मुलांची दिवाळी
दिनूला दिवाळीची सुट्टी लागली होती. त्याचा मित्र गणेश, दोघे मिळून किल्ला बनवायला लागले होते. त्यांनी शेतातून माती आणली होती. ती साफ करून घेतली. दिनूने पाणी आणले, गणेशने जिथे किल्ला करायचा तिथे जागा साफ केली. माती भिजवून घेतली. त्यांनी किल्ला करायला घेतला. दोघांनी मिळून छान किल्ला बांधला होता. आणि दोघेही आपल्या घरी निघून गेले.
दिनूच्या आईने नवीन पणत्या आणल्या होत्या. दिनूची बहीण त्यांना रंग लावत होती, त्यावर नक्षी काढत होती. दिनू घरी आला, त्याने एक पणतीला हात लावला. त्याची बहीण चिडली आणि दिनूच्या मागे पळाली. त्यांची मस्ती किती वेळ चालू होती! आईने ओरडल्यावर दोघेही गप्प बसले.
दिनूची बहीण काजल पणत्या उन्हात ठेवायला गेली.
आई फराळ करत होती. घरभर त्याचा सुगंध पसरला होता. दिनू किचनमध्ये गेला.
आई फराळ करत होती. घरभर त्याचा सुगंध पसरला होता. दिनू किचनमध्ये गेला.
“आई, मला खायला दे ना,” दिनू म्हणाला.
“दिनू, आधी आपण देवाला दाखवू, मग तू खा. तुझा किल्ला झाला का?” दिनूची आई म्हणाली.
“मी आणि गणेशने बनवला,” दिनू म्हणाला.
तेवढ्यात दिनूची आई... दिनूची आई... गणेशची आई हाक मारत आली.
“काय गं?” दिनूची आई म्हणाली.
“चकली केली होती, जरा बघतेस का? छान झाली आहे का?” गणेशची आई म्हणाली.
“आधी देवाला दाखवायचं ना,” दिनूची आई म्हणाली.
“मी आधीच पाच–सहा बाजूला काढून ठेवते. मुलांना आणि घरच्यांना गरम गरम खायला आवडतं. आपण कोणासाठी बनवतो — त्यांच्यासाठीच असतं ना,” गणेशची आई म्हणाली.
“काकू, तुम्ही बरोबर बोललात. मला पण खायचं आहे. मी चकली घेऊ का?” दिनू म्हणाला.
“घे दिनू,” त्या म्हणाल्या.
दिनूने चकली घेतली आणि बाहेर निघून गेला.
“मी पण आता तसंच करते. दिनू केव्हाच मागत होता, मी दिलीच नाही,” दिनूची आई म्हणाली.
“आपण मुलांसाठीच तर करतो. चल आता मी निघते, तेल तापत ठेवले आहे,” गणेशची आई म्हणाली.
“मी पण करते,” दिनूची आई म्हणाली.
त्यांचा फराळ चालू होता. काहीही बनवलं की, एकमेकींना चव घ्यायला देत होत्या.
दिनू आणि गणेश रोज किल्ला बघायला जात होते. त्याला पाण्याने नीट करत होते. असंच दिवस जात होते.
दिनूच्या बाबांनी दिनूला आणि त्याच्या बहिणीला कपडे आणले होते. त्यांनी दिले. दोघेही खूप खुश झाले. दिनू लगेच गणेशला दाखवायला गेला. गणेशच्या बाबांनी पण त्याला कपडे आणले होते. दोघांनी एकमेकांना दाखवले.
दिवाळीचे दिवस सुरू झाले.
दिनूची बहीण अंगण झाडत होती, तिथे पाणी मारत होती. ते सुकल्यावर तिथे रांगोळी काढत होती. आई तिला बघायला आली. तिने काढलेली रांगोळी पाहून आईला खूप आवडली.
“काजल, किती छान रांगोळी काढलीस!” आई म्हणाली.
“काजल, आमच्या दारात पण रांगोळी काढून दे ना,” गणेशची आई म्हणाली.
काजलने तिथेही रांगोळी काढली.
दिनू आणि गणेश पण आले. “काजल, आमच्या किल्ल्याजवळ पण रांगोळी काढून दे ना,” ते म्हणाले.
काजलने त्यांच्या किल्ल्याजवळ पण रांगोळी काढली.
घरी आले, मस्त हातपाय धुतले, नवीन कपडे घातले. आईने पूजा मांडली होती. त्यांनी पूजा केली. बाकीच्यांनीही पूजा केली. आई–बाबांच्या पाया पडले.
“बाबा, आपण फटाके फोडू ना?” दिनू म्हणाला.
“आधी आईला दिवे लावू दे. काजल, आईला मदत कर. दिनू, किल्ल्याजवळ दिवे लावून ये,” बाबा म्हणाले.
दिनूने किल्ल्याजवळ काजलला दिवे लावायला सांगितले. काजलने दिवे लावले. तिच्या रांगोळीच्या जवळही तिने दिवे लावले.
नंतर त्यांनी फटाके फोडले. आई–बाबा त्यांना आनंदात बघत होते.
---