अनपेक्षित वळण येत....
मंदिरात अंतरात तोच नांदताहे
नाना देही नाना रूपी तुझा देव आहे
तोच मंगलाची मूर्ती, तोच विठ्ठलाची कीर्ती
तोच श्याम, तोच राम, दत्तधाम आहे
संताचिया कीर्तनात, साधकांच्या चिंतनात
तोच ध्यास, तोच आस, तोच श्वास आहे
तोच बाल्य, तारुण्यही, वार्धक्याचा विश्रामही
तोच ऐल, तोच पैल, आदि अंत आहे...

"वाह सकाळी सकाळी एफएम वर हे गाणं ऐकलं ते ही पुजा करताना मन अगदीं प्रसन्न झालं बघ .मस्त पैकी गरमा गरम चहा दे लवकर मला."- शिवराम (नायिकेचे वडील त्यांना सगळे आबा म्हणता).

"होणारच मन प्रसन्न तुमच्या आवडीची गाणी ना... आणते च चहा वाट पाहत होते देवपूजा होण्याची."- विजया. (नायिकेची आई).

"अग आज मला उशीर होणार आहे काल सांगायचं राहिलं अग ते साठे नाही का आमच्या ऑफिस मधले त्यांच आज सेवानिवृत्त कार्यक्रम आहे त्यामुळे मला अर्धा तास उशीर होणार आहे."- आबा आवरता आवरता म्हणाले.

"अच्छा ठीक आहे, हा घ्या गरमा गरम तुमचं चहा आणि नाष्टा. डब्बा ठेवला इथे."- विजया.

"आपल्या घरात किलबिलाट सुरु नाही झाला अजून "- नाष्टा करत आबा विचारतात.

"होईल इतक्यात सुरु बघा."- विजया.

"ये जा ग तिकडे मला आवरू दे, हे काय पुन्हा माझ्या बॅग वर हा ओला टॉवेल मुद्दाम करते ना..."- एका मुलाचा आवाज आला आतून.

"ये मुद्दाम करत नाही कळलं ना.. आणि मध्ये तु येतो सारखं.. ते दे मला..."- एका मुलीचं आवाज येतो.

"बघा सुरु झाला किलबिलाट "- विजया .

"आई पटकन नाष्टा दे खुप भूक लागली."- तो मुलगा.

"हे घे, आणि हा डब्बा."- विजया.

"अरे ज्ञाना हळू खा ठसका लागेल."- आबा.

"आबा अहो आज जरा घाई आहे, आज डिपार्टमेंट हेड मीटिंग आहे सगळ्यांना लवकर बोलावलं आहे म्हणूनच अजून लवकर निघतो. एक तरं ट्रॅफिक एवढं लागत."- ज्ञानेश. ( नायिकेचा मोठा भाऊ).

"आई मला पण दे पटकन नाष्टा... डब्बा पण दे."- ती मुलगी.

"तुला कसली घाई."- ज्ञानेश.

"तुला काय करायचं... तू खा पटकन."- ती मुलगी.

"अरे शांत व्हा दोघं आणि नाष्टा करा."- आई. ( विजयाला मुल आई म्हणता म्हणून कथेचं तिला आई हे संबोधन)

"चला येतो मी..."- ज्ञानेश उठतो बॅग मध्ये डब्बा ठेऊन पटकन बाहेर पडला.

"ये दादा थांब मी येते ना... दादा... " ती मुलगी.

"बाळा अग जाऊं दे . तू बस ने जा.. एक दिवस कर ऍडजस्ट."- आई.

"अग आई माझ पण महत्वाची लेक्चर आहे, तो काल बोलला मी लवकर जाणार म्हणूनच मी ही लवकर तयार झाले मलापण लवकर जायचं होत."- ती मुलगी.

"काळजी करू नकोस मी सोडतो तुला."- आबा. तितक्यात बाईक च्या हॉर्न च आवाज येतो. आई आबा आणि ती दरवाजाच्या दिशेने पाहतात.

"चल बस पटकन... नाही तर आल्यावर मला मारशील "- ज्ञानेश.

"दादा तु पण ना थांब आलेच. येते आई आबा"- ती मुलगी.

"बस पटकन मला उशीर होतो शेंबडी... त्यातुन तूझ्या मैत्रिणी तुझ्या वाट पाहत असतील कॉलेज गेट वर."- ज्ञानेश. दोघ निघुन जातात आबा आणि आई ला निरोप देउन.

"पाहिलास भांड भांड भांडत असतात मस्करी करतात.. पण जीव किती लावतात एकमेकांना.. आपली मुलं आहेच अशी गुणी चल मी येतों."- आबा.

"हो बरोबर बोललात, गुणीची आहे आपले ज्ञानेश आणि मुक्ता ज्ञानेश ज्ञानाचा झरा आणि मुक्ता आयुष्यातली रंगीबिरंगी आनंदाची छटा."- आई. आबा आई चा निरोप घेऊन निघतात.

तरं ही आहे आपली मुक्ता आणि तिचे छोटेसे कुटुंब देशमुख कुटुंब. पुढे पाहूया मुक्ताच्या आयुष्याचा प्रवास...