Login

मुलांसाठी जीव तुटतो.. (भाग अंतिम)

आई-वडिलांचा जीव मुलांसाठी तुटतोच...
दुसऱ्या दिवशी सकाळी बापू आवाज देतात.
अरे ईशान बाळा उठलास का?
ईशान गुड मॉर्निंग आजोबा...
अरे इकडे ये.....ईशान ती आंब्यांची पेटी इकडे आण.
ईशान आंब्यांची पेटी ढकल-टाक करत आजोबांच्याकडे आणतो. बापू आंब्याची पेटी खोलतात व त्याच्यातील एक आंबा काढून ईशानच्या हातात देतात. 
ईशान आंब्याच्या कडे बघून बोलतो आजोबा हे आंबे तर हिरवेच आहेत.
अरे आंबा दिसायला हिरवा असला तरी खाण्यासाठी खूप गोड आहे तू खाऊन तरी बघ.
बेडरूम मधून नीशा बाहेर येते व बोलते काय उठल्या उठल्या गोंधळ लावलाय एवढ्या सकाळी कोणी आंबा खातं का?
आणि हे कसले हिरवे आंबे घेऊन आलाय.
"ईशानला देवगडचा हापूस आंबा खाण्याची सवय आहे".
अग आपल्या शेतात माझ्या वडिलांनी लावलेलं झाड त्या झाडाला दरवर्षी आंबे येतात दिसायला हिरवा असला तरी खाण्यासाठी खूप गोड आहे आंबा.
बापूंचे बोलणे ऐकून नाक मुरडून निशा किचन मध्ये जाते.
सोहम त्याची तयारी करून ऑफिसला जाण्यासाठी निघतो त्यावेळी बापू त्याला म्हणतात अरे सोहम एक आंबा खाऊन तरी बघ तुमच्यासाठी एवढे प्रेमाने आणले.
सोहम आता नको आता खूप उशीर झालाय आज रात्री आल्यानंतर खाईन.
निशा बापूंसाठी दुपारचे जेवण बनवते व बापूंना सांगते माझं जरा बाहेर काम आहे मला रात्री यायला उशीर होईल. तुमच आत्ताच जेवण मी बनवून ठेवल आहे.
निशा दुपारचं जेवण बनवून ठेवून घरातून बाहेर पडते.
दुपारी गावावरून सुमनचा बापूंना फोन येतो.
सुमन हॅलो .‌‌..काय हो मुलाकडे गेल्यानंतर रमून गेला , तुम्हाला मला फोन करायलाही वेळ नाही मिळाला का?
अगं नाही.... तसं काही नाही?
सुमन घरी सगळे बरे आहेत ना?
बापू हो सगळे बरे आहेत.
बरं सुनबाई नी अळूवड्या केल्या की नाही आणि  ईशानला आपल्या गावचे आंबे आवडले का?
बापू हो आवडले ना सर्वांनी खूप आंबे खाल्ले..
बर आता ठेवू का फोन?
हो हो ठेवा...
बापू दुपारचे जेवण करून एक टक फॅन कडे बघत पडून राहतात. रात्रीचे आठ नऊ वाजले तरी निशा घरी येत नाही.
म्हणून ते निशाला फोन करतात ...
निशा थिएटरमध्ये चित्रपट बघत असल्यामुळे तिला बापूंचा आवाज जात नाही मोबाईल मध्ये वेळ बघितल्यानंतर ती ऑनलाइन  जेवण ऑर्डर करते. परंतु हे बापूंना माहिती नसते.
दाराची बेल वाजते.
बापू दार उघडतात हे तुमचं जेवणाचं पार्सल.
सुनबाईं तर पार्सल जेवण मागवणार आहे हे बोलली नाही.
बापू जेवणाचे पार्सल बघून बोलतात. हे जेवण आम्ही नाही मागवलं. बापूंचे बोलणे ऐकून तो पार्सल माघारी घेऊन जातो.
बापू एक दोन आंबे खाऊन झोपून घेतात.
रात्री एक दोन वाजता नीशा घरी येते.
नीशाचं वागणं बापूंना पटत नाही म्हणून ते सकाळी उठून गावी जाण्यासाठी निघतात.
आणि  ठरवतात या पुढे फक्त आपल्यासाठी जगायचं मुलांसाठी नाही..

एक वर्षानंतर
बापू पुन्हा आंब्याची पेटी घेऊन मुंबईला जाण्यासाठी निघतात. शेवटी बापाचं काळीज मुलं कशीही वागली तरी आई-वडिलांचा जीव त्यांच्यासाठी तुटतोच.....