मुलगा झाला हो भाग 1
"कुणीतरी येणार येणार गं, पाहुणा घरी येणार येणार गं!"
गाणे बघण्यात सुधाताई रंगून गेल्या होत्या.
गाणे बघण्यात सुधाताई रंगून गेल्या होत्या.
तेवढ्यात त्यांचा दुसरीत शिकणारा नातू राघव म्हणाला,"आजी,आईला जर बाळ झालं तर आपण असचं गाणं म्हणायचं."
" राघव गधड्या,काय म्हणालास?" पाठीमागून त्याचा कान धरत सुमेधा ओरडली.
" आई बाबाच काल म्हणाले ना राघव एकटाच असतो त्याला खेळायला जोडीदार हवा."
राघव कान हातातून सोडवत आजीच्या मागे लपला.
" नको ते बरं ऐकू जातं तुला." सुमेधा चिडली.
" अग त्याच्यावर काय चिडतेस,मी तर म्हणते होऊन जाऊदे एखादी मुलगी. मुलीलाच माया असते बाई."
सुधाताई बोलून गेल्या.
सुधाताई बोलून गेल्या.
" आई ह्या विषयावर कितीवेळा बोललो आपण. प्लीज नको तो विषय."
सुमेधा आत गेली आणि मनात श्रीरंगला आल्यावर बघायचे असे ठरवून कामाला लागली.
सुमेधा आत गेली आणि मनात श्रीरंगला आल्यावर बघायचे असे ठरवून कामाला लागली.
तर हे आपले नायक आणि नायिका. चाळीशीत पोचलेला श्रीरंग आणि पस्तीसची सुमेधा.
श्रीरंग सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि सुमेधा शिक्षिका. दोघांनीही हम दो हमारा एक असे सुरुवातीला ठरवले होते. सुमेधा अजूनही त्यावर ठाम होती पण... श्रीरंग.
काय घडेल पुढे? चला डोकावू त्यांच्या सुखी संसारात.
काय घडेल पुढे? चला डोकावू त्यांच्या सुखी संसारात.
" हाय,कसा गेला आजचा दिवस?" श्रीरंग हसत म्हणाला.
त्यावर नाक फुगवून सुमेधा आत निघून गेली.
" सुमेधा,छान कॉफी कर ना." श्रीरंग फ्रेश होवून आला.
" हो करते ना! बायका काय स्वयंपाक करणे आणि मुले होणे यासाठीच तर असतात."
रागाचा अणुबॉम्ब फुटला आणि श्रीरंग हळूच उठून किचनमध्ये गेला.
रागाचा अणुबॉम्ब फुटला आणि श्रीरंग हळूच उठून किचनमध्ये गेला.
" अग काय हे? किती चिडतेस." श्रीरंग हळूच म्हणाला.
" काय सांगितले तू राघवला?" सुमेधा चिडली.
" कुठे काय? तो तर आईसोबत खाली गेलाय."
बायका लवकर संदर्भ का देत नाहीत ही संपूर्ण नवरे जमातीची अडचण आता समोर आली होती.
" काय तर म्हणे तुला खेळायला जोडीदार हवा." त्याच्या पोटात कोपर खुपसत सुमेधा म्हणाली.
" काय हरकत आहे. विनयकडे बघ एक मुलगा आणि एक मुलगी."
तिच्या केसांच्या बटांशी खेळत श्रीरंग लाडिगोडी लावत म्हणाला.
तिच्या केसांच्या बटांशी खेळत श्रीरंग लाडिगोडी लावत म्हणाला.
"श्री आपलं काय ठरलं होतं?" सुमेधा चिडली.
" अग पण मुली किती गोड असतात बघ." श्रीरंग पुन्हा तिची मनधरणी करत म्हणाला.
तितक्यात आजी आणि राघव परत आलेले बघून श्रीरंग पटकन बाहेर येऊन सोप्यावर बसला.
राघव पाय आपटत घरात शिरला.
" मम्मा आताच्या आता मला एक बहिण घेऊन ये." राघव चिडून म्हणाला.
" काय? बहीण कुठे मिळते अशी?"
श्रीरंग मिश्किल हसून म्हणाला.
श्रीरंग मिश्किल हसून म्हणाला.
" दवाखान्यात मिळते. मयंकच्या मम्मीने नाही का आणली तिथूनच."
राघव रागाने लाल झालेले नाक ओढत म्हणाला.
राघव रागाने लाल झालेले नाक ओढत म्हणाला.
" राघव काय फाजीलपणा लावला आहेस? चल हातपाय धुवून घे."
सुमेधा चिडली.
सुमेधा चिडली.
राघवने मोठ्याने भोकाड पसरले.
" आई अहो काय झाले?"
सुमेधा म्हणाली.
सुमेधा म्हणाली.
"अग खाली मयंकची मम्मी आणि त्याची छोटी बहीण आलेली. राघवने तिच्या गालाला हात लावला तर तो मयंक म्हणाला की तुझी तुला बहीण आण. माझ्या बहिणीला नको हात लावुस."
सुधाताई हसून सांगत होत्या.
तोपर्यंत श्रीरंगने राघवला कसेबसे शांत केले.
"पप्पा चल आपण आताच जाऊ आणि एक बहिण आणू."
राघव मुसमुसत म्हणाला.
सुमेधा चिडून आत निघून गेली.
सुमेधा चिडून आत निघून गेली.
रात्री सगळे आवरून सुमेधा आत आली. राघव रडून झोपी गेला होता.
" श्री,मी निक्षून सांगते असले काही होणार नाही." सुमेधा चिडली.
" असले म्हणजे कसले?"
श्रीरंग मुद्दाम आव आणून बोलत होता.
श्रीरंग मुद्दाम आव आणून बोलत होता.
"हेच तू म्हणतोस ते. एकच पुरे. तुम्हा पुरुषांना काय रे मजा करून झाले बाजूला आणि भोगायचे बाईने. नऊ महिने ती औषधे,इंजेक्शन वरून बाळंतपणाच्या वेदना."
सुमेधा तडतडली.
सुमेधा तडतडली.
" आता पुरुषांना आई बनायचे वरदान नाही काय करणार?" श्रीरंग खट्याळ हसत म्हणाला.
सुमेधा रागाने दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपी गेली.
सुमेधा आपला निर्णय बदलेल का?
श्रीरंग काय युक्ती करेल?
राघवला भावंड येईल?
वाचा पुढील भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा