Login

मुक्तरंग - रंग आयुष्याचे भाग १२

नारीवादी
"ताई सांभाळून...."- मुक्ता एका बाई च हात ओढते.

"थँक्यू ताई.... खरच माझी चूक लक्ष नव्हते."- ती बाई.

"ताई तुम्ही बरोबर चालत होतात ती गाडी चुकीच्या मार्गाने येत होती."- मुक्ता.

"हो ह्या ताई बरोबर बोलता ह्या गाडी वाल्याचे लक्ष च नव्हते."- तिथला एक माणूस. एव्हाना गाडी आणि मुक्ता ह्यांच्या अवती भोवती गर्दी जमलेली.

"ओ नो....."- एक माणूस जोरात ओरडतो.

"काय झालं गणू...."- गाडीत बसलेला माणूस.

"साहेब लवकर जायच्या नादात मी गाडी फास्ट केली आणि शॉर्ट कट घेतला राँग वे ने आणि ही बाई गाडीसमोर आली."- गणू.

"अरे बाबा एक तर आज काम जास्त जा जाऊन बघ लवकर लागला का? हॉस्पिटल ला न्याव लागेल नाही तर जा..."- तो माणूस.

"ताई तुम्ही ठीक आहात ना?"- मुक्ता.

"हो... हम.. हा..."- ती बाई थोडी शुद्धीत येते.. अचानक आलेल्या गाडीला पाहून ती घाबरली होती आणि तिची शुद्ध हरपली ते नशीब मुक्ता ने तिला मागे खेचलं.

"हे घ्या पाणी.... बर वाटेल."- मुक्ता.

"थँक्यू.."- ती बाई पाणी पित म्हणाली.

"एक मिनिट ती गाडी होती ती कुठे गेली थांबा ताई बसा इथे मी बघते त्या गाडीवाल्याला."- मुक्ता उठली तस दिनेश धावत येऊन माफी मागत होता.

"ताई माफ करा ते लवकर..."- गणू.

"लवकर काय लवकर हा तुमच्या लवकर मुळे त्या ताई त्यांचं काय झालं असत तर...."- मुक्ता. आणि मुक्ता फार बोलली त्याला मागून आलेली व्यक्ती ऐकत होती आणि मुक्ताची दुसरी बाजू त्याला कळली की मुक्ता ही कोणाच्याही मदतीला धावून येणारी निस्वार्थी मुलगी आहे. शेवटी गणू माफी मागून त्या बाई ला हॉस्पिटल ला घेऊन जायचं म्हणतो पण ती बाई त्याला माफ करून ती स्वतः जाईल म्हणून घरी जायला निघते.. गणू तिला रिक्षा करून देतो मुक्ता त्या बाई ला व्यवस्थित बसून देते. मुक्ता मागे वळते आणि बघते तिला आश्चर्यच धक्का च बसतो.

"सर तुम्ही?"- मुक्ता हर्षित च्या वडिलांना पाहून म्हणते.

"हो मी त्या बाई ज्या गाडी समोर आलेल्या ती आमची होती हा माझा ड्रायवर आहे गणु खरंच चूक आमची होती. खर तर तू होतीस म्हणून प्रकरण जास्त पुढे गेले नाही आणि त्या बाई ने ही थोड समजून घेतलं नाही तर एव्हाना आमच्यावर केस झाली असती."- हर्षित चे वडील थोड हसत म्हणता. ते तिला त्यांच्या सोबत ऑफिस मध्ये सोडायचे म्हणतात ती पहिले तयार होत नाही पण ते तिला विनंती करतात सारखे मग ती त्यांना मान देऊन त्यांच्या सोबत ऑफिस ला जाते. मध्ये त्यांचे थोडे बोलणे होते. ते ऑफिस मध्ये पोहचतात आणि एन्टरन्स मधून आत जाताना हर्षित त्यांना पाहतो तो लपतो. थोड्या वेळाने तो वडिलांच्या केबिन मध्ये जाऊन विचारतो तेव्हा त्याला कळते सगळे. त्याला लपताना गणू पाहतो.

"माय बॉय खरंच हिरा शोधला तू.... खुप छान मुलगी आहे ती."- हर्षित चे पप्पा.

"पप्पा तुम्ही पण ना अजून मलाच कन्फर्म होऊ दे ना..."- तो हसत म्हटलं.

दिवस असेच जात होते मुक्ता ही आता हर्षित च्या वडिलांचीही लाडकी झाली होती. एक दिवस अचानक मुक्ता त्यांच्या केबिन मध्ये जाते तिथे हर्षित असतो.. त्याच्या वडिलांचे लक्ष नसते ते तिला यायची परवानगी देतात.

"सर ही फाईल तुम्ही मला दिलेली त्यात मी बऱ्याच डिझाइन चेक केल्या पण थोड वर्क इन्कम्पलीट वाटलं म्हणून पूर्ण केलं आणि ही दुसरी फाईल हयात मी थोडे एरर लिहून ठेवले कदाचित कामामुळे सराना लक्षात आले नसतील, एक फाईल मी मॅनेजर सराना दिली."- मुक्ता.

"ओके थँक्यू, दोन मिनिट बस.... मी एक मेल बघतो आपण सविस्तर बोलूया."- हर्षित चे पप्पा त्यांना एव्हाना हे ही लक्षात नसत की हर्षित तिथे आहे.. हर्षित तिला पाहून फाईल तोंडाजवळ धरून बसतो.

ती बसते तिचं लक्ष सहज त्याच्या कडे जाते तो सारखा ती फाईल तोंडाकडे धरत असतो. तिला थोड विचित्र वाटत पण ती विषय सोडून देते तरी सहज लक्ष जातच जात तिचे तिला वेगळच वाटत.

"खरच काही लोक किती विचित्र असता काय वेडा सारखं करतो हा माणूस."- असे म्हणत ती तोंड फिरवते आणि ते हर्षित पाहतो. तो थोडा हसतो.

"वेल मुक्ता मी ही फाईल पाहिली तू जे एरर काढले खर सांगतो आमच्या इथे ज्युनिअर डायरेक्टर ही शोधू शकले नसते. खरंच धाक नाहीच कोणाचा कामावर.... हर्षित जस्ट शो... ह्याला म्हणतात काम... हर्षित काय सुरू आहे तुझं हे का फाईल तोंडासमोर धरून बसला. ह्याला म्हणतात काम बघ जरा नीट. हर्षित..."- शेवटच हर्षित हे वाक्य त्याचे पप्पा जोरात बोलतात.

"हा येस काय पप्पा......"पप्पा मधला प्पा मात्र तो तोंडात गिळतो..

मुक्ता फक्त नी फक्त त्याच्याकडे पाहत राहते तिला विश्वास बसत नसतो हर्षित तिचा आयडॉल तिच्या समोर पुन्हा आहे.....

खूप वेळ ती त्याच्यासोबत असते दोघ काही बोलत नाही. त्याचे पप्पा तिच्या कामाच कौतुक करतात. ती जाते तो मात्र त्याच्या पप्पांकडे थोड रागात पाहतो.

"हे लिसेन मला काय माहित अस होणार आहे."- त्याचे पप्पा खांदे उडवत म्हणतात.

"पप्पा..."- हर्षित एक भुवई उडवत हाताची घडी घालत म्हणतो.

"हे बघ आज न उद्या तिला कळणार होत सो व्हॉट... जा आता आमच्या सुनबाई ल मनव."- हर्षित चे पप्पा हसत म्हणतात.

मुक्ता ला विश्वास नसतो की ती हर्षित ला भेटली. घरी येऊनही तिचं कामत लक्ष नसत असेच तिचे दिवसामागून दिवस जातात.

तिला कळत नसत हे काय होतं. हल्ली हर्षित ही तिला कामानिमित रोज भेटतो आणि दोघांचे बोलणं सुरू होत. बघता बघता २ वर्ष होतात मुक्ता ला तिथे. हर्षित आणि ती ऑफिस बाहेर मित्र असतात ऑफिस मध्ये सिनियर ज्युनिअर. दोघांना एकमेकांची कंपनी खूप आवडते. वेळ कसा जातो सोबत हे कळत ही नाही त्यांना.

"अहो मी काय म्हणते आता मुक्ता च्या लग्नाचे बघायला हवे."- विजया.

"विजया मुलगी अजून २३ वर्षाची आहे."- आबा.

"अहो २३ म्हणजे कमी आहे का? आतापासून सुरू केलं तर पुढे जाऊन नीट वयात होईल...."- विजया.

"ठीक आहे तुम्हाला जसे योग्य वाटेल तसे करा पण आपल्या दुसऱ्या लाडोबासाठी ही पाहायला सुरू करा नाही म्हटलं २७ चे झाले आता ते त्यांचं ही योग्य वयात हवं लग्न."- आबा बोलतात आणि पारायण करायला बसतात. मुक्ता सगळ बोलण ऐकते तिचे मन अचानक अस्वस्थ होते.

काय कारण असेल मन अस्वस्थ होण्यामागे? मुक्ता पुढे काय करेल वाचूया क्रमशः....